जमीर काझी : मुंबई : राजकीय रणनीतीकार व बिहार विधानसभेतील नूतन आमदार प्रशांत किशोर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी तब्बल सहा तास केलेल्या दीर्घ चर्चेमुळे दस्तरखुद्द राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपामध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची पदावरुन हटवावे, अशी सूचना केले असल्याचे वृत्त असून त्यामुळे तटकरे व त्यांचे समर्थक टेन्शनमध्ये आले आहेत. तर सध्याच्या घडीला भाजपाच्या कट्टर टीकाकाराशी सलगी केल्याने भाजपा नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. (A lengthy discussion between Sunetra Pawar and PK)
तटकरेंची नाराजी
पीकेने गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची देवगिरी बंगल्यावर भेट घेऊन पक्षात संघटनात्मक बदल सुचवले आहेत. तब्बल सहा तास चाललेल्या या बैठकीत खासदार पार्थ पवारही उपस्थित होते. मात्र तटकरे किंवा अन्य कोणी पदाधिकारी नव्हते. पीकेने पक्षाची प्रतिमा व संघटनात्मक ताकद वाढण्यासाठी अनेक सूचना केल्या असल्याचे सांगितले जात आहे त्यामध्ये प्रामुख्याने सुनील तटकरे यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची थेट शिफारस केल्याच्या चर्चा आहे. त्यामुळे ते अस्वस्थ असून त्यांनी आज पत्रकाराशी बोलताना त्याबद्द्ल अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली. (A lengthy discussion between Sunetra Pawar and PK)
सल्लागांराच्या जीवावर नाही तर दादांनी राज्य पालथे घातल्याने यश
पक्षाने त्यांना सल्लागार नेमल्याचा इन्कार करून आपण प्रत्यक्ष फिल्डवर काम करणारे आहोत .सल्लागाराच्या जीवावर नाहीतर राज्य पालथे घालून अजित दादांनी लोकसभेतील अपयशानंतर विधानसभेत उत्तुंग यश मिळविले असल्याचे सुनील तटकरे यांनी सांगितले. तर पक्षाचे ज्येष्ठ नेते व कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी पीके हे २ महिन्यापासून सल्लागार म्हणून काम करत आहे. त्याचा संघटनात्मक वाढीला फायदा होईल, त्यामुळे भाजपशी वाद होण्याचा प्रश्न उपस्थित होत नाही, असे सांगितले. राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी स्पष्ट केले की, ही भेट पक्ष बळकट करण्यासाठी आणि सरकारी योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठीच्या नियोजनाचा एक भाग होती.
भाजपा का नाराज
जन सुराज पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर (पीके ) गेल्या दोन वर्षापासून भाजपाविरोधात उघडपणे भूमिका घेत आहेत. त्यांनी नुकतीच बिहारमधील हाय-प्रोफाइल बांकीपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवला.त्यांनी भाजपचा ३० वर्षांचा जुना बालेकिल्ला उद्ध्वस्त केला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी राजीनामा दिल्याने या पदावर पोटनिवडणूक झाली होती. (A lengthy discussion between Sunetra Pawar and PK)