कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्यावतीने प्रजासत्तादिनानिमित्त आयोजित ध्वजवंदनाच्या कार्यक्रमात प्रोटोकॉलचा भंग झाल्याची तक्रार प्रजासत्ताक सेवा संस्थेचे दिलीप देसाई यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ई मेलद्वारे त्यांनी तक्रार नोंदवली आहे. (A breach of protocol)
राजर्षी शाहू स्टेडियमवर झालेल्या ध्वजवंदनावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासमवेत जैन समाज अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी डायसवर होते. महायुतीची सत्ता स्थापन झाल्यावर गांधी यांची महामंडळावर नियुक्ती झाली आहे. पालकमंत्र्यांशेजारी उभे असलेल्या ललित गांधी यांच्या उपस्थितीवर देसाई यांनी तक्रारीत आक्षेप घेतला आहे. (A breach of protocol)
दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात पालकमंत्री ध्वजवंदन करतात. त्यानंतर ध्वजाला सलामी दिली जाते. यावेळी डायसवर पालकमंत्री, विशेष पोलीस महानिरीक्षक, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महापालिका आयुक्त उपस्थित असतात, पण रविवारी झालेल्या प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात पालकमंत्री आबिटकर आणि अधिकाऱ्यांसमवेत ललित गांधीही डायसवर होते. हा प्रोटोकॉलचा भंग असल्याची तक्रार प्रजासत्ताक सेवा संस्थेचे दिलीप देसाई यांनी केली आहे. (A breach of protocol)
दिलीप देसाई तक्रारीत म्हणतात, ‘ललित गांधी यांनी पालकमंत्र्यांशेजारी उभे राहून प्रोटोकॉलचा भंग केला आहे. दरवर्षी ध्वजवंदनाच्या कार्यक्रमात पालकमंत्र्यांसमवेत आयजी, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषद सीईओ, महापालिका आयुक्त उपस्थित असतात. प्रोटोकॉलनुसार पालकमंत्र्यांशेजारी कोणत्याच मंत्र्याला उभे राहता येत नाही. पण गांधी यांनी प्रोटोकॉलचा भंग केला आहे. एक नवीन पायंडा पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्या संबधितांवर कारवाई करावी.’ (A breach of protocol)
हेही वाचा :
आयजीसह सात पोलीस कर्मचाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा
पहिल्याच दिवशी बाजारात आपटबार !