कोल्हापूर : प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणातील आरोपी प्रशांत कोरटकरवर वकिलानेच हल्ला केला. ‘ये पश्या, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतोस काय?,’ असा संताप व्यक्त करत ॲड. अमितकुमार भाेसले (रा. रुकडी, ता. हातकणंगले) यांनी धावून जात हल्ला केला. पोलिसांनी प्रसंगावधान राखत भोसले यांच्यावर झडप घातली. कोरटकरची सुटका केली. भर कोर्टाच्या आवारात घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली.(Attack on Koratkar)
सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली. कोरटकरविरोधात कोल्हापुरात संतापाची लाट कायम आहे. त्यामुळे तीन दिवसांपूर्वीही त्याला कोल्हापुरी चप्पलने मारण्याचा प्रयत्न झाला होता. याप्रकरणात काहीजणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडून दिले होते. संतापाचे वातावरण कायम आहे. त्यामुळे शुक्रवारी (२८ मार्च) सकाळी लवकर कोरटकरला कोर्टात हजर करण्यात आले. (Attack on Koratkar)
कोरटकरची पोलिस कोठडी संपत असल्याने त्याला कोर्टात हजर करायचे होते. त्यामुळे सकाळी आठलाच पोलिस त्याला घेऊन आले होते. कोर्टात त्याला उभे केल्यानंतर त्याच्या पोलिस कोठडीत दोन दिवसाची वाढ करण्यात आली. त्यानंतर पोलिस त्याला परत पोलिस ठाण्याकडे घेऊन जात होते. कँटीनच्या पॅसेजमधून घेऊन जात असताना ॲड. भोसले यांनी कोरटकरला उद्देशून ‘तू शिवरायांचा अपमान करतोस काय,’ असे म्हणत त्याच्या अंगावर धावून गेले. त्याच्यावर हल्ला केला. यावेळी पोलिसांनी भोसले यांच्यावर झडप घातली आणि त्यांना बाजूला नेले. त्यांना ताब्यात घेतले.(Attack on Koratkar)
पोलिसांची दक्षता
तीन दिवसांपूर्वी कोरटकरला कोर्टात हजर करण्यात आले. त्यावेळीही कोर्टाच्या आवारात त्याच्यावर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या प्रकरणातील काहीजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. हल्ल्याचा प्रयत्न आजही होईल, म्हणून पोलिसांनी दक्षता घेतली होती. पोलिसांनी कोरटकरला कोर्टाच्या आवारात आणण्याआधीच जयदीप शेळके यांना ताब्यात घेतले. शेळके यांनी परवा कोरटकरला पायताणाने मारण्याचा प्रयत्न केला होता.
हेही वाचा :
न्यायालयाकडून इम्रान प्रतापगढी विरोधातील एफआयआर रद्द
म्यानमार, थायलंडला शक्तीशाली भूकंपाचे धक्के
पोलिस डायरी
Earthquake hits Myanmar : म्यानमारमध्ये भूकंपबळींची संख्या एक हजारावर
नेपिडो : म्यानमार देशाला शक्तिशाली भूकंपाचे दोन मोठे धक्के बसले. शुक्रवारी सकाळी ७.७ रिश्टर स्केलचा धक्का बसला. संपूर्ण म्यानमार या घटनेने हादरून गेले आहे. अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या. रस्ते उखडले. प्रचंड मानवी आणि वित्तहानी झाली. एका लष्करी अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार दुर्घटनेतील मृतांची संख्या एक हजारावर गेली असून दीड हजाराहून अधिक लोक जखमी झाले आहेत. अमेरिकेच्या जिऑलॉजिकल सर्व्हे एजन्सीच्या दाव्यानुसार मृतांची संख्या दहा हजारांपर्यंत जाऊ शकते. ढिगा-याखाली गाडल्या गेलेल्या लोकांना तसेच मृतदेहांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. (Earthquake hits Myanmar)
राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळी स्थानिक वेळेनुसार ११ वाजून ५० मिनिटांनी ७.७ रिश्टर स्केलची नोंद झाली आहे. हा भूकंप दहा किलोमीटर खोलीवर झाला आहे. भूकंपाच्या या तीव्र धक्क्यामुळे अनेक इमारतींचे नुकसान झाले आहे. एक निर्माणाधीन इमारत कोसळली. त्यात तीन कामगारांचा मृत्यू झाला. ८० वर कामगार अडकले आहेत.(Earthquake hits Myanmar)
मेजर जनरल झॉ मिन तुन यांनी सांगितले की, नेपिडो, मंडाले आणि सागाइंगमधील रुग्णालये जखमींनी ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे वैद्यकीय सुविधा पुरवण्याचे आव्हान आरोग्य व्यवस्थेसमोर आहे.
जंटा प्रमुख मिन आंग ह्लाईंग यांनी राष्ट्रीय एमआरटीव्हीवरील भाषणात आंतरराष्ट्रीय मदत मागितली आहे. आम्ही भारताकडून देऊ केलेली मदत स्वीकारण्याचे आम्ही ठरवल्याचे ते म्हणाले.
