हैदराबाद : तिला कुणीतरी सल्ला दिला… त्वचेची कांती आणि आरोग्य सुधारायचे असेल तर सकाळी उठल्या उठल्या भरपूर पाणी पी. तिने सल्ला शिरसावंद्य मानला. एके दिवशी उठल्या उठल्या चार लिटर पाणी ती प्यायली. परिणाम व्हायचा तोच झाला. थोड्याच वेळात तिला मळमळ आणि उलट्या सुरू झाल्या. क्षणार्धात फेफरे आले आणि ती बेशुद्ध पडले. घरच्यांची पळापळ सुरू झाली. तिला तत्काळ रुग्णालयात दाखल केले… (Health News)
तिची प्रकृती अत्यंत नाजूक बनल्यामळे सुरुवातीला तिला अतिदक्षता विभागात दाखल करावे लागले. चाचण्या करण्यात आल्या. पाणी प्रमाणापेक्षा जास्त प्यायल्यामुळे तिला हायपोनाट्रेमिया (रक्तातील सोडियमचे प्रमाण कमी) झाल्याचे निदान झाले. तिच्या सीरम सोडियमची पातळी लक्षणीयरीत्या खालावली होती.
चार दिवस तिच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर तिला डिस्चार्ज देण्यात आला. डॉक्टरांनी तिला विचारले असता कारणांचा उलगडा झाला आणि डॉक्टरांना कपाळावर हात मारून घेण्याशिवाय पर्याय उरला नाही. (Health News)
सोशल मीडियावर लोकप्रिय असलेल्या डॉ. सुधीर कुमार यांनी हा तपशिल शेअर केला आहे. त्यानुसार, ४० वर्षीय रजनी (नाव बदलले आहे) या महिलेने शरीर निरोगी राहण्यासाठी सकाळी भरपूर पाणी पिण्याचा सल्ला कुणीतरी दिला होता. जास्त पाणी प्यायल्याने शरीरातील घाण निघून जाईल आणि ती निरोगी राहील. शिवाय, तिची त्वचाही टवटवीत होईल, असा दावा केला जात होता.
रजनीने हा सल्ला गांभीर्याने घेतला आणि सकाळी उठल्यानंतर तिने चार लिटर पाणी प्यायले. तासाभरातच तिला डोकेदुखी, मळमळ आणि उलट्या झाल्या. काही मिनिटांनंतर, फेफरे आले आणि ती बेशुद्ध पडली. (Health News)
तिला तातडीने आपत्कालीन कक्षात नेण्यात आले. निदान स्पष्ट होते. बहुधा हा बहुधा हायपोनाट्रेमिया (रक्तातील सोडियमची कमी पातळी)चा प्रकार असावा, असा डॉक्टरांनी अंदाज बांधला. रक्त तपासणीनंतर हा अंदाज खरा ठरला. अतिरिक्त पाणी शरीरात गेल्यामुळे रजनीची सीरम सोडियम पातळी ११० mmol/L होती जी सामान्यत: १३५ ते १४५ असावी लागते. (Health News)
रजनीला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. चार दिवस उपचार केल्यानंतर तिची मानसिक स्थिती ठीक झाली. चौथ्या दिवशी तिला डिस्चार्ज देण्यात आला.
डॉ. सुधीर कुमार यांच्या मतानुसार,
- डिटॉक्सिफिकेशनसाठी सकाळी जास्त पाणी पिण्याची गरज नाही. मूत्रपिंड नैसर्गिकरित्या लघवीद्वारे शरीरातून विषारी घटक बाहेर टाकतात. त्यासाठी केवळ सामान्य हायड्रेशन स्थिती आवश्यक आहे.
- दिवसभरात अडीच ते साडेतीन लिटर पाणी शरीरात गेले पाहिजे, अशी शिफारस केली जाते, जी दिवसभर पसरली पाहिजे. दैनंदिन पाण्याच्या गरजेपैकी २०% पाणी अन्न (विशेषत: फळे) आणि इतर पेये (उदा. दूध, चहा, रस इ.) पासूनही मिळते.
- पाण्याची गरज वय, लिंग, तापमान, आर्द्रता आणि ज्याच्या त्याच्या व्यायामानुसार बदलू शकते.
- निरोगी मूत्रपिंड जास्त पाण्याचे प्रेशर हाताळू शकत असली तरीही एक मर्यादा असते. अतिरिक्त पाणी प्यायल्यामुळे हायपोनेट्रेमिया होऊ शकतो.
- गंभीर हायपोनेट्रेमिया झाल्यास लवकरात लवकर उपचार घ्यावेत, त्यामुळे जिवावरचा धोका टाळता येतो.
40-year-old drank plenty of water in the morning for “detoxification”, but it resulted in a life-threatening complication
40-year-old Ms Rajni (name changed) was told to drink water in the morning to detoxify her body. It was claimed that drinking excess water in the morning…
— Dr Sudhir Kumar MD DM (@hyderabaddoctor) December 22, 2024
हेही वाचा :
- नवाज शरीफ यांच्या नातवाचे लग्न, पंतप्रधान मोदींना आमंत्रण?
- राज्यात २७, २८ डिसेंबरला मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता
- भरपूर पाणी प्यायली…नि फेफरे येऊन पडली!