नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ग्रीनलँड धोरण आणि युरोपमधील आठ देशांना टॅरिफ लावण्याचा दिलेल्या इशारा याचे पडसाद जागतिक बाजारावर पडल्याने भारतीय शेअर बाजारात त्याचे पडसाद उमटले. बीएसई सेन्सेक्स १००० पेक्षा जास्त अंकानी घसरला. त्याचा फटका गुंतवणूदारांना मोठ्या प्रमाणावर बसला आहे. (BSE Sensex fell by more than 1000 points)
आज शेअर बाजार उघडल्यानंतर निफ्टी ५० आणि बीएसई सेन्सेक्स लाल रंगात उघडले. मंगळवारी एक टक्के घसरण झाली होती. निफ्टी ५० पंचवीस हजाराच्या खाली घसरुन २४,९१९.८० वर व्यवहार करत होता. तर बीएसई सेन्सेक्स एक हजारपेक्षा जास्त घसरुन ८१, १२४ वर पोहोचला. (BSE Sensex fell by more than 1000 points)
गुंतवणूक तज्ज्ञांच्या मते ट्रम्प यांचे ग्रीनलँड धोरणामुळे आणि युरोपधील प्रमुख आठ देशांवर आयात शुल्काच्या घोषणेमुळे बाजारावर परिणाम झाला आहे. ट्रम्प यांनी युरोपरविरोधी कठोर भूमिकेचा पडसाद शेअर बाजार होत आहेत. जागतिक स्तरावर शेअर बाजार खाली आला असून सोने खरेदीकडे ओढा वाढला आहे. भारतीय बाजारपेठेत, परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी गुंतवणूक कमी करण्यास सुरुवात केली आहे. , मंगळवारी त्यांनी २,९३८ कोटी रुपयांच्या इक्विटीजची विक्री केली. देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ३,६६६ कोटी रुपयांच्या निव्वळ खरेदीसह आंशिक आधार दिला, जरी व्यापक जोखीम टाळण्याची शक्यता कमीच आहे. (BSE Sensex fell by more than 1000 points)