अनेक जखमी लोक येत आहेत. यापूर्वी असे चित्र कधीही पाहिले नाही. आमच्यासमोर खूप आव्हाने आहेत. खूप थकलो आहोत. तरीही परिस्थिती हाताळत आहोत.
एक डॉक्टर, नेपिडो रुग्णालय
- आरोग्यसेवा कोलमडली
- म्यानमारची राजधानी नेपिडो येथील रुग्णालयाबाहेर जखमींच्या रांगा
- मिळेल त्या वाहनांना जखमी दाखल
- जखमींचे शरीर धूळ आणि रक्ताने माखलेले
- रुग्णालयाचीही पडझड; आरोग्यसेवा देण्याचे आव्हान
- जखमींवर उघड्यावरच उपचार, नातेवाईकांच्या हातात आयव्ही ड्रीप
- म्यानमारचे लष्कर प्रमुख मिन आंग ह्लाईंग यांची रुग्णालयाला भेट
दरम्यान, म्यानमारसह चीन आणि थायलंडमध्येही तीव्र धक्के बसले. थायलंडची राजधानी बँकॉकमधील उंच इमारतींना भूकंपाचा फटका बसल्याचे वृत्त आहे. भूकंपानंतर बँकॉकमध्ये आणीबाणीची घोषणा थायलंडच्या पंतप्रधानांनी केली आहे. (Earthquake hits Myanmar)
थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये ७.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. या धक्क्यांमुळे इमारती हादरल्या. बँकॉकमध्ये गगनचुंबी इमारत कोसळली. त्यात ४३ कामगार अडकले आहेत, असे वृत्त एएफपी वृत्तसंस्थेने दिले आहे. (Earthquake hits Myanmar)
बीजिंगच्या भूकंपमापन संस्थेनुसार शुक्रवारी म्यानमारमधील झालेल्या शक्तीशाली भूकंपाचे धक्के चीनच्या नैऋत्य युनान प्रांतात जाणवले. शिन्हुआ वृत्तसंस्थेनुसार चायना अर्थक्वेक नेटवर्क्स सेंटर (सीईएनसी) ने ७.९ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाल्याचे वृत्त दिले आहे. तर सीईएनसी ने सोशल मिडियावर म्हटले आहे की युनानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. (Earthquake hits Myanmar)
युएस जिओलॉजिकल सर्व्हे आणि जर्मनीच्या सेंटर फॉर जिओसायन्सेसने प्राथमिक माहितीच्या आधारे सांगितले आहे की भूकंपाचा केंद्रबिदू दहा किलोमीटर (६.२) खोल आहे. त्याचे केंद्र म्यानमारमध्ये आहे. अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षणानुसार भूकंपाचे केंद्रस्थान सागाईंगच्या वायव्येस १६ किलोमीटर अंतरावर आणि १० किलोमीटर खोलीवर आहे. स्थानिक वेळेनुसार दुपारी १२ वाजून ५० शक्तीशाली भूकंप झाला.
बँकॉकलाही भूकंपाचे धक्के बसले आहेत. गगुनचुंबी इमारती असलेल्या या शहरात एक कोटी ७० लाख लोक राहतात. भूकंपामुळे इमारतींचे नुकसान झाले. शहरातील काही मेट्रो आणि रेल्वे सेवा स्थगित करण्यात आल्या आहेत. एक्स पोस्टनुसार थाई पंतप्रधान पेटोंगटार्न शिनवात्रा यांनी भूकंपानंतर तातडीची बैठक घेण्यासाठी फुकेतचा अधिकृत दौरा त्यांनी रद्द केला आहे. बैठकीनंतर थायलंडमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.
तीन कामगारांचा मृत्यू
एएफपीच्या वृत्तानुसार, भूकंपाच्या धक्क्याने बांधकाम सुरू असलेली ३० मजली इमारत कोसळली. यात किमान तीन कामगारांचा मृत्यू झाला, असे थायलंडचे उपपंतप्रधान फुमथम वेचायचाई यांनी सांगितले.
वेचायचाईंनी सांगितले की, कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्यात किमान ८१ लोक अडकले आहेत.
