कोल्हापूर : प्रतिनिधी : उत्तरेश्वर चषक फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी (दि.२१) झालेल्या सामन्यात बालगोपाल तालीम मंडळाने प्रॅक्टीस फुटबॉल क्लबचा २-० अशा फरकाने पराभव केला. यजमान उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळाने सम्राटनगर स्पोर्ट्सवर २-१ अशा गोलफरकाने मात करत पुढील फेरीत प्रवेश केला उत्तरेश्वर तालीम मंडळ आयोजित ही स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरु आहे. (Balgopal win)
शुक्रवारी सकाळी झालेल्या सामन्यात प्रॅक्टीस क्लब विरुद्ध बालगोपाल तालीम या दोन संघांतील सामना चुरशीचा झाला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांकडून आक्रमक खेळ झाला.दोन्हीं संघाकडून गोल करण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. २६ व्या मिनिटाला बालगोपालकडून झालेल्या चढाईत लोएन गंबा याने गोल नोंदवत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. मध्यंतराच्यावेळी बालगोपाल संघ १-० असा आघाडीवर होता. (Balgopal win)
उत्तरार्धातील खेळावर बालगोपालचा आक्रमक पवित्रा कायम होता. ७५ व्या मिनिटाला प्रथमेश जाधवने गोल नोंदवून संघाला २-० असे आघाडीवर नेले. दोन गोलची आघाडी कायम टिकवत बालगोपालने सामना जिंकला. बालगोपालकडून रोहित कुरणे, सार्थक जाधव, ऋतूराज पाटील, सागर पोवार,आशिष कुरणे यांनी तर प्रॅक्टीसकडून साहिल डाकवे, ओम घाटगे, रिषी छेत्री, साईराज पाटील यांचा चांगला खेळ झाला. (Balgopal win)
दुपारच्या सत्रातील यजमान उत्तरेश्वर तालीम विरुद्ध सम्राटनगर स्पोर्ट्स यांच्यातील सामना चुरशीचा झाला. सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटाला केलेल्या चढाईत उत्तरेश्वरच्या शुभम जाधवने दिलेल्या पासवर दिग्विजय वाडेकर याने हेडद्वारे गोल नोंदवत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. परतफेड करण्यासाठी सम्राटनगरने जोरदार चढाया केल्या. सामन्याच्या ३२व्या मिनिटाला सम्राटनगरकडून झालेल्या चढाईत अभिषेक सिंग याने हेडद्वारे गोल करत सामना १-१ असा बरोबरीत आणला. मध्यंतरापर्यंत गोलफलक १-१ असा बरोबरीत राहिला . (Balgopal win)
उत्तरार्धाच्या सुरवातीपासूनच दोन्ही संघांकडून आघाडीसाठी पुन्हा जोरदार प्रयत्न सुरु झाले. ४५व्या मिनिटाला उत्तरेश्वरच्या विवेक पाटीलने गोल नोंदवून संघाला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. उत्तरेश्वरकडून स्वराज पाटील, तुषार पुनाळकर, रोषन रिकामे, विवेक पाटील यांनी चांगल्या चढाया केल्या. सम्राटनगरकडून गोल फेडण्यासाठी जोरदार प्रयत्न केले गेले. त्यांच्या ओंकार जाधव, अभिषेक सिंग, यूनुस नदाफ, अक्षय मोळे, निरंजन कामते यांनी केलेले प्रयत्न उत्तरेश्वरच्या बचावापुढे फोल ठरल्या. उत्तरेश्वरची एक चढाई सम्राटनगरचा गोलरक्षक रणवीर खालकर याने गोलक्षेत्राबाहेर जावून हाताने रोखली, त्यामुळे पंचांनी त्याच्यावर रेडकार्डची दाखवून कारवाई केली. अखेर हा सामना उत्तरेश्वरने २-१ अशा फरकाने जिंकला. (Balgopal win)
सामनावीर: विवेक पाटील (उत्तरेश्वर तालीम), महंमद फरास (बालगोपाल तालीम)
लढवय्ये खेळाडू: ओंकार जाधव (सम्राटनगर स्पोर्ट्स), आकाश बावकर (प्रॅक्टीस क्लब)
शनिवारचे सामने: वेताळमाळ तालीम मंडळ वि. फुलेवाडी क्रीडा मंडळ, सकाळी ७.३० वा.
पाटाकडील तालीम मंडळ अ वि. रंकाळा तालीम मंडळ, दुपारी ४.००वा.
हेही वाचा :