मुंबई : विशेष प्रतिनिधी : न्यू इंडिया को ऑप बँक लिमिटेड बँकेच्या माजी जनरल मॅनेजरनेच बँकेत १२२ कोटीचा डल्ला मारल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. हितेश प्रविणचंद मेहता असे या ठकसेनाचे नाव आहे. त्याने दादर व गोरेगावच्या शाखेतून त्यानेही रक्कम बाहेर काढली. मुंबई पोलिसांनी त्याच्यासह अनेकांवर गुन्हा दाखल केला असून तपास आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखेकडे सोपविण्यात आला आहे.(Bank fraud)
रिझर्व्ह बँकेने या बँकेवर गुरुवारपासून आर्थिक निर्बंध घातले आहेत. त्यामुळे हजारो ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये अडकून पडले आहेत.
हितेश मेहताकडे बँकेचा जनरल मॅनेजर आणि चीफ अकाउंटंट पदाचा कार्यभार होता. त्याच्यावर दादर आणि गोरेगाव बँकेची जबाबदारी होती. त्यावेळी त्याने पदाचा गैरवापर करून २०२० ते २०२५ या कालावधीत दोन्ही शाखेच्या खात्यावरून १२२ कोटीचा अपहार केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी दादर पोलिस ठाण्यात बँकेच्या चिफ अकाऊंटिंग अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. या गैरव्यवहारात हितेशसह अन्य एका व्यक्तीचा समावेश असल्याचा संशय आहे. त्या अनुषंगाने पोलिस तपास करत आहेत. (Bank fraud)
२०२० ते २०२५ दरम्यान गैरव्यवहार
या प्रकरणाचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसाकडे पुढील तपासासाठी वर्ग केला आहे. याच बँकेवर आरबीआयकडून निर्बंध लावण्यात आले. त्यामुळे बँकेला १३ फेब्रुवारीपासून कोणतेही आर्थिक व्यवहार करता येणार नाहीत. तसेच ग्राहकांनाही पैसे जमा किंवा काढता येणार नाही. बँकेतील सर्व प्रकारच्या अत्यावश्यक कामावरही आरबीआयने पुढील सहा महिन्यांसाठी बंदी घातली आहे. २०२० ते २०२५ च्या दरम्यान हा गैरव्यवहार झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. (Bank fraud)
हेही वाचा :