The #earthquake shakes #Thailand as water cascades from the pool of a high-rise building. #Myanmar #MyanmarEarthquake https://t.co/xZazhLImIK pic.twitter.com/1Jz8YpLgGP
— Shanghai Daily (@shanghaidaily) March 28, 2025
हेही वाचा :
कोल्हापूर : प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्या काही मित्रांची आणि नातेवाईकांची नावे चौकशीत समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली. महिनाभराच्या कालावधीत त्याने दोन वाहनांचा वापर केल्याची माहिती दिली आहे. दरम्यान, त्याची पोलिस कोठडीची मुदत शुक्रवारी संपणार असून त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. कोरटकरच्या पोलिस कोठडीत वाढ करावी अशी मागणी पोलिसांकडून केली जाण्याची शक्यता आहे. (Koratkar enquiry)
प्रशांत कोरटकरला राजारामपुरी पोलिस कोठडीत ठेवण्यात आले असून तीन दिवस त्याची चौकशी सुरू आहे. बुधवारी रात्री सुरू असलेली चौकशी गुरुवारी पहाटेपर्यत सुरू होती. न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पसार काळात तो कुठे फिरला? त्याला कोणी मदत केली? त्याने कुठे मुक्काम केले? या काळात तो कोणाच्या संपर्कात होता? ही माहिती मिळवण्यासाठी पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याने मोबाइलमधील डेटा का डिलिट केला? डेटा डिलिट करण्याचा सल्ला कुणी दिली याची माहिती घेण्यात आली. पसार काळात पळून जाण्यासाठी त्याने स्वत:ची कार वापरली. त्यानंतर स्वत:च्या कारच्या नंबरवरून पोलिसांना सापडू नये, यासाठी एका मित्राची कार वापरली. गुन्ह्यात वापरलेल्या दोन्ही कार जप्त केल्या जाणार आहेत. (Koratkar enquiry)
कोरटकरला कार देणाऱ्या मित्रासह मदत करणाऱ्या काही साथीदारांची नावे चौकशीत निष्पन्न झाली आहेत. यात काही नातेवाईकांचाही समावेश आहे. गरज पडल्यास त्यांचीही चौकशी करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यासाठी काही दिवसांत पोलिसांचे एक पथक नागपूरला जाण्याची शक्यता आहे. (Koratkar enquiry)
प्रश्नांच्या भडिमारामुळे कोरटकर अस्वस्थ
कोरटकरला बोलते करण्यासाठी पोलिस रात्रंदिवस चौकशी करीत आहेत. रात्री-अपरात्री कधीही प्रश्नांचा भडीमार सुरू होत असल्याने त्याची अस्वस्थता वाढल्याचे सूत्रांनी सांगितले. अडचणी वाढवणारे प्रश्न विचारताच तो मौन बाळगत आहे. त्याचे मौन तोडून अधिक माहिती मिळवण्याचे प्रयत्न करत आहे. (Koratkar enquiry)
गांधीनगरात वैद्यकीय तपासणी
वैद्यकीय तपासणीसाठी सीपीआरऐवजी गुरुवारी सकाळी त्याला गांधीनगर येथील प्राथमिक रुग्णालयात हजर केले. त्यानंतर दिवसभर चौकशीचे सत्र सुरू होते. पोलिस कोठडी संपत असल्याने शुक्रवारी दुपारी त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. अजून तपास बाकी असल्याने पोलिसांकडून आणखी काही दिवसांची पोलिस कोठडी वाढवून मागण्याची विनंती न्यायाधीशांकडे केली जाऊ शकते. (Koratkar enquiry)
हेही वाचा :
दडपलेला इतिहास निर्भिडपणे मांडणार
एर्नाकुलम : जनता दल युनायटेड (जेडीयू) चे स्थानिक राजकीय नेते दीपक यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी केरळ उच्च न्यायालयाने गुरुवारी (२७ मार्च) भाजपच्या पाच कार्यकर्त्यांना दोषी ठरवले. (5 bjp workers convicts)
न्यायाधीश पीबी सुरेश कुमार आणि न्यायमूर्ती जोबिन सेबॅस्टियन यांनी सर्व आरोपींना निर्दोष सोडण्याचा ट्रायल कोर्टाचा निर्णय रद्द केला. ट्रायल कोर्टाचा हा निर्णय ठोस तथ्यांपेक्षा पुरावे आणि तांत्रिक बाबींच्या चुकीच्या मूल्यांकनावर आधारित होता, असे निरीक्षणही उच्च न्यायालयाने नोंदवले.
तंत्रज्ञानाच्या आधारे गंभीर गुन्ह्यांमध्ये चुकीच्या पद्धतीने निर्दोष सोडल्याने न्यायव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास कमी होऊ शकतो, गुन्हेगार शिक्षेपासून वाचू शकतात अशी धारणा निर्माण करून गुन्हेगारी वर्तनाला प्रोत्साहन मिळू शकते यावर खंडपीठाने भर दिला. (5 bjp workers convicts)
हिंसक गुन्ह्यांसह असलेल्या प्रकरणांत न्यायव्यवस्थेचे कर्तव्य न्यायव्यवस्थेचा अपव्यय रोखणे आहे, असे खंडपीठाने म्हटले आहे.
“या संदर्भात, हे सांगणे आवश्यक आहे की तांत्रिक किंवा कमकुवत कारणांवरून गंभीर गुन्ह्यांमध्ये दोषी व्यक्तींना निर्दोष सोडल्याने फौजदारी न्याय वितरण प्रणालीचा पायाच ढासळून जाईल. ही प्रणाली वैयक्तिक हक्क आणि सामाजिक सुव्यवस्थेचे रक्षण यांचे संतुलन साधण्याचा प्रयत्न करते. अशा परिणामांमुळे न्यायाचे रक्षक म्हणून जनतेचा न्यायालयांवरील विश्वासच डळमळीत होत नाही तर समाजाला न्यायालयांकडून मिळणाऱ्या संरक्षणापासूनही वंचित ठेवले जाते. अशा निर्दोष सुटकेमुळे एक धोकादायक दिशाभूल करणारा संदेश देखील जाईल, अशाने अराजकतेचे वातावरण निर्माण होते.’ असे खंडपीठाने पुढे म्हटले. (5 bjp workers convicts)
स्थानिक जेडीयू नेता आणि रेशन दुकान मालक दीपक यांची २४ मार्च २०१५ रोजी त्रिशूरमधील पाझुविल सेंटर येथे निर्घृण हत्या करण्यात आली होती.
