Home » Blog » Indian bison rescue विहिरीत पडलेल्या गव्याला आज-यात जीवदान

Indian bison rescue विहिरीत पडलेल्या गव्याला आज-यात जीवदान

कोरड्या विहिरीत पडलेल्या गव्याला जेसीबीने चर मारून वाचवले.

by प्रतिनिधी
0 comments
Indian bison rescue

आजरा: आजरा तालुक्यातील आंबाडे येथे कोरड्या विहीरीत पडलेल्या गव्याला वनविभागाने ग्रामस्थांच्या मदतीने जीवदान दिले. विष्णु शिवणगेकर यांच्या विहीरीत गवा पडला होता. दुपारच्या सुमारास जेसीबीच्या सहाय्याने चर मारून गव्याला बाहेर काढण्यात आले. (Indian bison rescue )

आंबाडे येथे शिवणगेकर यांची शेतात कोरडी विहीर आहे. या विहीरीत रात्री गवा पडला. त्याला विहीरीतून बाहेर पडता येत नव्हते. याची माहिती शिवणगेकर यांनी वनविभागाला दिली. वनविभागाच्या अधिकारी, कर्मचा-यांनी जेसीबीच्या सहाय्याने गव्याला बाहेर काढले. सुमारे तीन तास गव्याला बाहेर काढण्याचे काम सुरु होते. उपवनसंरक्षक जी. गुरुप्रसाद, सहाय्यक वनसंरक्षक नवनाथ कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आजरा परिक्षेत्र वनाधिकारी मनोजकु‌मार कोळी, धनगरमोळाचे वनपाल भरत निकम, पारपोलीचे वनरक्षक संजय दंडगे, धनगरमोळ्याचे वनरक्षक दीपक कदम व वनजीव बचाव पथक घाटकरवाडी यांनी मदत मोहीमेत भाग घेतला. गवा बाहेर पडल्यावर जंगलाच्या दिशेन निघून गेला. (Indian bison rescue )

हेही वाचाः
Ambabai kiranotsav : अंबाबाईच्या मुखावर सूर्यकिरणांचा अभिषेक
Agriculture Budget: हमीभाव दिला तरच शेतकरी डाळी, तेलबीयांकडे वळेल
Rooster Fight : कोंबड्यांच्या झुंजींवर कोटींचा सट्टा

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00