Home » Blog » AICC Session: आरक्षण मर्यादा वाढवणार

AICC Session: आरक्षण मर्यादा वाढवणार

काँग्रेस अधिवेशनात राहुल गांधींचा निर्धार

by प्रतिनिधी
0 comments
AICC Session

अहमदाबाद : आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा वाढण्यात येईल. त्याचबरोबर देशात जातनिहाय जनगणनेची मागणी लावून धरण्याचा निर्धार लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी बुधवारी (९ एप्रिल) येथे केला.(AICC Session)

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अधिवेशन गुजरातमधील अहमदाबाद येथे आयोजित केले होते. त्यावेळी ते बोलत होते. पक्षाचे अध्यक्ष खासदार मल्लिकार्जुन खरगे, पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांच्यासह अनेक नेते यावेळी उपस्थित होते. (AICC Session)

राहुल गांधी यांनी म्हणाले की, काँग्रेस एससी, एसटी, ओबीसींसाठी असलेली ५० टक्के आरक्षणाची मर्यादा रद्द करून ती वाढवेल. देशभरात जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे, या मागणीचा पुनरूच्चारही त्यांनी यावेळी केला.

“तेलंगणात ९० टक्के लोकसंख्या ही ओबीसी, अत्यंत मागास, दलित, अत्यंत उपेक्षित दलित, अल्पसंख्याक आणि आदिवासींची आहे. परंतु तुम्ही तेलंगणाच्या कॉर्पोरेट क्षेत्राकडे पाहाल तर त्याचे मालक, सीईओ आणि वरिष्ठ व्यवस्थापनाच्या यादीत तपासली तर तुम्हाला या ९० टक्के लोकसंख्या असलेल्या विभागातील एकही व्यक्ती सापडणार नाही,” असे गांधी म्हणाले. (AICC Session)

“तेलंगणाच्या कॉर्पोरेट क्षेत्रात या ९० टक्के लोकांचा सहभाग जवळजवळ नाहीच. मला आनंद आहे की जातीय जनगणनेनंतर लगेचच, तेलंगणातील आमच्या मुख्यमंत्री आणि आमच्या टीमने ओबीसी आरक्षण ४२ टक्क्यांपर्यंत वाढवले,’’ असे गांधी म्हणाले.

राहुल गांधी यांनी सांगितले की, संसदेत आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे देशात जातीय जनगणना करण्याची विनंती केली होती. आम्हाला जाणून घ्यायचे होते की या देशात कोणाचा वाटा किती आहे, हा देश आदिवासी, दलित आणि मागासवर्गीय समुदायांचा खरोखर आदर करतो का, असे ते म्हणाले. (AICC Session)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00