प्रत्यक्षदर्शींनी साक्ष दिली की चाकू आणि तलवारींनी सज्ज असलेल्या चार हल्लेखोरांनी ते त्यांच्या दुकानाबाहेर उभे असताना त्यांच्यावर हल्ला केला. हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करणारे दोन प्रत्यक्षदर्शी, सजीव आणि स्टॅलिन देखील जखमी झाले. (5 bjp workers convicts)
फॉरेन्सिक अहवाल आणि प्रत्यक्षदर्शींच्या साक्षीसह मजबूत पुरावे असूनही, त्रिशूर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने २०१७ मध्ये सर्व दहा आरोपींना निर्दोष मुक्त केले. त्यानंतर राज्य सरकार आणि दीपकची पत्नी वर्षा दीपक यांनी उच्च न्यायालयात अपील केले.
हेही वाचा :
भाजपने हिंदुत्व सोडले का?
फुटीरतावाद शेवटची घटका मोजतोय
मुंबई : शिंदे गटाचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विनोद करून भाजप आणि शिंदे गटाचा रोष ओढवून घेतलेल्या कॉमेडियन कुणाल कामरा यांच्यावर जगभरातून धनवर्षाव होत आहे. तो रोज वाढतोच आहे. गंभीर पत्रकारितेसारखी भूमिका निभावल्याबद्दल तुमचे अभिनंदन, तुम्हाला काही कायदेशीर मदत लागली तर ती द्यायला आमची तयारी आहे, अशा भावनाही चाहत्यांनी व्यक्त केल्या आहेत.(donate lakhs to Kamra)
अनेक चाहत्यांनी कामरांना निधी संकलन सुरू करण्याचा आग्रह केला. त्यांच्या स्पष्टवक्त्या, धाडसी आणि गंभीर राजकीय विनोदावर जगभरातील त्यांचे चाहते अक्षरश: वेडे झाले आहेत.
यानिमित्ताने कामरा यांना जगभरातील चाहत्यांकडून केवळ शब्दांद्वारेच नव्हे तर आर्थिक देणग्यांद्वारेही पाठिंबा मिळत असल्याचे स्पष्ट होत आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणाऱ्या त्याच्या कथित वादाच्या पार्श्वभूमीवर, जगभरातील प्रेक्षकांनी कामरा यांना पाठिंबा दिला आहे. मोठ्या प्रमाणात देणग्या देण्यासही सुरुवात केली आहे. (donate lakhs to Kamra)
देणग्या कोटींवर?
त्यांच्या यूट्यूब व्हिडिओच्या कमेंट विभागात, चाहत्यांनी ४०० ते १०,००० रुपयांपर्यंतचे योगदान दिल्याचे दिसत आहे. आंतरराष्ट्रीय समर्थकांनीही अमेरिकन डॉलर्स, ब्रिटिश पाउंड्स, कॅनेडियन डॉलर्स आणि युएई दिरहममध्ये देणगी दिली आहे. देणग्यांचा हा आकडा कोटींवर गेल्याच्या बातम्या येत आहेत.(donate lakhs to Kamra)
अनेक चाहते कामरा यांना निधी संकलन सुरू करण्याचा आग्रह करत आहेत, त्यांच्या स्पष्टवक्त्या विनोदासाठी त्यांना येणाऱ्या कोणत्याही कायदेशीर खर्चाची भरपाई करण्याचे वचन देत आहेत. ते त्यांच्या धाडसाचे, प्रामाणिकपणाचे आणि विनोदाच्या माध्यमातून शक्तिशाली, सत्ताधारी लोकांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देण्याच्या वचनबद्धतेचे कौतुक करतात.
‘राष्ट्रीय संपत्ती, अंधारयुगात आशेचा किरण…’
कामरा यांच्या या व्हिडीओवर व्यक्त होताना, त्यांना “राष्ट्रीय संपत्ती”, “अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा नायक” आणि “अंधारयुगात आशेचा किरण” असे म्हटले आहे. एका देणगीदाराने तर, “जेव्हा मी तुमच्याकडे पाहतो तेव्हा मला देशासाठी अजूनही काही आशा आहे, असे मला वाटते! सत्यमेव जयते!,” अशी भावना व्यक्त केली आहे. (donate lakhs to Kamra)
लाखो लोकांनी पाहिला ‘तो’ व्हिडीओ यूट्यूबच्या सुपर थँक्स फीचरमुळे भारतीय चाहते कंटेंट क्रिएटर्सना ४० ते १०,००० रुपयांपर्यंत देणगी देऊ शकतात. कामरांचे समर्थक ते मोठ्या प्रमाणात वापरत आहेत. यूट्यूबवर त्यांचे २.४ दशलक्ष सबस्क्राइबर्स आहेत. त्यामुळे त्यांचा हा व्हिडीओ अनेकांपर्यंत गेला आहे. त्याचा प्रभावही वाढतच आहे.
- कामरांचे चाहते काय म्हणतात…?
- तुम्ही जे करत आहात त्याबद्दल धन्यवाद.
