Home » Blog » Ambedkar Shinde alliance :…म्हणूनच एकनाथ शिंदेंसोबत : आनंदराज आंबेडकर

Ambedkar Shinde alliance :…म्हणूनच एकनाथ शिंदेंसोबत : आनंदराज आंबेडकर

by प्रतिनिधी
0 comments
Ambedkar Shinde alliance

मुंबई : विशेष प्रतिनिधी : रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत युती करत असल्याची घोषणा बुधवारी (१६ जुलै) केली. संयुक्त पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. ही युती करण्याचे कारणही आंबेडकर यांनी यावेळी जाहीर केले. शिंदे यांचा पक्ष आणि आमच्या विचारांत काही वेगळेपणा नाही, असे विधान आंबेडकर यांनी यावेळी केले. (Ambedkar Shinde alliance)

सत्तेत सामावून घेण्याचा शब्द शिंदेंनी दिला आहे. त्यामुळेच आम्ही त्यांच्यासोबत युती करण्याचा निर्णय घेतला असल्याचेही आंबेडकर यांनी स्पष्टपणे बोलून दाखवले.
यावेळी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, आ.दीपक केसरकर, आ. दिलीप लांडे आदी उपस्थित होते.
कुठलीही अट न ठेवता आम्ही या युतीसाठी सरसावलो, त्यांनीही पुढे जायचे ठरवले. आंबेडकरी कार्यकर्त्याला सत्तेत सामावून घेण्याचा शब्द एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. त्यामुळेच ही युती होत आहे, असे आंबेडकर म्हणाले.

– आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आंबेडकरी कार्यकर्त्यालाही सत्तेचा लाभ हवा आहे. यासाठी आम्ही एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. या युतीच्या प्रसंगी मोठ्या संख्येने कार्यकर्ते येथे आले आहेत. या युतीमुळे महाराष्ट्राचे राजकीय व सामाजिक जीवन ढवळून निघेल.
-आनंदराज आंबेडकर, रिपब्लिकन सेना

ते म्हणाले, ‘‘देशातील प्रत्येक माणूस हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेवर चालतो. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचा पक्ष आणि आमच्या विचारांत काही वेगळेपणा असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मुख्यमंत्री असताना शिंदे यांनी अनेक बौद्ध भंत्तेजींना आपल्या शासकीय निवासस्थानी आमंत्रित करून भोजनदान केले. महाराष्ट्राच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडले. तेव्हापासून आम्हाला वाटत होते की एकनाथ शिंदेंबरोबर गेलो तर वेगळा चमत्कार होईल.’’ (Ambedkar Shinde alliance)

काहीजण घरगडी समजत होते

बाळासाहेब सहकाऱ्यांना सवंगडी समजायचे, पण काही लोक घरगडी समजू लागले तिथेच गाडी फसली, अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर केली. स्वभाव आणि मने जुळायला लागली तरच युती होते, असा टोलाही त्यांनी लगावला.


You may also like

error: Content is protected !!