वॉशिंग्टन : भारतीय राजकारणाच्या पटलावर चार वर्षांपूर्वी गदारोळ उडवून दिलेल्या इस्रायल स्पायवेअर पेगाससला अमेरिकन कोर्टाने चांगलाच तडाखा दिला आहे. व्हॉट्सॲप हॅकसाठी पेगासस स्पायवेअर निर्माता कंपनी एनएसओ जबाबदार असल्याचे अमेरिकन न्यायाधीशांनी म्हटले आहे. त्यामुळे व्हॉट्सॲपने विजय साजरा केला. इस्रायली कंपनी एनएसओ ग्रुपने राज्य आणि फेडरल यूएस हॅकिंग कायद्याचे उल्लंघन केल्याचे आढळले असल्याचे कोर्टाने म्हटले आहे. त्यामुळे व्हॉट्सॲपने शुक्रवारी उशिरा पेगासस स्पायवेअरच्या निर्मात्यावर कायदेशीर विजयाचा दावा केला. ‘द गार्डियन’ने हे वृत्त दिले आहे. (Pegasus (spyware))
इस्रायलची वादग्रस्त कंपनी एनएसओ ग्रुपने पेगासस सॉफ्टवेअरद्वारे मे २०१९ मध्ये १४०० लोकांच्या फोनची टेहळणी केली. ते संक्रमित केले. त्यामध्ये पत्रकार, राजकीय मुत्सद्दी आणि मानव अधिकार कार्यकर्त्यांचाही समावेश होता. जवळपास दोन आठवडे हा प्रकार केला होता, असा आरोप ‘मेटा’ने केला होता. तसेच खटलाही दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचे सुनावणी करण्याचे न्यायाधीश फिलिस हॅमिल्टन यांनी, पेगाससच्या माध्यमातून फेडरल यूएस हॅकिंग कायद्यांचे तसेच व्हॉट्सॲपच्या सेवा आणि अटींचे उल्लंघन केले आहे, असे स्पष्ट झाल्याचे म्हटले आहे. (Pegasus (spyware))
त्यामुळे आता एनएसओ ग्रुपला मार्च २०२५ मध्ये व्हॉट्स ॲपची देय असलेली नुकसानभरपाई निश्चित करण्यासाठी वेगवेगळ्या ज्युरी चाचणीला सामोरे जावे लागेल. व्हॉट्सॲप ही जगातील सर्वांतत लोकप्रिय मेसेजिंग सेवा आहे.
यासंदर्भात व्हॉट्सॲपने एका निवेदनात म्हटले आहे की, ‘सुमारे पाच वर्षे आम्ही लढा देत आहोत. आजच्या निर्णयाबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. व्हॉट्सॲप, पत्रकार, मानवाधिकार कार्यकर्ते आणि नागरी समाज यांच्यावरील बेकायदेशीर टेहळणी केल्याची जबाबदारी एनएसओ आता टाळू शकत नाही. स्पायवेअर कंपन्यांचे अशी बेकायदेशीर कृती खपवून घेतली जाणार नाहीत, हे या निर्णयाने स्पष्ट केले आहे.’ (Pegasus (spyware))
एनएसओ ग्रुपशी संपर्क साधून त्यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
एनएनओने अमेरिकन संगणक फसवणूक आणि गैरवर्तनविरोधी कायद्याचे उल्लंघन केले आहे, असे न्यायाधीशांनी निकालात म्हटले आहे. ‘ॲपल’नेही या कंपनीविरुद्ध असाच खटला दाखल केला होता, पण सप्टेंबरमध्ये तो वगळण्यात आला.
न्यायाधीशांच्या निर्णयानुसार, एनएसओ ग्रुपने या खटल्यात आपले पाय गाळात टाकले आहेत. हॅमिल्टनने 2024 च्या सुरुवातीस NSO ग्रुपला त्याच्या स्पायवेअरचा स्त्रोत कोड WhatsAppला प्रदान करण्याचे आदेश दिले होते. तिच्या शुक्रवारच्या निर्णयात, तथापि, तिने सांगितले की कंपनी वारंवार पालन करण्यात अयशस्वी ठरली, हे एक प्रमुख कारण आहे की तिने व्हॉट्सॲपने कंपनीविरुद्ध मंजुरीसाठी केलेली विनंती मान्य केली. (Pegasus (spyware))
खटल्यादरम्यान एनएसओ ग्रुपने त्यांचे सरकारी क्लायंट ‘पेगासस’च्या वापरावर नियंत्रण ठेवतात. त्यामुळे हॅकिंगसाठी ते जबाबदार आहेत, वारंवार सांगितले. परंतु या प्रकरणात ते खोटे असल्याचे स्पष्ट झाले. कंपनी पेगाससच्या माध्यमातून माहिती काढते. केवळ व्हॉट्सॲपच नव्हे; तर आयफोनमधील छायाचित्रे, ईमेल आणि इतर मजकूर काढून घेण्यासाठीही त्याचा वापर केल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, ज्यो बायडेन प्रशासनाने २०२१ मध्ये एनएसओ ग्रुपला काळ्या यादीत टाकले. तसेच त्यांच्या उत्पादने खरेदी करण्यास अमेरिकेत बंदीही घातली होती. पेगाससचा वापर जगभरातील हुकूमशाही सरकारांनी केला आहे.
हेही वाचा :
- ४३ वर्षांनी भारताचे पंतप्रधान कुवेत दौऱ्यावर
- रशियाच्या कजानमध्ये ९/११ सारखा हल्ला
- चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तयारीला वेग