नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ‘मत अधिकार यात्रा’ रविवारी (१७ ऑगस्ट) सुरू होत आहे. बिहारमधील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनर्विलोकन मोहिमेच्या (SIR) माध्यमातून लोकांच्या मतदानाच्या अधिकारावर झालेल्या कथित हल्ल्याला अधोरेखित करण्यासाठी ही यात्रा काढण्यात येत असल्याचे काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने शनिवारी (१६ ऑगस्ट) सांगितले. (Vote Adhikar Yatra)
पाटणा येथे पत्रकार परिषदेत बोलताना, माजी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अखिलेश प्रसाद सिंह म्हणाले की, लोकसभेतील विरोधी पक्षनेते गांधी हे १ सप्टेंबर रोजी पाटणा येथे होणाऱ्या रॅलीसह ‘मत अधिकार यात्रा’ संपेपर्यंत पंधरा दिवसांहून अधिक काळ बिहारमध्ये राहण्याची शक्यता आहे.
‘‘उद्या, रविवारी श्री. गांधी सासाराम येथून यात्रेला सुरुवात करतील. संबंधित अधिकाऱ्यांकडून सर्व आवश्यक परवानगी घेण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी ही यात्रा इंडिया गटाच्या बाजूने वातावरण निर्मिती करेल,’’ असे ते म्हणाले. (Vote Adhikar Yatra)
एका प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले की, श्री. गांधी यात्रेचे नेतृत्व करण्यासाठी ‘‘जवळपास १५ दिवस बिहारमध्ये राहण्याची शक्यता आहे.’’ ही यात्रा २०, २५ आणि ३१ ऑगस्ट असे तीन दिवस यात्रेला ब्रेक असेल. राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये ही यात्रा जाईल. (Vote Adhikar Yatra)
‘‘सासाराम येथे, राहुल गांधी यांच्यासोबत बिहारमधील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव, आमचे आघाडीतील इतर सहकारी, ज्यात तीन डाव्या पक्षांचाही समावेश आहे तेही सामील होण्याची शक्यता आहे. १ सप्टेंबर रोजी पाटणा येथे होणाऱ्या अंतिम रॅलीसाठी, आम्ही शक्य तितक्या समान विचारसरणीच्या पक्षांच्या नेत्यांना आणण्याचा प्रयत्न करू,’’ असे श्री. सिंह म्हणाले.
- बिहार राज्यात १६ दिवस यात्रा
- वीसहून अधिक जिल्ह्यांत जाणार यात्रा
- जवळपास १३०० किलोमीटर अंतर पार करणार
- ‘एक व्यक्ति, एक मत’ची लढाई