कोल्हापूर : प्रतिनिधी : आजरा येथे जुन्या घराची भिंत अंगावर कोसळल्याने प्राध्यापिका आणि विद्यार्थीनी ठार झाल्या. एक महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर गडहिंग्लज येथे उपचार सुरू आहेत. सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास आजऱ्यातील वाणी गल्लीत ही घटना घडली. प्रा.ज्योती नितीन कुंभार (वय ४५) आणि वैष्णवी तुकाराम भोसले (१४) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. ललिता तुकाराम भोसले (४२) या जखमी झाल्या आहेत. (Wall Collapse in Ajra Kills Female Professor and Student)
वाणी गल्लीत डॉ. देशपांडे यांच्या जुन्या घराची भिंत जेसीबीच्या सहाय्याने पाडली जात होती. भिंत पाडत असताना ती अचानक कोसळली. यावेळी रस्त्यांवरुन जाणाऱ्या प्रा.ज्योती कुंभार, वैष्णवी भोसले यांच्या अंगावर पडली. तर ललिता भोसले यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. यावेळी मोठा आवाज झाला. नागरिक घटनास्थळी धावले. त्यांनी ढिगारा हटवण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतले. पण भिंत दगड मातीची असल्याने ज्योती कुंभार आणि वैष्णवी भोसले या जागीच ठार झाल्या. घटनास्थळी नगराध्यक्ष अशोक चराटी, तहसीलदार समीर माने, नायब तहसीलदार विकास कोलते, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल पाटील यांनी भेट दिली. (Wall Collapse in Ajra Kills Female Professor and Student)