Home » Blog » Bhandara Blast : भंडाऱ्यात भीषण स्फोट, सात कामगार ठार

Bhandara Blast : भंडाऱ्यात भीषण स्फोट, सात कामगार ठार

डिफेन्स फॅक्टरीतील दुर्घटना, पाच गंभीर

by प्रतिनिधी
0 comments
Bhandara Blast

भंडारा : भंडारा येथील डिफेन्स फॅक्टरीत भीषण स्फोट झाला. त्यात सात जणांचा जागीच मृत्यू झाला. पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. डिफेन्स फॅक्टरीत शस्त्रात्रे, दारुगोळा निर्मिती केली जाते. सकाळी पावणे अकराच्या सुमारास ही भीषण दुर्घटना घडली.(Bhandara Blast)
भंडारा शहरापासून १५ किलोमीटर अंतरावर जवाहरनगरजवळ भंडारा शस्रास्रे आणि दारुगोळा फॅक्टरी आहे. त्याठिकाणी उच्च् दर्जाचे तोफगोळे आणि स्फोटकांची निर्मिती केली जाते. त्यासाठी वेगवेगळ्या इमारती आहेत. कारखान्यातील लो टेंपरेचर प्लास्टिक एक्स्प्लोसिव्ह (एलटीपीई) इमारतीत स्फोटक बनवण्याचे काम सुरू होते. त्यावेळी मोठा स्फोट झाला. (Bhandara Blast)
शक्तीशाली स्फोटात मोठी इमारत जमीनदोस्त झाली. काम करणाऱ्या कामगारांच्या चिंधड्या उडाल्या. स्फोटामुळे आजूबाजूच्या परिसराला मोठा हादरा बसला. स्फोटाच्या आवाजाची तीव्रता इतकी होती आवाज दहा ते बारा किलोमीटर अंतरावरील गावांत धडकला. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. स्फोटानंतर फॅक्टरीतून सायरन वाजू लागला. आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी कारखान्याच्या दिशेने धाव घेतली.(Bhandara Blast)
जिल्हाधिकारी संजय कोलते, पोलीस अधीक्षक नरुल हसन, आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यासह अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाचे बंब, रुग्णवाहिका आणि मोठ्या क्रेन बोलावण्यात आल्या. स्फोटामुळे दबल्या गेलेल्या इमारतीतील ढिगारे उपसण्याचे काम सुरू आहे. नऊ व्यक्तींना बाहेर काढण्यात आले. त्यापैकी चौघांचा मृत्यू झाला. नंतर तिघांचे मृतदेह सापडले. पाच जखमींना हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल करण्यात आले.(Bhandara Blast)

हेही वाचा :
पोलीस ठाण्यात दारु पार्टी आणि छमछम

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00