Home » Blog » ranas extradition : तहव्वूर राणाचे होणार प्रत्यार्पण

ranas extradition : तहव्वूर राणाचे होणार प्रत्यार्पण

अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने राणाची विनंती फेटाळली

by प्रतिनिधी
0 comments
ranas extradition

वॉशिंग्टन : २६/११ च्या मुंबई हल्ल्यातील दोषी तहव्वूर राणा याच्या भारताकडे प्रत्यार्पणाला अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली आहे. त्याच्या शिक्षेविरुद्धची पुनर्विचार याचिका न्यायालयाने फेटाळून लावली. राणा हा मूळचा पाकिस्तानी आहे. तो आता कॅनडाचा नागरिक आहे. २००८ च्या मुंबईतील दहशतवादी हल्ल्यांप्रकरणात तो ‘वॉन्टेड’ आहे. (ranas extradition)

सॅन फ्रान्सिस्कोमधील यूएस कोर्ट ऑफ अपीलसह, अनेक फेडरल कोर्टांत राणाने प्रत्यार्पणाविरोधात कायदेशीर लढा दिला होता. सर्वोच्च न्यायालयानेही आता प्रत्यार्पणावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे भारताकडे प्रत्यार्पण अटळ आहे. राणाला सध्या लॉस एंजेलिस येथील मेट्रोपॉलिटन डिटेन्शन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. (ranas extradition)

१३ नोव्हेंबर रोजी राणाने यूएस सुप्रीम कोर्टात ‘पुनर्विचार याचिका’ दाखल केली. विशेष म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर २१ जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाने ती फेटाळली.

यापूर्वी, राणाची पुनर्विचार याचिका याचिका फेटाळली जावी, असा युक्तिवाद यूएस सरकारने केला होता. सॉलिसिटर जनरल एलिझाबेथ बी. प्रीलोगर यांनी १६ डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयासमोर दाखल केलेल्या अर्जात राणाला भारतात प्रत्यार्पणापासून सूट मिळण्याचा हक्क नाही, असे मत मांडले होते. (ranas extradition)

आपल्या याचिकेत राणाने, २००८ च्या मुंबई हल्ल्याशी संबंधित आरोपांसाठी इलिनॉयमधील फेडरल कोर्टात त्याच्यावर यापूर्वीच खटला चालवण्यात आला होता. त्यात त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती, असा युक्तिवादही त्याने केला होता.

२६/११ च्या मुंबई हल्ल्यातील मुख्य सूत्रधार पाकिस्तानी-अमेरिकन दहशतवादी डेव्हिड हेडलीशी राणाचा संबंध आहे. या हल्ल्यांत सहा अमेरिकन लोकांसह १६६ जणांचा मृत्यू झाला. पाकिस्तानी १० दहशतवाद्यांनी मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणे लक्ष केली होती. जवळपास ६० तासांहून अधिक काळ मुंबई ओलीस ठेवली होती. (ranas extradition)

हेही वाचा :
रूग्णालयात डांबले, शॉक दिले…

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00