Home » Blog » Badal babu : यूपीचा ‘मजनू’ पाकिस्तानची ‘लैला’…

Badal babu : यूपीचा ‘मजनू’ पाकिस्तानची ‘लैला’…

प्रेमाच्या बेड्याऐवजी पोलिसांच्या बेड्यात अडकला

by प्रतिनिधी
0 comments
Badal babu

अलीगड : व्हॅलेंटाईन डे विक सुरू झाला आहे. लैला मजनूंच्या भेटी गाठी सुरू झाला आहेत. अशाच एका सत्य घटनेत प्रेमापोटी उत्तर प्रदेशातील एक मजनू थेट पाकिस्तानाची सीमा ओलांडून लैलाला भेटायला गेला. लैलासाठी धर्मांतर केले. पण लैलाने नकार दिला. पाकिस्तानी पोलिसांनी बेकायदा घुसखोरीचा आरोप ठेवून त्याला तुरुंगात धाडले. त्यांच्या सुटकेसाठी पाकिस्तानातील न्यायालयात सुनावणी सुरू आहेत. (Badal babu)

उत्तर प्रदेशातील अलिगड येथील वीस वर्षीय बादल बाबूची दोन वर्षांपूर्वी सोशल मीडियावर पाकिस्तानी युवती सना राणीशी ओळख झाली. ऑनलाइन चॅटिंग सुरू झाले. दोघे प्रेमात आकंठ बुडाले. प्रेमाच्या आणाभाका घेतल्या. नाते घट्ट झाले.  सना राणींच्या प्रेमात वेडा झालेल्या बादल बाबूने तिला भेटण्यासाठी पाकिस्तानाला जाण्याचा निर्णय घेतला.  कडक सुरक्षा असलेल्या अटारी वाघा सीमेवरुन तो पाकिस्तानात पोहोचला. पाकिस्तानमधील पंजाब प्रातांतील मंडी बहाउद्दीन जिल्ह्यातील बिलावल कॉलनीत सनाच्या घराजवळ मेंढपाळ म्हणून काम करु लागला. कोणाला संशय येऊ नये म्हणून त्याने मुस्लीम धर्म स्वीकारला. कामाधंदानिमित्त कराचीहून आलो असल्याचे त्याने सांगितले. पण, पाकिस्तानी पोलिसांनी २७ डिसेंबरला त्याला अटक केली. (Badal babu)

बादलला मेंढपाळ म्हणून कामावर ठेवणारा हाजी खान असगर म्हणाला की, माझ्याजवळ आलेल्या तरुणाने कामासाठी संपर्क केला. नंतर त्याने सना राणीशी असलेले प्रेमसंबंध उघड केले. असगरला समजले की, सना आणि तिच्या आईने सुरवातीला बादलला मंडी बहाउद्दीनला बोलावले होते, पण त्याची परिस्थिती लक्षात आल्यावर सनाने त्याचा प्रस्ताव नाकारला आणि तो पाकिस्तानात अडकला. (Badal babu)

कोर्टात बादलची सुनावणी सुरू आहे. लाहोर येथील वकील फयाज रामे यांनी सांगितले की, भारतात परतण्याची बादलला भीती वाटते. त्याने असे दावा केला की त्याने केलेल्या धर्मांतरामुळे त्याला धोका होऊ शकतो. वकील रामे यांनी मानवतावादी आधारावर खटला चालवला. त्यांना बादलचे वडील, अलिगडमधील नागला खिटकरी येथील किरपाल सिंग यांच्याकडून पॉवर ऑफ अॅटर्नी मिळाली आहे. (Badal babu)

अलिकडेच झालेल्या सुनावणीत बादलला अलिगडमधील पालकांसमवेत व्हिडिओ कॉलवर बोलण्याची परवानगी देण्यात आली. न्यायालयाबाहेर हातकड्या घालून तो कुटुंबाशी बोलला तेव्हा तो धाय मोकलून रडत होता. वकील रामे यांनी म्हटले आहे की बेकायदेशीरपणे सीमा ओलांडल्याच्या बादलच्या जबाबाची छाननी केली जात आहे. पुढील सुनावणी २१ फेब्रुवारीला होणार आहे.

हेही वाचा :

बारा माओवाद्यांचा खात्मा
‘आप’ने १३ जागा कशा गमावल्या?

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00