नाशिक : एक महिन्याच्या आत शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी न दिल्यास एकाही मंत्र्याला राज्यात फिरू देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी (१५ सप्टेंबर) येथे दिला. (MP Sule warns Govt)
त्याचवेळी नाशिक जिल्हा बँकेतील गैरकारभाराची चौकशी लावण्याची मागणीही आम्ही करू असे खा. सुळे म्हणाल्या.
राष्ट्रवादीच्या (शरद पवार)वतीने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. (MP Sule warns Govt)
लाल मातीचा कणा असलेला आमचा हा शेतकरी आहे. तुमचा शब्द आम्ही कधी खाली पडू देणार नाही. त्यासाठी आम्हाला कितीही आंदोलने करायला लागली तरी आम्ही करू, पण तुम्हाला न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही, असे आश्वासन सुळे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिले.
आम्ही सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊ, त्यांना विनंती करू, सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी करू, तसेच ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करू. त्यासाठी सरकारला एम महिन्याचा वेळ देऊ. या कालावधीत सरकारने काही कार्यवाही न केल्यास आम्ही सरकारला फिरू देणार नाही, असा इशारा देऊन खा. सुळे म्हणाल्या, ‘‘एकतर आमच्या लाडक्या बहिणींना निधी दिला, पण पहिल्या टप्प्यातच २५ लाख महिलांची नावे त्यातून वगळण्यात आली. हे आम्ही सहन करणार नाही. फौजिया खान आणि रोहिणी खडसे यांच्या नेतृत्वात आम्ही जनआंदोलन उभा करू. गाव-वाडी-वस्त्यांवर जाऊ, ज्या महिलेवर अन्याय केलेला आहे तिच्यासाठी संघर्ष करू आणि तिला पैसे मिळवून देऊ. शेतकरी बांधवांसाठी असाच संघर्ष करू. (MP Sule warns Govt)
आम्हीही कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान होते आणि शरद पवार केंद्रीय कृषीमंत्री होते त्यावेळी एक दोन नाही तर ७० हजार कोटींची कर्जमाफी यूपीए सरकारने केली होती, सातबारा कोरा केला होता, याकडे खा. सुळे यांनी यावेळी लक्ष वेधले. आज ना सरसकट कर्जमाफी होतेय ना शेतकऱ्याला मदत मिळतेय. नाशिक जिल्हा बँकेने ६५ हजार शेतकऱ्यांची नावे कमी केली आणि नवीन कुठली तरी नावे घेतली. या प्रकाराची चौकशी झाली पाहिजे, यासाठी आमचे सर्व खासदार आग्रही राहतील, असे त्या म्हणाल्या.



