Home » Blog » Gangrape : लिफ्ट दिली आणि चालत्या कारमध्ये…

Gangrape : लिफ्ट दिली आणि चालत्या कारमध्ये…

दृष्कृत्यानंतर तिला रस्त्यातच सोडून दिले

by प्रतिनिधी
0 comments
Gangrape

उदयपूर : लिफ्ट देण्याच्या बहाण्याने एका महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. संबंधित महिला कामानिमित्त बाहेर पडली होती.  बुधवारी रात्री ही घटना घडली. प्रतिकार करताना महिलेला लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. तिच्याशी दृष्कृत्य करून आरोपींनी तिला निर्जनस्थळी रस्त्यातच सोडून पळ काढला. (Gangrape)

माहिती मिळताच पोलीस आले आणि महिलेला रुग्णालयात दाखल केले. संबंधित आरोपींवर सामूहिक बलात्कार, अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

बुधवारी पीडित महिला काही कामानिमित्त प्रतापनगर येथे आल्याचे पीडितेने सांगितले. रात्री नऊच्या सुमारास ती घरी परतण्यासाठी चौकात वाहनाची वाट पाहत उभी होती. बराच वेळ थांबल्यानंतर तिने एका कारमधील चार जणांकडून लिफ्ट मागितली. त्यांनी तिला कारमध्ये घेतले. मात्र तिला हल्लेखोर दाबोकच्या दिशेने घेऊन गेले.(Gangrape)

वाटेत मागच्या बाजूला बसलेल्या दोघांनी तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिने प्रतिकार केला. मात्र त्यांनी जुमानले नाही. चालत्या कारमध्ये तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. त्यांनी तिला महाविद्यालयाजवळ नेऊन लोखंडी रॉडने मारहाण केली आणि तिला निर्जन भागात रस्त्यावर सोडून पळ काढला.

या हल्ल्यात पीडितेच्या चेहऱ्याला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. शुद्धीवर आल्यावर ती कॉलेजच्या गेटकडे गेली. तिथे एका गार्डने तिला पाणी दिले. तेथून ती एका हॉटेलमध्ये गेली आणि गार्डला घटनेची माहिती दिली. दाबोक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पीडितेला रुग्णालयात दाखल केले.(Gangrape)

डीवायएसपी छगन पुरोहित यांनी सांगितले की, अधिकारी आजूबाजूच्या भागातील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी करत आहेत. आरोपींना लवकरच अटक करून पीडितेला न्याय मिळवून देऊ.

हेही वाचा :

राजकीय पक्ष ‘आरटीआय’खाली…

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00