प्रतिनिधी
प्रतिनिधी
मराठी भाषेतील स्वतंत्र माध्यम. अन्यायग्रस्तांच्या बाजूने पक्षपाती. ज्या घटकांना आवाज नाही, त्यांचा आवाज. सत्तेला प्रश्न विचारण्याबरोबरच विधायक बाबींचा खंबीर पाठपुरावा. संपादकः विजय चोरमारे
कोल्हापूर; प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकांचा आखाडा सजलाय आणि या आखाड्यात लढण्यासाठी महाविकास आघाडीसह महायुतीमधील पैलवान तयार आहेत. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीसह महायुतीमध्ये विधानसभेच्या २८८ मतदारसंघाच्या आखाड्यात कोणता पैलवान कोणत्या चिन्हावर उतरणार याच जागावाटप सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्रात राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा जिल्हा असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघा पैकी २ जागांवरील उमेदवार आता भाजपने घोषित केले आहेत. (Maharashtra Assembly Election)
निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागावाटपासाठी रात्रंदिवस बैठकांचे सत्र सुरू आहे. दोन्ही बाजूला बहुतांश जागा आणि उमेदवार निश्चित झाले आहेत. अशातच भाजपने आज (दि.२०) आपली पहिली यादी प्रसिद्ध केली असून यामध्ये राज्यातील 99 उमेदवार जाहीर झाले आहेत. यामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमधील उमेदवार सुद्धा घोषित करण्यात आले आहेत. कोल्हापूर दक्षिण मधून माजी आमदार अमल महाडिक यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर इचलकरंजी मधून नुकतच भाजपमध्ये प्रवेश केलेले आमदार प्रकाश आवाडे यांचे चिरंजीव राहुल आवाडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
कोल्हापूर दक्षिणमध्ये अमल महाडिक विरूद्ध ऋतुराज पाटील सामना रंगणार
कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ म्हणजे सतेज पाटील यांचा बालेकिल्ला आणि यंदा देखील दक्षिणच्या या रणांगणात पाटील विरुद्ध महाडिक असा सामना पाहायला मिळणार आहे. भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या ९९ उमेदवारांच्या यादीत अमल महाडिक यांच कोल्हापूर दक्षिणमधून नाव जाहीर करण्यात आला आहे. तर विद्यमान आमदाराला पुन्हा तिकीट या फॉर्मुलानुसार महाविकास आघाडीतून काँग्रेसच्या चिन्हावर सतेज पाटील यांचे पुतणे आमदार ऋतुराज पाटील यांना पुन्हा तिकीट मिळणार आहे. यामुळे अमल महाडिक यांना २०१९ च्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी संधी मिळाली आहे. (Maharashtra Assembly Election)
इचलकरंजी मतदारसंघात राहुल आवाडे मैदान मारण्याच्या तयारीत मात्र कट्टर भाजप कार्यकर्ते नाराज
मँचेस्टर सिटी म्हणून ओळख असलेल्या इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात गेल्या अनेक दशकांपासून आवाडे कुटुंबियाचं वर्चस्व आहे. २०१९ च्या निवडणुकीत प्रकाश आवाडे यांनी काँग्रेसला राम राम ठोकत अपक्ष निवडणूक लढवली आणि भाजपचे उमेदवार सुरेश हाळवणकर यांचा ४९,८१० मतांनी पराभव केला. मात्र कालांतराने आवाडे यांनी भाजपला पाठिंबा देत मित्र पक्ष झाले. यानंतर गेल्या ५ वर्षात आवाडे यांची भाजपशी वाढलेली जवळीक हाळवणकर यांना हानिकारक ठरत