- तुम्ही विनोद आणि सत्याच्या शोधासाठी तुम्ही सर्वस्व सोडले आहे. असेच सुरू ठेवा…
- तुमच्या शौर्याला आणि करुणेला कसा पाठिंबा द्यायचा हेच समजत नाही
- तुम्हाला आता लक्ष्य केले जाईल, परंतु गुंडांना तोंड देण्यासाठी आणि सत्य सांगण्यासाठी धाडस लागते. सत्य बाहेर आणल्याबद्दल धन्यवाद!
- मी अवाक् झालो. तुमचा विनोद आणि निर्भयता अनुकरणीय आहे…
हेही वाचा :
कोल्हापूर : प्रतिनिधी : राष्ट्रपुरुषांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नागपूरचा प्रशांत कोरटकरने मोबाईलमधील डाटा डिलीट केल्याची कबुली दिली असल्याची माहिती पोलिसांच्या सूत्रांनी दिली आहे. बुधवारी (२६ मार्च) कोरटकरच्या आवाजाचे नमुने घेण्यात आले. पोलिसांनी पाच तासाहून अधिक वेळ जबाब घेतला आहे. (Delete Data)
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या आणि इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिलेल्या प्रशांत कोरटकरच्या मुसक्या कोल्हापूर पोलिसांनी आवळल्यानंतर त्याला तेलंगणातून काल मंगळवारी (दि.२५) कोल्हापूरात आणले. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्याला तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. (Delete Data)
जुना राजवाडा पोलिस ठाण्यात कोरकटराचा गुन्हा नोंद झाला असला तरी त्याची रवानगी राजारामपुरी पोलिस ठाण्यातील कोठडीत करण्यात आली आहे. कोरटकराचा पाच तपास जबाब घेण्यात आला. मोबाईलमधील इतिहास संशोधक सावंत यांना दिलेली धमकी, राष्ट्रपुरुषांविषयी केलेले वक्तव्याचा डाटा, मोबाईल नंबर, कॉल डिलिट केल्याची कबुली दिली. गुन्हा नोंद झाल्यानंतर कोरटकरांचे वास्तव्य कुठे होते, त्याला कोण भेटले याची माहिती पोलिस घेत आहेत. (Delete Data)
गुन्हा नोंद झाल्यावर कोरटकरने मोबाईल वापरण्याचे टाळले होते अशी माहिती तपासात पुढे आली आहे. तसेच त्याने आपण पकडले जाऊ या भितीने त्याने युपीआय पेमेंट टाळून रोखीने व्यवहार केल्याची कबुली दिली. हैद्राबादला पळून जाण्याचा प्लॅन असल्याच् त्याने सांगितले. पण तत्पूर्वी कोल्हापूर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. चंद्रपूरमध्ये त्याचा मुक्काम कुठे होता? त्याला कोण भेटले? याची माहिती पोलिस घेत आहेत. (Delete Data)
सहा तासाहून अधिक वेळ घेतले आवाजाचे नमुने
कोरटकरने सावंत यांना मोबाईलवरुन धमकी दिली होती. हे आपले संभाषण नव्हते असा दावा केला होता. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आज कोरटकरच्या आवाजाचे नमुने घेतले. फॉरेन्सिक लॅबच्या दोन अधिकाऱ्याने राजारामपुरी पोलिस ठाण्यात कोरटकरच्या आवाजाचे नमुने घेतले. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास फॉरेन्सिकचे अधिकारी पोलिस ठाण्यात आले होते. सायंकाळी सात वाजेपर्यंत त्याच्या आवाजाचे नमुने घेण्यात काम सुरू होते. (Delete Data)
साधे जेवण आणि कोठडीतच मुक्काम
प्रशांत कोरटकरला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळणार असल्याची चर्चा सुरू असताना फिर्यादी इंद्रजीत सावंत यांनी पोलिस ठाण्यातील सर्व कार्यालये आणि आवारातील सीसीटीव्ही सुरू आहेत का? असल्याचे त्याचे तपशील मागितले आहेत. त्यामुळे पोलिसांकडून कोरटकरला आरोपीची वागणूक मिळत असल्याची माहिती पुढे आली आहे. तपासाव्यतिरिक्त त्याला पोलिस कोठडीत ठेवले जात आहे. चौकशीसाठी त्याला पोलिस निरीक्षकांच्या खोलीत आणले जाते. त्याला नेहमीच्या आरोपीप्रमाणे चपाती, उसळ असे जेवण दिले जाते. कोठडीतील सर्वच संशयित आरोपींना चपाती उसळच दिली जाते. (Delete Data)
हेही वाचा :
जयकुमार गोरे प्रकरणाची ए टू झेड स्टोरी
Judge appointment: उच्च न्यायालयातील ७७ टक्के न्यायाधीश उच्च जातीचे
नवी दिल्ली : देशभरातील उच्च न्यायालयात नियुक्ती करण्यात आलेल्या न्यायाधीशांपैकी ७७ टक्के न्यायाधीश उच्च समजल्या जाणाऱ्या जातीतील आहेत. २०१८ पासून ७१५ न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली. त्यांमध्ये उच्च जातीतील न्यायाधीश ५५१ आहेत. केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी ही माहिती राज्यसभेत दिली.(Judge appointment)
न्यायाधीशांच्या नियुक्ती संदर्भात हा प्रश्न विचारण्यात आला होता. केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी गेल्या आठवड्यात संसदेत लेखी उत्तरात ही माहिती दिली. २०१८ पासून नियुक्त झालेल्या ७१५ उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांपैकी २२ अनुसूचित जाती प्रवर्गातील, १६ अनुसूचित जमाती, ८९ ओबीसी तर केवळ ३७ न्यायाधीश अल्पसंख्याक समाजाचे आहेत, असे त्यांनी सांगितले. (Judge appointment)
याचा अर्थ असा की २०१८ पासून नियुक्त झालेले एकूण १६४ उच्च न्यायालयांचे न्यायाधीश अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, अल्पसंख्याकांचे आहेत, तर सर्वाधिक ५५१ न्यायाधीश उच्च जातीचे आहेत. उच्च जाती प्रवर्गातील उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची टक्केवारी ७७.०६% आहे.
