फतेहपूर : उत्तर प्रदेशातील आखरी गावात मंगळवारी (८ एप्रिल) भारतीय किसान युनियनच्या एका नेत्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. हल्लेखोरांनी त्याच्या मुलाला आणि भावालाही गोळ्या घातल्या. त्यात हे दोघेही ठार झाले. या तिहेरी हत्याकांडाने खळबळ उडाली आहे.(BKU leader shot dead)
भारतीय किसान युनियनचे जिल्हाध्यक्ष पप्पू सिंग (५०), त्यांचा मुलगा अभय सिंग (२२) आणि धाकटा भाऊ पिंकू सिंग (४५) अशी मृतांची नावे आहेत.
पोलिस महानिरीक्षक प्रेम कुमार गौतम यांनी दिलेल्या माहितीनुसार, गावातील स्थानिक नेते सुरेश कुमार उर्फ मुन्नू यांनी पप्पू सिंग यांना त्यांचा रस्त्यावर पार्क केलेला ट्रॅक्टर हलवण्याची विनंती केली. मोटारसायकल नेताना अडचण होते, असे त्यांनी सांगितले. मात्र वाद वाढत गेला. (BKU leader shot dead)
यावेळी सुरेश कुमार यांची मुले आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी आले. त्यांनी या वादात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. मात्र वाद वाढत गेला. वादाचे पर्यवसान अंदाधुंद गोळीबारात झाले. यात तिघांचा मृत्यू झाला. (BKU leader shot dead)
घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची माहिती घेण्यात येईल, असे आयजी गौतम यांनी सांगितले. दुसऱ्या पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सुरेश कुमार आणि त्यांच्या मुलांना अटक करण्यात आली आहे. या दोन्ही कुटुंबात दीर्घकाळापासून राजकीय वैर होते.
हेही वाचा :
तामिळनाडूच्या राज्यपालांची कृती ‘बेकायदा’ आणि चुकीची
शेअर बाजार वधारला