होती. यामुळे आवाडे हाळवणकर यांच्यातील राजकीय संघर्ष शिघेला पोचलेल असताना, गेल्या महिन्यातच आवाडे पिता पुत्रांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजप मध्ये प्रवेश केला. असे असले तरी इचलकरंजी मधील जुने भाजप कार्यकर्ते आणि हाळवणकर गटातील कार्यकर्ते नाराज आहेत. अशातच आता प्रकाश आवाडे यांचे चिरंजीव राहुल आवाडे यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. यामुळे आवाडे यांना ही निवडणूक वाटत तितक सोपी नसणार आहे.यामुळे भाजपच्या या दोन पैलवान कश्या पद्धतीने आपला डाव खेळणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
हेही वाचा :
देशभक्त रत्नाप्पान्ना कुंभार यांचे कार्य अनेक पिढ्यांना दिशादर्शक : दामोदर मावजो
जयसिंगपूर; प्रतिनिधी : देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांचे कार्य आजच्या पिढीला दिशादर्शक आहे. सहकार, समाजकारणाच्या माध्यमातून अण्णांनी भरपूर काम केले आहे. त्यांचे हे कार्य, विचार मंचच्या माध्यमातून तेवत राहील. गेले अनेक वर्षे विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करण्याची परंपरा विचार मंचने जपले असल्याचे प्रतिपादन ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावजो यांनी केले. (Kolhapur)
जयसिंगपूर येथे देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या ११५ व्या जयंतीनिमित्त देशभक्त .रत्नाप्पाण्णा कुंभार विचार मंचच्या वतीने पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. स्वागत भाषणात दे.भ.रत्नाप्पाण्णा कुंभार विचार मंचचे अध्यक्ष लक्ष्मीकांत उर्फ बंडा मिणियार म्हणाले, पुरस्कार विजेत्यांचा गौरव करण्यासाठी गेल्या १८ वर्षांपासून पुरस्कार वितरण सोहळा सुरू आहे. आण्णांचे विचार समाज्यात रुजविण्यासाठी माझे प्रयत्न सुरू असून ते कायम राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी ॲड. सुरेश कुऱ्हाडे म्हणाले, मंचचे अध्यक्ष लक्ष्मीकांत उर्फ बंडा मिणियार यांनी स्व. रत्नप्पाण्णा कुंभार यांचे कार्य विचार पुरस्काराच्या माध्यमातून जपले आहे. मंचच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील गुणवंत रत्नांचा गौरव केला आहे. बंडा मिणियार हेच स्व. कुंभार यांच्या विचाराचे वारसदार असल्याचे त्यांनी सांगितले.
गोकूळचे चेअरमन अरुण डोंगळे, काँग्रेसचे माजी सरचिटणीस सुरेशराव कुराडे, श्रीमती सरोज पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावजो यांना देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार जीवन गौरव पुरस्कार, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विश्वभर चौधरी यांना देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार समाज भूषण पुरस्कार, ख्यातनाम विद्रोही कवी अनंत राऊत यांना देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार साहित्यरत्न व जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष कै.डॉ.एस.के.पाटील यांना मणोत्तर देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार क्रांती पुरस्कार डॉ.श्रीवर्धन पाटील यांनी स्वीकारला तर इतरांना देण्यात आला.
