Home » Blog » Bhaskar Jadhav: विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधव यांचे नाव निश्चित

Bhaskar Jadhav: विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधव यांचे नाव निश्चित

काँग्रेस विधान परिषदेवर दावा करण्याची शक्यता

by प्रतिनिधी
0 comments
Bhaskar Jadhav

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदासाठी शिवसेनेने (ठाकरे गट) मंगळवारी आमदार भास्कर जाधव यांचे नाव सुचवले. तसे पत्र ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना देण्यात आले. त्यामुळे काँग्रेस आता विधान परिषदेवर दावा सांगण्याची शक्यता आहे.(Bhaskar Jadhav)

२८८ सदस्य संख्या असलेल्या विधानसभेत विरोधी पक्षांची एकत्रित संख्या जवळपास ५० आहे. महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. ते २६ मार्च दरम्यान चालणार आहे. या पार्श्वभूमीवर भास्कर जाधव यांचे नाव ठाकरे गटाने पुढे केले आहे.

२८८ जागांपैकी १० टक्के किंवा २९ जागा असलेला पक्ष या पदावर दावा करू शकतो. तथापि, सध्या विधानसभेच्या नियमांनुसार महाविकास आघाडीतील घटक पक्षांपैकी कोणत्याही पक्षाकडे तेवढ्या जागा नाहीत. शिवसेने (ठाकरे) ची विधानसभेतील सदस्यसंख्या सध्या २० आहे. काँग्रेस १६ आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसकडे १० जागा आहेत. (Bhaskar Jadhav)

शिवसेनेने विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदावर दावा केल्यास विधान परिषदेत आम्हाला हे पद हवे, असास दावा काँग्रेसने या आधीच केलेला आहे. सध्या, शिवसेने (ठाकरे) चे अंबादास दानवे हे परिषदेत विरोधी पक्षनेतेपदावर आहेत, परंतु त्यांचा सदस्यत्वाचा कार्यकाळ ऑगस्ट २०२५ मध्ये संपत आहे. (Bhaskar Jadhav)

शिवसेना विधानसभेच्या सभापतिपदावर दावा दावा करेल. आमदारांची संख्या कमी असली तरी, विरोधी पक्षनेत्याशिवाय सभागृहाचे कामकाज चालावे, अशी कोणतीही तरतूद किंवा कायदा संविधानात तरतूद नाही, असे खासदार संजय राऊत राऊत म्हणाले.

हेही वाचा :

फडणवीस, अजित पवारांची अब्रू धुळीला मिळवून धनंजय मुंडे यांचा राजीनामा

मुंडेंच्या राजीनाम्याने सरकारवरील रक्ताचे डाग धुऊन निघणार नाहीत…

संतोष देशमुख हत्या ते मुंडेंचा राजीनामा

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00