मुंबई : विशेष प्रतिनिधी : मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत राज्य सरकारला दिलेला चार दिवसाचा अल्टिमेटम संपला आहे. मंगळवारी (दि. ४ फेब्रुवारी) त्यांच्या भ्रष्टाचाराच्या आणखी काही बाबी उघड करणार आहे, त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय पर्याय उरणार नाही, असा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. त्यांच्या या घोषणेमुळे त्या कोणता गौप्यस्फोट करतात याकडे सर्व राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.(Damania-munde)
त्याचबरोबर मुंडे यांची पाठराखण करणाऱ्या भगवानगडांच्या नामदेव शास्त्रींची स्वतः भेट देऊन त्यांच्या रोजच्या भ्रष्टाचाराचे पुरावे सादर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
त्या म्हणाल्या,‘ मी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना भेटून सर्व पुरावे दिले तरीही धनंजय मुंडे यांचे या दोघांशी अतिशय जवळचे असल्यामुळे कारवाई होत नाही. जोपर्यंत मुंडे यांचा राजीनामा होणार नाही तोपर्यंत संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात न्याय होणार नाही. मुंडे हे एक मंत्री म्हणून मला मान्य नाहीत. असे लोक दहशतवाद करतात, अत्याचार करतात, वाल्मिक कराड आणि कैलास फडसारख्या लोकांना मोठे करतात, अशा लोक सामान्य जनतेसाठी न्याय बनवणार असतील तर आम्हाला मान्य नाही.’ (Damania-munde)
मंगळवारच्या पत्रकार परिषदेत भ्रष्टाचाराचा खूप मोठा खुलासा करणार आहे. राख घोटाळा, काळे पैसे त्यांच्या खात्यात कसे आले, सरकारी कंपनीचा फायदा एका मंत्र्याला कसा झाला, हे दाखवेन. त्यांच्या जमिनी दाखवल्या. त्यांच्या आर्थिक व्यवहार दाखवला, त्यांच्या आणि वाल्मिकी कराडची जवळीक दाखवली. यंत्रणांच्या गैरवापर कसा केला जातो त्याचाही खुलासा करणार आहे. तसेच हे पुरावे मी भगवानगडावर देणार आहे. तुम्ही दिलेला पाठिंबा काढून घ्या, अशी मागणी मी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. ’ (Damania-munde)
दुसरी मागणी अशी असेल की मी जे पुरावे दिले, ते तुम्हाला योग्य वाटत असतील, तर त्यांनी मुंडे यांचा राजीनाम्याची मागणी करायला हवी. असे झाले तर पूर्ण महाराष्ट्र भगवानगडाला नमन करेल, नामदेव शास्त्री महाराज जर खरेच देशमुख कुटुंबीयांचा पाठीमागे असतील, तर त्यांनी देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळण्यासाठी जी विघ्न आहेत ती दूर करावी ,अशी विनंती आहे. त्यातला सर्वात मोठा विघ्न म्हणजे धनंजय मुंडे असून जोपर्यंत मंत्रिपदावर आहे, तोपर्यंत इथे न्याय होणार नाही. म्हणून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचे काम आता भगवानगडानेच करायला हवे असेही त्या म्हणाल्या.
हेही वाचा :
भाजपकडून पोलिसांचा गैरवापर होण्याची शक्यता
महाराष्ट्रात अख्ख्या हिमाचलएवढे मतदार वाढले कसे?