यावेळी सौ. रजनीताई मगदूम, पुंडलिकराव जाधव, चंद्रकांत जाधव-घुणकीकर, बाबगोंडा पाटील, अशोकराव घोरपडे, अमरसिंह निकम, सुभाष भोजणे, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या शोभा कोळी, मुसा डांगे, चंद्रकांत चव्हाण, अशोकराव कोळेकर, श्रीमती स्वाती घाटगे यांच्यासह कुंभार गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते. सौ. मंजू मिणियार यांनी मानपत्राचे वाचन केले. सौ प्राजक्ता पाटील यांनी सूत्रसंचालन केले. (Kolhapur)
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : भारताने दिलेल्या १०७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना किवीने संघाने ८ गडी राखून विजय मिळवला. दुसऱ्या डावात जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज अचुक मारा करत किवी फलंदाजांना घाम फोडला. परंतु, भारतीय गोलंदाजांना विकेट घेण्यात यश मिळाले नाही. पहिल्या डावातील कमी धावसंख्येमुळे भारताचे नुकसान झाले. या विजयासह किवी संघाने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. पुढील सामना २४ ऑक्टोबरपासून पुण्यात होणार आहे. (IND vs NZ Test)
बंगळुरू कसोटीच्या पहिला डावात भारताने अवघ्या ४६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा पहिला डाव ४०२ धावांवर आटोपला. यामुळे किवी संघाकडे ३५६ धावांची आघाडी होती. दुसऱ्या डावात भारतीय संघाने सर्वबाद ४६२ धावा करत १०६ धावांची आघाडी घेतली. प्रत्युत्तरात न्यूझीलंडने २७.४ षटकांत २ गडी गमावून हे आव्हान पार केले. न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमची (0) आणि डेव्हॉन कॉनवेची (१७) च्या रूपात दोन फलंदाज बाद झाले. रचिन रवींद्र ३९ धावांवर नाबाद राहिला तर विल यंगने ४५ धावांची नाबाद खेळी केली. यावेळी दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ७२ धावांची भागीदारी केली.
३६ वर्षांनी भारतामध्ये विजय
बंगळुरू कसोटीत विजय मिळवून न्यूझीलंडने ३६ वर्षांनी भारतात विजय मिळवला. यापूर्वी १९६९साली ग्रॅहम डॉलिंगच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडने नागपुर कसोटीत भारताचा १६७ धावांनी पराभव केला होता. तर, १९८८ साली जॉन राईटच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडने वानखेडे स्टेडियमवर भारताचा १३६ धावांनी पराभव केला होता. किवी संघाने भारतात प्रथमच लक्ष्याचा पाठलाग करताना विजय मिळवला आहे. यासह भारताचा कसोटीतील सलग विजयी मालिकाही संपुष्टात आली.
भारताचा पहिला डाव
पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे पूर्णपणे वाहून गेला. त्यादिवशी नाणेफेकही होऊ शकली नाही. दुसऱ्या दिवशी नाणेफेक झाली आणि भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहितचा हा निर्णय चुकीचा ठरला आणि भारताचा पहिला डाव ४६ धावांवर आटोपला. भारतीय फलंदाजीची क्रमवारी पत्त्याच्या घरासारखी कोसळली. फलंदाजीमध्ये संघाच्या पाच फलंदाजांना खातेही उघडता आले नाही. यामध्ये विराट कोहली, सरफराज खान, केएल राहुल, रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन यांचा समावेश आहे. ऋषभ पंतने सर्वाधिक २० धावा केल्या. तर यशस्वी जैस्वालने १३ धावांची खेळी केली. रोहित शर्मा दोन धावा करून बाद झाला तर जसप्रीत बुमराह एक धाव काढून बाद झाला. (IND vs NZ Test)
न्यूझीलंडचा पहिला डाव
न्यूझीलंडचा पहिला डाव ४०२ धावांवर आटोपला. रचिन रवींद्रने १५७ चेंडूत १३४ धावांची शानदार खेळी केली. त्याने आपल्या खेळीत १३ चौकार आणि ४ षटकार लगावले. कुलदीप यादवने त्याला बदली यष्टिरक्षक ध्रुव जुरेलकरवी झेलबाद केले. डॅरिल मिशेल (१८), टॉम ब्लंडेल (५), ग्लेन फिलिप्स (१४) आणि मॅट हेन्री (८) यांना फारशी खेळी करता आली नाही. यानंतर रचिनने टीम साऊदीसोबत आठव्या विकेटसाठी १३७ धावांची भागीदारी केली.
