मुंबई; प्रतिनिधी : देशासमोर कुठल्याही प्रकारची समस्या सोडविण्याचा उपाय भारतीय संविधानात आहे. असे जगात सर्वात सुंदर असलेले संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिले आहे. इंदू मिल परिसरात सुरू असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जागतिक दर्जाच्या स्मारकाचे काम गतीने पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्रीद्वय अजित पवार आणि एकनाथ शिंदे, राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी अभिवादन केले. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. (Devendra Fadnavis)
मुंबई : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चैत्यभूमी येथे जाऊन अभिवादन केले.
मुंबई : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी चैत्यभूमी येथे जाऊन अभिवादन केले.
मुंबई : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी आयोजित कार्यक्रमावेळी डॉ. नरेंद्र जाधव यांच्या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याहस्ते करण्यात आले.
हेही वाचा :
- ‘छत्रपतींनी दिलेला मानाचा जरीपटका माझ्या मस्तकी चढविला. त्याचा सदैव मान राखीन…’ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर
- महाप्रज्ञासूर्यास महाअभिवादन !
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय रिझर्व्ह बँक