गॉल : उस्मान ख्वाजा आणि स्टीव्ह स्मिथ यांच्या शतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेविरुद्धच्या कसोटीच्या पहिल्या दिवशी २ बाद ३३० धावा केल्या. स्मिथने बुधवारी शतक झळकावण्याबरोबरच कसोटी कारकिर्दीतील दहा हजार धावांचा टप्पाही ओलांडला. (Australia)
यंदाच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील (वर्ल्ड चॅम्पियनशीप) ही अखेरची मालिका आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. ख्वाजा आणि ट्रॅव्हिस हेड यांनी वेगवान सुरुवात करत १४.३ षटकांत ९२ धावांनी सलामी दिली. हेडने ४० चेंडूंमध्ये १० चौकार व एका षटकारासह ५७ धावा फटकावल्या. हेड बाद झाल्यानंतर मार्नस लॅबुशेन २० धावा करून परतला. त्यानंतर स्मिथ व ख्वाजा यांनी दिवसअखेरपर्यंत यशस्वीपणे किल्ला लढवत ऑस्ट्रेलियाला सव्वातीनशे धावांचा टप्पा पार करून दिला. (Australia)
ख्वाजाने सोळावे कसोटी शतक झळकावताना २१० चेंडूंमध्ये १० चौकार व एका षटकारासह नाबाद १४७ धावांची खेळी केली. स्मिथने १८८ चेंडूंमध्ये १० चौकार व एका षटकारासह नाबाद १०४ धावा करताना ३५ वे कसोटी शतक साजरे केले. भारताविरुद्धच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेमध्ये स्मिथ अखेरच्या सामन्यात कसोटी कारकिर्दीमध्ये ९,९९९ धावा असताना बाद झाला होता. बुधवारी पहिली धाव घेऊन स्मिथने दहा हजारी टप्पाही ओलांडला. (Australia)
ऑस्ट्रेलियातर्फे दहा हजार कसोटी धावा करणारा स्मिथ हा चौथा फलंदाज ठरला. यापूर्वी, रिकी पाँटिंग, ॲलन बॉर्डर आणि स्टीव्ह वॉ यांनी अशी कामगिरी केली आहे. त्याचप्रमाणे, कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत स्मिथ सातव्या स्थानी पोहोचला आहे. अखेरच्या सत्रात पावसामुळे सुमारे नऊ षटकांचा खेळ वाया गेला. स्मिथ आणि ख्वाजा यांनी दुसऱ्या विकेटसाठी नाबाद धावांची भागीदारी रचली आहे. (Australia)
संक्षिप्त धावफलक : ऑस्ट्रेलिया – पहिला डाव ८१.१ षटकांत सर्वबाद २ बाद ३३० (उस्मान ख्वाजा खेळत आहे १४७, स्टीव्ह स्मिथ खेळत आहे १०४, ट्रॅव्हिस हेड ५७, प्रबथ जयसूर्या १-१०२, जेफ्री वाँडरसे १-९३) विरुद्ध श्रीलंका.
Steve Smith reached his 10,000th Test run in his 115th match today, becoming the second-fastest to the landmark
He also overtook Ricky Ponting, who got to the achievement in 118 games, for the Australia record.
READ: https://t.co/d1ZCSNCGew pic.twitter.com/Adf6cT9H0i
— Wisden (@WisdenCricket) January 29, 2025
हेही वाचा :
शिवाजी विद्यापीठाचे फुटबॉल खेळाडू रेल्वेतून पळाले