मुख्य न्यायाधीशांनी ‘योग्य विचार’ करावा
मेघवाल यांनी या उत्तरात पुढे म्हटले आहे की, सरकार उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायाधीशांना विनंती करत आहे की न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी प्रस्ताव पाठवताना, “उच्च न्यायालयांमधील न्यायाधीशांच्या नियुक्तीत सामाजिक विविधता लक्षात घ्यावी. त्यासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, अल्पसंख्याक आणि महिलांमधील योग्य उमेदवारांचा योग्य विचार केला पाहिजे.” (Judge appointment)
उच्च न्यायपालिकेत अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय, महिला आणि अल्पसंख्याकांच्या प्रतिनिधित्वाच्या तपशीलांबद्दल राजद खासदार मनोज कुमार झा यांनी प्रश्न उपस्थित केला होता. अलिकडील वर्षांत उपेक्षित समुदायांमधील न्यायाधीशांच्या नियुक्तीमध्ये घट होत आहे का; जर होत असेल तर त्याची कारणे काय आहेत?, असा प्रश्नही झा यांनी विचारला होता. त्या प्रश्नांना मंत्री मेघवाल यांनी उत्तर दिले.
न्यायालयीन नियुक्त्यांमध्ये सामाजिक विविधता समाविष्ट करणाऱ्या मेमोरँडम ऑफ प्रोसिजर (एमओपी) ला अंतिम स्वरूप देण्यासाठी सरकारने सर्वोच्च न्यायालयात पाठपुरावा केला आहे का, जर असेल तर त्याची स्थिती काय आहे, असा प्रश्न झा यांनी विचारला होता. न्यायालयीन नियुक्त्यांमध्ये दुर्लक्षित घटकांचे पुरेसे प्रतिनिधित्व सुनिश्चित करण्यासाठी उचललेली पावले आणि त्याची माहिती काय, असा सवाल झा यांनी केला होता. (Judge appointment)
या उत्तरात मेघवाल यांनी म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी प्रस्ताव सुरू करण्याची जबाबदारी भारताच्या मुख्य न्यायाधीशांची आहे, तर उच्च न्यायालयांतील न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी प्रस्ताव सुरू करण्याची जबाबदारी संबंधित उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांवर आहे. तथापि, या उत्तरात असे म्हटले आहे की, सरकार उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायाधीशांना विनंती करत आहे की न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी प्रस्ताव पाठवताना, “उच्च न्यायालयांमधील न्यायाधीशांच्या नियुक्तीत सामाजिक विविधता लक्षात घ्यावी. त्यासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, अल्पसंख्याक आणि महिलांमधील योग्य उमेदवारांचा योग्य विचार केला पाहिजे.” सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने शिफारस केलेल्या व्यक्तींनाच सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांचे न्यायाधीश म्हणून नियुक्त केले जाते, असेही मेघवाल यांनी म्हटले.
हेही वाचा :
असंवेदनशील, अमानवी
कोरटकरला ठेवलेल्या पोलिस स्टेशनमधील सीसीटीव्हीची मागणी
Double Marriage: सकाळी प्रेयसीसोबत, संध्याकाळी ठरलेल्या मुलीशी लग्न
गोरखपूर : उत्तर प्रदेशमधील गोरखपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली. एका पुरुषाने सकाळी त्याच्या प्रेयसीसोबत सकाळी, तर कुटुंबाने ठरवलेल्या मुलीशी संध्याकाळी लग्न केले. ही घटना ही घटना गोरखपूरच्या हरपूर बुधत भागात घडली. (Double Marriage)
संबंधिताच्या प्रेयसीला दुसऱ्या लग्नाची माहिती मिळाल्यानंतर तिने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यामुळे ही घटना उघडकीस आली. पीडितेने सांगितले की, तिचे या पुरूषासोबत चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. त्या दरम्यान तिने दोन गर्भपात केले. दोघांनी मंदिरात लग्नगाठही बांधली होती.