रचिनने आपल्या कसोटी कारकिर्दीतील दुसरे शतक झळकावले, तर सौदीने कसोटी कारकिर्दीतील सातवे अर्धशतक झळकावले. अर्धशतक झळकावल्यानंतर सौदी सिराजचा बळी ठरला. तो ७३ चेंडूंत पाच चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने ६५ धावा करून बाद झाला. इजाजला चार धावा करता आल्या. तत्पूर्वी, लॅथम १५, विल यंग ३३, डॅरिल मिशेल १८ धावा करून बाद झाला. भारताकडून कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी तीन बळी घेतले. तर मोहम्मद सिराजने दोन विकेट घेतल्या. जसप्रीत बुमराह आणि आर अश्विनने प्रत्येकी एक विकेट घेतली. (IND vs NZ Test)
भारताचा दुसरा डाव
भारतीय संघाने दुसऱ्या डावात दमदार पुनरागमन करत ४६२ धावा केल्या. फलंदाजीत भारताने ३ फलंदाज गमावून ४०८ धावा केल्या होत्या. यानंतर अवघ्या ५४ धावांत टीम इंडियाने उर्वरित सात फलंदाज गमावले. सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ७२ धावांची भागीदारी केली होती. यशस्वी ३५ धावा करून बाद झाला तर रोहित ६३ चेंडूत ८ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ५२ धावा करून बाद झाला. यानंतर विराट कोहलीने सर्फराज खानसोबत तिसऱ्या विकेटसाठी १३६ धावांची भागीदारी केली. कोहली १०२ चेंडूंत आठ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ७० धावा करून बाद झाला.
यादरम्यान सर्फराजने कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. त्याने १९५ चेंडूंत १८ चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने १५० धावांची खेळी केली. ऋषभ पंतचे शतक एका धावेने हुकले. तो १०५ चेंडूंत नऊ चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने ९९ धावा करून बाद झाला. भारताची खालची ऑर्डर अपयशी ठरली. केएल राहुल १२, रवींद्र जडेजा ५, आर अश्विन १५ धावा करून बाद झाला. त्याचवेळी बुमराह आणि सिराज यांना खातेही उघडता आले नाही. भारतीय संघाकडे १०६ धावांची आघाडी होती. न्यूझीलंडकडून मॅट रेनी आणि विल्यम ओरूर्कने प्रत्येकी तीन बळी घेतले. एजाज पटेलला दोन, तर टीम साऊथी आणि ग्लेन फिलिप्सला प्रत्येकी एक विकेट मिळाली.
New Zealand win the First Test by 8 wickets in Bengaluru.#TeamIndia will look to bounce back in the Second Test.
Scorecard ▶️ https://t.co/8qhNBrs1td#INDvNZ | @idfcfirstbank pic.twitter.com/6Xg4gYo8It
— BCCI (@BCCI) October 20, 2024
हेही वाचा :
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्रात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणूकीसाठी भाजपाने ९९ जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. पहिल्या यादीत उपमुख्यमंत्री देवेंद्रे फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि खासदार अशोक चव्हाण यांच्या मुलीचा समावेश आहे. तर कोल्हापूर दक्षिणमधून माजी आमदार अमल महाडिक यांना उमेदवारी दिली आहे. भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तसेच काही जणांची तिकीट कापण्यात आले आहे. तर अनेक ठिकाणी विद्यमान आमदारांना संधी देण्यात आली आहे. ( BJP Candidates List)
पहिल्या यादीमध्ये १३ महिलांचा समावेश
भोकर मतदार संघातून श्रीजा चव्हाण, नाशिक पश्चिम मतदार संघातून सिमाताई हिरे, चिखंलीमधून श्वेता महाले, जिंतूरमधून मेघना बोर्डिकर, फुलंबरी येथून अनुराधा चव्हाण, कल्याण पूर्वमधून सुलभा गायकवाड, बेलापूर मतदानसंघातून मंदा म्हात्रे, दहिसर येथे मनिषा चौधरी, गोरेगाव येथून विद्या ठाकुर, पार्वती मतदारसंघातून माधुरी मिसाळ, शेवगावमधून मोनिका राजले, श्रीगोंडा येधून प्रतिभा पाचपुते, कैजमधून नमिता मंदुडा.
