Home » Blog » Asteroid: हिरोशिमापेक्षा पाचशे पट अधिक शक्तिशाली स्फोट होणार

Asteroid: हिरोशिमापेक्षा पाचशे पट अधिक शक्तिशाली स्फोट होणार

कोणता उपग्रह पृथ्वीच्या दिशेने येतोय….?

by प्रतिनिधी
0 comments
Asteroid

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : लघुग्रह पृथ्वीवर आदळून हिरोशिमावर झालेल्या अणुबॉम्ब स्फोटापेक्षा अंदाजे पाचशे पट अधिक शक्तिशाली स्फोट होण्याची शक्यता आहे. या स्फोटाची तीव्रता इतकी भयंकर असेल की ५० किलोमीटरच्या परिघात त्यामुळे व्यापक विनाश घडू शकतो. (Asteroid)

खगोलशास्त्रज्ञ ‘2024 YR4’ हा अंदाजे ४० ते १०० मीटर रुंद असलेल्या या नव्या लघुग्रहाचे बारकाईने निरीक्षण करत आहेत. कारण तो पृथ्वीच्या दिशेने वेगाने येत असल्याने त्याच्या संभाव्य परिणामाची शक्यता थोडी वाढली आहे. तूर्त घाबरण्याचे कारण नाही. कारण धोका अद्याप कमी आहे.

२०३२ मध्ये हा लघुग्रह पृथ्वीवर आदळण्याचा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. मात्र ही शक्यता सध्यातरी केवळ २ टक्केच आहे. तो पृथ्वीच्या कक्षेपासून सुरक्षितपणे निघून जाण्याची शक्यता जास्त आहे, तथापि संशोधकांना जसजसा अधिक डेटा मिळेल तसतसे त्याचा अभ्यास होईल. मात्र सध्याच्या अंदाजानुसार, तज्ज्ञांच्या मते ही जोखीम शेवटी शून्यावर जाईल. (Asteroid)

पृथ्वीपासून दूर जाण्याआधी नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सीजने मार्चमध्ये ‘2024 YR4’ या उपग्रहाचे वेब स्पेस टेलिस्कोपने जवळून निरीक्षण करण्याची योजना आखली आहे. खगोलशास्त्रज्ञांना त्याच्या मार्गाचा मागोवा घेण्यासाठी आणखी एक संधी मिळेल. मात्र त्यासाठी २०२८ पर्यंत प्रतीक्षा करावी लागेल. त्याचवेळी काही धोका आहे की नाही याचे चित्र स्पष्ट होईल.

‘2024 YR4’कडून निर्माण होणारा संभाव्य धोका त्याचा आकार, वेग आणि रचना यांसारख्या घटकांवर अवलंबून आहे. पृथ्वीपासून सध्याच्या अंतरामुळे अजूनही मोठ्या प्रमाणात ते अज्ञात आहेत. यामुळे, परिणामांबद्दलचे कोणतेही अंदाज या टप्प्यावर व्यक्त करता येत नाहीत. (Asteroid)

तथापि, खगोलशास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की जर हा उपग्रह पृथ्वीवर आदळला तर त्याचा थेट परिणाम होण्याऐवजी त्याचा हवेतच स्फोट होण्याची अधिक शक्यता आहे. हा स्फोट जवळपास ८ दशलक्ष टन टीएनटीएवढा असू शकतो. म्हणजेच हिरोशिमावरील अणुबॉम्बपेक्षा अंदाजे पाचशे पट अधिक शक्तिशाली असू शकेल.

हेही वाचा :

उत्तर प्रदेश सरकारला अवमान नोटीस
म्हणे, चीन हा काही शत्रू नाही

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00