पीडितेने दावा केला की जेव्हा ती पुन्हा गर्भवती राहिली तेव्हा तिला प्रसूतीसाठी एका वृद्धाश्रमात नेण्यात आले. तथापि, त्या पुरूषाने बाळाला तेथील एका परिचारिकेकडे सोपवले. (Double Marriage)
त्या पुरूषाच्या कुटुंबाने त्याचे लग्न आधीच दुसऱ्या महिलेशी ठरवले आहे, हे समजल्यावर या महिलेला धक्का बसला. तिने त्याच्याशी संपर्क साधला तेव्हा त्याने तिला आपण कोर्ट मॅरेज केले तर त्याच्या कुटुंबाला ते मान्य होईल, आपल्याला नकार देणार नाहीत, असे त्याने सांगितले. तथापि, ज्या दिवशी कोर्ट मॅरेज होणार आहे त्याच दिवशी त्याचे कुटुंबाने ठरवलेल्या मुलीशी त्याचा विवाह होणार आहे, हे त्या प्रेयसीला माहीत नव्हते. (Double Marriage)
सकाळी, त्याने त्याच्या प्रेयसीशी कोर्टात लग्न केले. नंतर त्याच रात्री, त्याने त्याच्या कुटुंबाने ठरवल्याप्रमाणे पारंपरिक पद्धतीने दुसऱ्या मुलीशी लग्न केले.
लग्नानंतर जेव्हा ही प्रेयसी त्याच्या घरी गेली तेव्हा त्याच्या कुटुंबाने तिचा अपमान केला. तिला घराबाहेर हाकलून लावले, असा आरोप तिने केला.
या घटनेबाबतची तक्रार मिळाल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकारी जितेंद्र कुमार श्रीवास्तव यांनी सांगितले. तसेच संबंधित मुलीने केलेले आरोप खरे असल्याचे आढळल्याचे म्हटले आहे. (Double Marriage)
“आमच्याकडे तक्रार दाखल झाली आहे. त्यासंदर्भात चौकशी केली. मुलीने केलेल्या तक्रारीत तथ्य आहे. योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत,” असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा :
असंवेदनशील, अमानवी
नवी दिल्ली : बलात्काराची व्याख्या करताना अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेला निकाल सर्वोच्च न्यायायलयाने बुधवारी स्थगित ठेवला. तसेच या प्रकरणात निकाल देणाऱ्या न्यायाधीशाची असंवेदनशीलता स्पष्ट होते, असे कडक ताशेरेही खंडपीठाने ओढले. न्यायाधीश राम मनोहर नारायण मिश्रा यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला होता.(SC stays HC ruling)
न्यायाधीश बी.आर. गवई आणि ए.जी. मसीह यांच्या खंडपीठाने म्हटले आहे की, “आम्हाला हे सांगताना दुःख होत आहे की, वादग्रस्त आदेशात केलेली काही निरीक्षणे संबंधित न्यायाधीशाची असंवेदनशीलता दर्शवितात.”.(SC stays HC ruling)
या संदर्भात मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून खटला दाखल केला होता.
अल्पवयीन मुलीची छाती पकडणे आणि तिच्या पायजम्याची नाडी तोडणे हे बलात्काराच्या प्रयत्नाचा गुन्हा होत नाही, असा वादग्रस्त निकाल अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला होता. तसेच उच्च न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले होते की, ही कृत्ये प्रथमदर्शनी पोक्सो कायद्यांतर्गत ‘जबरी लैंगिक अत्याचारा’चा गुन्हा ठरतील. अशा गुन्ह्यात कमी शिक्षेची तरतूद आहे.
या निकालावर समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. स्वत: केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्र्यांसह काही खासदारांनीही नापसंती दर्शवत अशा निकालाने समाजात चुकीचा संदेश जाईल, अशी भीती व्यक्त केली होती. उच्च न्यायालयाच्या या निकालाची सर्वोच्च न्यायालयाने गंभीर दखल घेत स्वेच्छेने खटला दाखल करून घेतला होता. न्यायमूर्ती बी.आर. गवई आणि न्यायमूर्ती ए.जी. मसीह यांच्या खंडपीठाने, उच्च न्यायालयाचा आदेश “धक्कादायक” होता, असे निरीक्षण नोंदवले.(SC stays HC ruling)
आम्हाला हे सांगताना दुःख होत आहे की, वादग्रस्त आदेशात केलेली काही निरीक्षणे संबंधित न्यायाधीशाची असंवेदनशीलता दर्शवितात.
– सर्वोच्च न्यायालयाचे खंडपीठ
“आम्हाला हे सांगताना दुःख होत आहे की वादग्रस्त निकालात केलेली काही निरीक्षणे, विशेषतः परिच्छेद २१, २४ आणि २६ ही निकाल लिहिणाऱ्या न्यायाधीशाकडे संवेदनशीलतेचा पूर्ण अभाव असल्याचे दर्शवितात” असे खंडपीठाने आदेशात नमूद केले.