भाजपाच्या उमदेवारांची संपूर्ण यादी :
- नागपूर पश्चिम – देवेंद्र फडणवीस
- कामठी -चंद्रशेखर बावनकुळे
- शहादा – राजेश पाडवी
- नंदूरबार- विजयकुमार गावीत
- धुळे शहर -अनुप अग्रवाल
- सिंदखेडा – जयकुमार रावल
- शिरपूर – काशीराम पावरा
- रावेर – अमोल जावले
- भुसावळ – संजय सावकारे
- जळगाव शहर – सुरेश भोळे
- चाळीसगाव – मंगेश चव्हाण
- जामनेर -गिरीश महाजन
- चिखली -श्वेता महाले
- खामगाव – आकाश फुंडकर
- जळगाव (जामोद) – संजय कुटे
- अकोला पूर्व – रणधीर सावरकर
- धामगाव रेल्वे – प्रताप अडसद
- अचलपूर – प्रवीण तायडे
- देवली – राजेश बकाने
- हिंगणघाट – समीर कुणावार
- वर्धा – पंकज भोयर
- हिंगना – समीर मेघे
- नागपूर दक्षिण – मोहन माते
- नागपूर पूर्व – कृष्ण खोपडे
- तिरोरा – विजय रहांगडाले
- गोंदिया – विनोद अग्रवाल
- अमगांव – संजय पुरम
- आर्मोली – कृष्णा गजबे
- बल्लारपूर – सुधीर मुनगंटीवार
- चिमूर – बंटी भांगडिया
- वाणी – संजीवरेड्डी बोडकुरवार
- रालेगाव – अशोक उडके
- यवतमाळ – मदन येरवर
- किनवट – भीमराव केरम
- भोकर – क्षीजया चव्हाण
- नायगाव – राजेश पवार
- मुखेड – तुषार राठोड
- हिंगोली – तानाजी मुटकुले
- जिंतूर – मेघना बोर्डीकर
- परतूर – बबनराव लोणीकर
- बदनापूर -नारायण कुचे
- भोकरदन -संतोष दानवे
- फुलंब्री – अनुराधा चव्हाण
- औरंगाबाद पूर्व – अतुल सावे
- गंगापूर – प्रशांत बंब
- बगलान – दिलीप बोरसे
- चंदवड – राहुल अहेर
- नाशिक पुर्व – राहुल ढिकाले
- नाशिक पश्चिम – सीमाताई हिरे
- नालासोपारा – राजन नाईक
- भिवंडी पश्चिम – महेश चौघुले
- मुरबाड – किसन कथोरे
- कल्याम पूर्व – सुलभा गायकवाड
- डोंबिवली – रवींद्र चव्हाण
- ठाणे – संजय केळकर
- ऐरोली – गणेश नाईक
- बेलापूर – मंदा म्हात्रे
- दहिसर – मनीषा चौधरी
- मुलुंड – मिहिर कोटेचा
- कांदिवली पूर्व – अतुल भातखलकर
- चारकोप – योगेश सागर
- मालाड पश्चिम – विनोद शेलार
- गोरेगाव – विद्या ठाकूर
- अंधेरी पश्चिम – अमित साटम
- विले पार्ले – पराग अलवणी
- घाटकोपर पश्चिम – राम कदम
- वांद्रे पश्चिम – आशिष शेलार
- सायन कोलीवाडा- तमिल सेल्वन
- वडाळा – कालिदास कोळंबकर
- मलबार हिल – मंगलप्रभात लोढा
- कुलाबा – राहुल नार्वेकर
- पनवेल – प्रशांत ठाकूर
- उरन – महेश बाल्दी
- दौंड- राहुल कुल
- चिंचवड – शंकर जगताप
- भोसली -महेश लांडगे
- शिवाजीनगर – सिद्धार्थ शिरोले
- कोथरुड – चंद्रकांत पाटील
- पर्वती – माधुरी मिसाळ
- शिर्डी – राधाकृष्ण विखे पाटील
- शेवगाव – मोनिका राजले
- राहुरी शिवाजीराव कर्डिले
- श्रीगोंदा – प्रतिभा पाचपुते
- कर्जत जामखेड – राम शिंदे
- केज – नमिता मुंदडा
- निलंगा- संभाजी पाटील निलंगेकर
- औसा – अभिमन्यू पवार
- तुळजापूर – राणा जगजितसिंह पाटील
- सोलापूर शहर उत्तर – विजयकुमार देशमुख
- अक्कलकोट – सचिन कल्याणशेट्टी
- सोलापूर दक्षिण – सुभाष देशमुख
- मान -जयकुमार गोरे
- कराड दक्षिण – अतुल भोसले
- सातारा – शिवेंद्रराजे भोसले
- कणकवली – नितेश राणे
- कोल्हापूर दक्षिण – अमल महाडिक
- इचलकरंजी – राहुल आवाडे
- मिरज – सुरेश खाडे
- सांगली – सुधीर गाडगीळ
२०१९ च्या निवडणूकीत भाजपने किती जागा लढवल्या होत्या ?
