चेन्नई : तामिळनाडू सरकारने २१ मंदिरांना भाविकांनी अर्पण केलेले १००० किलोवर सोन्याचे दागिने वितळवले. मंदिराला अर्पण केलेल्या पण वापरात नसलेल्या हे दागिने आहेत. हे दागिने वितळवून त्याचे २४ कॅरेटच्या बारमध्ये रूपांतर करण्यात आले. ते बँकांमध्ये जमा करण्यात आले. सोन्याच्या या बारच्या गुंतवणुकीवर वार्षिक १७.८१ कोटी रुपये व्याज मिळत आहे, असे सरकारने स्पष्ट केले. (Temple’s gold melted)
मंदिरांना अर्पण केलेल्या परंतु देवतांसाठी वापरल्या न जाणारे सोन्याचे दागिने मुंबईतील सरकारी टांकसाळीत वितळवण्यात आले. ते २४ कॅरेटच्या बारमध्ये रूपांतरित करण्यात आले. ते गोल्ड इन्व्हेस्टमेंट योजनेंतर्गत स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये गुंतवण्यात आले.
‘‘या गुंतवणुकीतून मिळणारे व्याज संबंधित मंदिरांच्या विकासासाठी वापरले जाते,’’ असे मंत्री पी. के. शेखर बाबू यांनी विधानसभेत मांडलेल्या हिंदू धार्मिक आणि धर्मादाय देणगी विभागावरील धोरणात्मक नोंदीत म्हटले आहे. (Temple’s gold melted)
योजनेच्या अंमलबजावणीवर देखरेख करण्यासाठी राज्यातील तीनही क्षेत्रांसाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली तीन समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.
३१ मार्च २०२५ पर्यंत सोन्याच्या बारच्या गुंतवणुकीची माहिती सरकारच्यावतीने देण्यात आली. यासंबंधीच्या नोटमध्ये म्हटले आहे की, २१ मंदिरांमधून १०,७४,१२३.४८८ ग्रॅम शुद्ध सोने मिळाले. गुंतवणुकीवेळी सोन्याच्या मूल्यानुसार निर्धारित केलेल्या वार्षिक व्याजाच्या स्वरूपात १,७८१.२५ लाख रुपये मिळाले. (Temple gold melted) या मंदिरांपैकी, तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील समयापुरम येथील अरुलमिगु मरीअम्मन मंदिराने गुंतवणूक योजनेसाठी सर्वाधिक ४,२४,२६६.४९१ ग्रॅम (सुमारे ४२४.२६ किलो) सोने दिले.
हेही वाचा :
बीडमध्ये आणखी एक भयंकर घटना
अपघातग्रस्त रुग्णांसाठी १ लाखापर्यंतचे कॅशलेस उपचार