नवी दिल्ली : भारताच्या संरक्षण खरेदी आणि उत्पादन प्रक्रियेशी संबंधित यंत्रणांनी जबाबदारीचे भान ठेवून तत्परता दाखवली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करत, आतापर्यंत संरक्षणविषयक एकही प्रकल्प वेळेवर पूर्ण झालेला नाही, याकडे एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंग यांनी गुरुवारी (२९ मे) लक्ष वेधले. संरक्षण खरेदी आणि संरक्षण प्रकल्पांच्या पूर्णत्वातील विलंब यावेळी सिंग यांनी अधोरेखित केला. (Air Chief’s blunt warning)
दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलताना, सिंग यांनी संरक्षण विषयक सामग्रींचे वितरण मुदतीत पूर्ण करण्यात सातत्याने अपयश येते. या प्रकाराबद्दल तीव्र चिंताही व्यक्त केली. ‘‘अनेकदा, करारांवर स्वाक्षरी करताना आपल्याला माहित असते की त्या प्रणाली कधीही येणार नाहीत. मला वाटणारा एकही प्रकल्प वेळेवर पूर्ण झालेला नाही,’’ असे ते म्हणाले, करारावर स्वाक्षरी करताना अवास्तव वेळेचे आश्वासन का दिले जाते असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ‘‘जे साध्य करता येत नाही असे वचन आपण का द्यावे?’’ असे ते म्हणाले.
अशा पद्धतींचा क्षमता-निर्मिती आणि सशस्त्र दलांच्या व्यापक धोरणात्मक भूमिकेवर होणारा हानिकारक परिणाम त्यांनी अधोरेखित केला. ‘‘ एकूणच ही प्रक्रिया विस्कळीत होते,’’ असे सिंग यांनी नमूद केले. तसेच या विषयाशी संबंधित सर्व भागधारकांनी त्यांच्या वचनबद्धतेच्या विश्वासार्हतेवर गांभीर्याने विचार करण्याचे आवाहन केले. (Air Chief’s blunt warning)
वायुसेना प्रमुखांनी सशस्त्र सेना आणि भारतीय उद्योग यांच्यात मजबूत भागीदारीचे आवाहन केले. उत्पादनापलीकडे जाऊन संरक्षण क्षेत्रात स्वदेशी डिझाइन आणि विकासावर लक्ष केंद्रित करण्याच्या गरजेवरही त्यांनी भर दिला.
‘‘आपण भारतात केवळ संरक्षण प्रणालींचे उत्पादन करण्याऐवजी त्यांचे डिझाइन करून ते विकासित करण्याचा विचार केला पाहिजे. एकदा आपण मोठ्या प्रमाणात उत्पादनाच्या टप्प्यावर पोहोचलो की, क्षमता स्वाभाविकपणे येते. परंतु हे शक्य करण्यासाठी सैन्य आणि उद्योग यांच्यातील विश्वास हा मजबूत पाया असला पाहिजे,’’ असे ते म्हणाले.
‘‘एक बार जो हमने कमिट किया हैं, फिर में अपने आप की भी नहीं सुनता,’’ हा डायलॉग बोलून दाखवत त्यांनी वचबद्धतेचे गांभीर्य अधोरेखित केले. (Air Chief’s blunt warning) सिंग यांनी लष्करी कारवायांमध्ये हवाई शक्तीच्या कायमस्वरूपी केंद्रस्थानी असण्यावरही भर दिला. ‘‘जमिनीवरचे युद्ध असो वा सागरी युद्ध, हवाई शक्ती अपरिहार्य राहते. ‘ऑपरेशन सिंदूर’प्रमाणे कोणत्याही प्रकारचे ऑपरेशन त्याशिवाय अपूर्ण आहे,’’ असे ते म्हणाले.
हेही वाचा :
पंतप्रधानांना टॅरिफ हवा आहे, टॅरिफवर चर्चा नको : काँग्रेस
अमेरिकन न्यायालयाकडून ‘टेरिफ’ बेकायदेशीर