२०१९ साली झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूकीत भाजपने १६४ जागा लढवल्या होत्या. तर, शिवसेनेन निवडणूकीत १२४ जागा लढवल्या होत्या.
हेही वाचा :
कोल्हापूर; प्रतिनिधी : निवडणुकीचा अर्ज दाखल करण्याची वेळ जसजशी जवळ येऊ लागली आहे तसतसे इच्छुकांकडून नेत्यांच्या भेटीगाठी वाढू लागल्या आहेत. राधानगरी विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्यास असलेले इच्छुक माजी आमदार के.पी. पाटील यांनी आज (दि.२०) मुंबईत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. त्यांच्या भेटीने राष्ट्रवादी अजित पवार गटाला धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Kolhapur Politics)
महायुतीच्या जागा वाटपानुसार राधानगरी विधानसभा मतदार संघ हा शिवसेना शिंदे गटाकडे असून तिथे विद्यमान शिंदे गटाचे विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर यांची उमेदवारी पक्की मानली जात आहे. त्यामध्ये मुहायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी आमदार के.पी. पाटील यांची गोची झाली आहे. (Kolhapur Politics)
यापूर्वी त्यांनी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची भेटी घेतल्या आहेत. आज के.पी. पाटील यांनी मुंबईत खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. सुमारे अर्धातास दोघांमध्ये चर्चा झाली असून राधानगरी विधानसभा मतदार संघाचा पूर्ण आढावा राऊत यांनी घेतला. के.पी. पाटील यांनी चर्चा सकारात्मक झाल्याचे सांगितले. के.पी. पाटील यांना शिवसेना उद्धव ठाकरे गटाची उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे.
हेही वाचा :
कोल्हापूर; प्रतिनिधी : आजघडीला समाजामध्ये प्रत्येकजण स्वतःसाठी जगण्यात व्यस्त आहेत. पण काही माणसे मात्र इतरांच्या जीवनात आनंद पेरण्यासाठी जगत आहेत. अशी माणसे म्हणजे आपल्या समाजासाठी चालतेबोलते दीपस्तंभच आहेत. दिव्यांग लोकांच्या जीवनात सन्मान आणि स्वाभिमानाचा दीप प्रज्वलित करण्यासाठी सेवारत असणाऱ्या, विद्यार्थ्यांच्या जीवनात स्वाभिमान पेरणाऱ्या अशा शिक्षकांचा गौरव करणे हा आमच्यासाठी अत्यंत आनंदाचा आणि कृतज्ञतेचा क्षण आहे. रोटरी क्लब ऑफ इव्हॉल्वच्या माध्यमातून आम्ही नेहमीच अशा सामाजिक कार्यामध्ये पुढाकार घेत राहू” असे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर, इव्हॉल्वच्या अध्यक्षा सलोनी घोडावत यांनी केले. (Kolhapur News)
त्या ‘हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅप’ संस्थेमधील १० शिक्षकांचा रोटरी क्लब ऑफ इव्हॉल्वकडून ‘बिल्डर्स ऑफ नेशन’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी बोलत होत्या.