खंडपीठाने असे नमूद केले की हा निर्णय तत्काळ देण्यात आला नव्हता तर जवळपास चार महिने राखून ठेवल्यानंतर देण्यात आला होता. याचा अर्थ न्यायाधीशांनी योग्य विचार आणि मनाचा वापर करून निर्णय दिला. ही निरीक्षणे “कायद्याच्या तत्वांना पूर्णपणे अज्ञात असल्याने आणि ती पूर्णपणे असंवेदनशीलता आणि अमानवी दृष्टिकोन दर्शवितात”, त्यामुळे ही निरीक्षणे स्थगित करणे अत्यावश्यक वाटते.(SC stays HC ruling)
तसेच खंडपीठाने भारत सरकार, उत्तर प्रदेश आणि उच्च न्यायालयासमोरील पक्षकारांना नोटीस बजावली. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता आज हजर झाले आणि त्यांनी निकालाचा निषेध केला. हा निकाल धक्कादायक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
‘वी द वुमन ऑफ इंडिया’ या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने वरिष्ठ वकील शोभा गुप्ता यांनी पाठवलेल्या पत्राच्या आधारे ही सर्वोच्च न्यायालयाने या खटल्याची दखल घेतली.
फिर्यादी पक्षाच्या म्हणण्यानुसार, आरोपी पवन आणि आकाश यांनी ११ वर्षीय पीडितेच्या छातीवर हात ठेवून त्यांच्यापैकी आकाशने, तिच्या पायजमाची दोरी तोडली आणि तिला नाल्याखाली ओढण्याचा प्रयत्न केला. हा बलात्काराचा प्रयत्न किंवा लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न असल्याचा खटला असल्याचे आढळून आल्याने, संबंधित ट्रायल कोर्टाने पोक्सो कायद्याच्या कलम १८ (गुन्हा करण्याचा प्रयत्न) सह कलम ३७६ लागू केले. तसेच या कलमांखाली समन्स बजावण्याचे आदेश जारी केले..(SC stays HC ruling)
तथापि, उच्च न्यायालयाने त्याऐवजी आरोपीवर कलम ३५४-ब आयपीसी किरकोळ आरोपाखाली खटला चालवण्याचे निर्देश दिले. या आदेशामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. तसेच अनेकांनी त्यावर टीका केली होती.
हेही वाचा :
Sawant’s demand : कोरटकरला ठेवलेल्या पोलिस स्टेशनमधील सीसीटीव्हीची मागणी
कोल्हापूर : प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला न्यायालयाने तीन दिवसाची पोलिस कोठडी दिली आहे. कोरटकरला ठेवण्यात आलेल्या पोलिस स्टेशन आणि आवारात असलेल्या सीसीटीव्हीचा तपशील इंद्रजीत सावंत यांनी वकिलांमार्फेत पोलिसांकडे मागितला आहे. त्यांनी वकिलामार्फेत तपास अधिकाऱ्यांना या संदर्भात पत्र दिले आहे. दरम्यान कोरकटर याच्या आवाजाचे नमुने आज घेण्यात येणार आहेत. त्याच्या आवाजाच्या नमुने घेण्याची मागणी फिर्यादी पक्षांकडून करण्यात आली आहे. (Sawant’s demand)
राष्ट्रपुरुषांविषयी अवमानकारक वक्तव्य आणि इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी नागपूरच्या प्रशांत कोरटकर याच्याविरोधात जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. कोल्हापूर जिल्हा न्यायालयाने कोरटकरचा जामिन अर्ज फेटाळल्यानंतर कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणातून कोरटकरला अटक केली. त्यानंतर त्याला बुधवारी दि.२५ कोल्हापूरात आणले. त्याला न्यायालयासमोर हजर केले असतात प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्याला तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. पोलिसांनी सात दिवसाची पोलिस कोठडी मागितली होती. (Sawant’s demand)
कोरटकरला राजारामपुरी पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले आहे. या ठिकाणची पोलिस कोठडी अतिशय सुरक्षित असून शहरातील बहुतांशी संशयितांना इथेच ठेवले जाते. कोरटकरला ज्या पोलिस ठाण्यात ठेवले आहे, ज्या पोलिस ठाण्यात तपास केला जाणार आहे, त्या ठिकाणातील संपूर्ण कार्यालय व आवारातील सीसीटीव्ही तपशील इतिहास संशोधक सावंत यांनी एका अर्जाद्वारे जुना राजवाडा पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांकडे मागितला आहे. सावंत यांनी वकील योगेश सावंत, हेमा काटकर, पल्लवी थोरात यांच्यावतीने जुना राजवाडा पोलिस ठाण्याकडे अर्ज दिला आहे. (Sawant’s demand)
अटक होण्यापूर्वी कोरटकर नागपूर येथून पळून गेला होता. १३ मार्च आणि १४ मार्च रोजी तो चंद्रपूर येथील पोलिस मुख्यालयाच्यासमोरील हॉटेलमध्ये होता. तिथे त्याची काही पोलिस अधिकाऱ्यांनी भेट घेतल्याची माहिती पुढे आली आहे. कोरटकरचे पोलिस दल आणि महसुल विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची ओळख आहे. कोरटकरला पळून जाण्यास नागपूर आणि कोल्हापूर पोलिस दलातील अधिकाऱ्यांनी मदत केल्याचा आरोपही होत आहे. या पार्श्वभूमीवर अटक केलेल्या कोरटकरला पोलिस ठाण्यात कोणी भेटायला येण्याची शक्यता असल्याने बचावपक्षाकडून सीसीटीव्हीचा तपशील मागितला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Sawant’s demand)
हेही वाचा :