Home » Blog » Budget session : विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ मार्चपासून

Budget session : विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ मार्चपासून

१० मार्चला सादर होणार अर्थसंकल्प

by प्रतिनिधी
0 comments
Budget session




मुंबई : प्रतिनिधी : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत सोमवार, ३ मार्चपासून सुरू होत आहे. ते बुधवार २६ मार्च २०२५ अखेर सुरू राहील. राज्याचा अर्थसंकल्प १० मार्च रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात येणार आहे.
विधानभवन मुंबई येथे विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक रविवारी झाली. यावेळी अधिवेशनाच्या कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली.
या बैठकीला विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री सर्वश्री राधाकृष्ण विखे पाटील, गिरीष महाजन, शंभुराज देसाई, आमदार सर्वश्री प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, ॲड.अनिल परब, हेमंत पाटील, श्रीकांत भारतीय, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, डॉ. नितीन राऊत, रणधीर सावरकर, अमिन पटेल, विधिमंडळ सचिव (१) जितेंद्र भोळे, सचिव (२) विलास आठवले यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाल्या होत्या.
अर्थसंकल्पीय अधिवेशन कालावधीत शनिवार, ८ मार्च रोजी सार्वजनिक सुटीच्या दिवशी विधिमंडळाचे कामकाज सुरू राहील, तर १३ मार्चरोजी होळी निमित्त कामकाजास सुटी देण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले.
हेही वाचा :

संसदेत घुमणार ‘शट अप मोदी’चा नारा

माझा जन्म जैविक नाही म्हणतो त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा?

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00