‘हेल्पर्स ऑफ दि हॅंडीकॅप’ ही संस्था गेल्या अनेक वर्षापासून कोल्हापूरमध्ये अपंग पुनर्वसन आणि शिक्षणासाठी स्तुत्य काम करत आहेत. या संस्थेतील शिक्षक देवानंद भाडळे, कु.अंजना लागस, मिलिंद गुरव, सचिन वसावे , मोनिका खैरमोडे-गिरीगोसावी, मुग्धा गोरे-लिंगनूरकर, मनोज शेडगे, संजीवनी कोळी, विभावरी सावंत व संदीप मोरे यांचा सन्मान करण्यात आला.
या सोहळ्याला सलोनी घोडावत, डॉ. ममता बियाणी,निलाभ केडिया, निकेत दोशी,निखिल दुल्हानी, निलाभ गोयंका या सोबत सर्व पदाधिकारी, सभासद उपस्थित होते.
हेही वाचा :
कोल्हापूर : प्रतिनिधी : परिवर्तन महाशक्तीने महायुती व महाविकास आघाडीला धक्के देण्यास सुरुवात केली आहे. माजी आमदार सुभाष साबणे यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्या परिवर्तन महाशक्तीमध्ये उपस्थितीत प्रवेश केला. (Subhash Sabne)
सुभाष साबणे यांनी काल (दि.१९) भाजपा सदस्य पदाचा राजीनामा दिल्यानंतर आज (दि.२०) परिवर्तन महाशक्तीमध्ये त्यांचा प्रवेश केला आहे. ते शिवसेनेकडून १९९९, २००४ व २०१४ साली आमदार म्हणून निवडून आले होते. तसेच देगलूर बिलोलीचे विधानसभेचे कॉंग्रेस आमदार रावसाहेब अंतापुरकर यांच्या अकाली निधनानंतर साबणे यांनी भाजपाकडून पोट निवडणूक लढवली होती, परंतु त्यांचा पराभव झाला होता.
हेही वाचा :
कोल्हापूर; प्रतिनिधी : राष्ट्रवादी शरद पवार गटाने जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली. आघाडी धर्म पाळताना काँग्रेस पक्ष विश्वासात घेत नसल्याचा आरोप केला. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडावा अन्यथा दहाही विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे उमेदवार उभे केले जातील असा इशाराही दिला. (Kolhapur Politics)
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील आणि शहराध्यक्ष माजी महापौर आर.के. पोवार यांनी तातडीने पत्रकार परिषद बोलावून काँग्रेस पक्षाविरुध्द खदखद व्यक्त केली. जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील म्हणाले, लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर लोकसभा मतदार संघ शरद पवार राष्ट्रवादीचा हक्काचा असताना ही जागा काँग्रेसला देण्यात आली तर हातकणंगले लोकसभा मतदार संघ शिवसेनेला देण्यात आला. लोकसभेच्या बदल्यात कोल्हापूऱ् उत्तर ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला देण्याचे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी मान्य केले होते. विधानसभा निवडणुकीत आम्ही चार जागांची मागणी केली असता कागल आणि चंदगड या दोनच विधानसभा जागा देण्यात आली आहे. चंदगड विधानसभा मतदारसंघातही वेगळी आघाडी उघडण्याचा प्रयत्न सुरू आहे तो त्वरीत थांबवावा. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार आम्हाला द्या अथवा कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघ द्यावा अशी मागणीही व्ही.बी. पाटील यांनी केली. (Kolhapur Politics)
हेही वाचा :
“ऐनवेळी अन्य नाव येवू शकते” काँग्रेस निरीक्षकांच्या अंदाजाने दिवसभर रंगली चर्चा
कोल्हापूर; प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्याचा अंदाज आणि इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी मी आलो आहे. कार्यकर्त्यांशी बोलून मतदारसंघातील परिस्थितीचा अंदाज घेणार असून यातून जर काही नावे राहिली तर ऐनवेळी अन्य नाव येवू शकते’ अशी शक्यता काँग्रेस पक्ष निरीक्षक लातूरचे खासदार डॉ. शिवाजीराव काळगे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. चांगला आणि योग्य उमेदवार देऊन काँग्रेसच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणणे, राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आणयाचा आमचा प्रयत्न सुरु आहे, असेही डॉ. काळगे यांनी स्पष्ट केले. (Maharashtra Election)
स्टेशन रोडवरील जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये आज (दि.१९) पक्ष निरीक्षक लातूरचे खासदार डॉ. शिवाजीराव काळगे आणि त्यांच्यासमवेत आंध्रप्रदेशचे माजी प्रदेशाध्यक्ष डॉ. साके सैलजानाथ यांनी दुपारी जिल्ह्यातील सर्व मतदार संघातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. यामध्ये संपूर्ण जिल्ह्यात कोल्हापूर दक्षिणमधून आमदार ऋतुराज पाटील, शाहुवाडीतून गोकुळचे संचालक अमर पाटील, आणि शिरोळ मतदारसंघातून दत्त सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी मुलाखत दिली. उत्तर विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार जयश्री जाधव यांच्यासह आठ उमेदवारांनी मुलाखत दिली. जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती असल्याने त्यांच्या समवेत कार्यकर्त्यानीही मोठी गर्दी केली होती.
ऐनवेळी राहिलेले नाव पुढे येवू शकते असे निरीक्षक यांनी पत्रकारांना सांगितल्यामुळे उत्तर मतदारसंघात कोण ? अशी चर्चा काँग्रेस कार्यालयात रंगली होती. त्यामध्ये प्रामुख्याने विधानपरिषदेतील काँग्रेसचे गट नेते आमदार सतेज पाटील यांच्यासह काँग्रेसचे खासदार शाहू छत्रपती यांच्या स्नुषा मधुरिमाराजे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु होती. (Maharashtra Election)
मतदार संघ आणि उमेदवार
कोल्हापूर उत्तर
- आमदार जयश्री जाधव
- माजी स्थायी सभापती शारंगधर देशमुख
- माजी स्थायी सभापती राजू लाटकर
- माजी स्थायी सभापती सचिन चव्हाण
- माजी स्थायी सभापती आर.डी.पाटील
- माजी नगरसेवक आनंद माने
- अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक
- सामाजिक कार्यकर्ते दुर्वास कदम
कोल्हापूर दक्षिण
- आमदार ऋतुराज पाटील
करवीर
- माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहूल पाटील
- कॅप्टन उत्तम पाटील
कागल
- सागर कोंडेकर,
- अॅड. दिग्विजय कुऱ्हाडे
राधानगरी
- गोकुळचे संचालक राजेंद्र मोरे
- सचिन घोरपडे
- माजी जिल्हा परिषद सदस्य जीवन पाटील
शाहुवाडी
- गोकुळचे संचालक अमर पाटील
- जिल्हा परिषद माजी सदस्य सुभाषराव इनामदार
हातकंणगले
- आमदार राजू जयवंतराव आवळे
- तुकाराम कांबळे
इचलकरंजी
- माजी नगरसेवक संजय कांबळे
- संजय तेलनाडे
- राहुल खंजिरे
शिरोळ
- दत्तचे माजी अध्यक्ष गणपतराव पाटील
चंदगड
- गोपाळराव पाटील
- जिल्हा बँक माजी उपाध्यक्ष विनायक उर्फ अप्पी पाटील
- प्रा. किसनराव कुराडे
- बाबासो उर्फ सोमगोंडा अरबोले
- विद्याधर गुरबे
हेही वाचा :