13
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून बुधवारी निवृत्ती जाहीर करणारा भारताचा गोलंदाज रवीचंद्रन अश्विनने कारकिर्दीत अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. १४ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीमध्ये अश्विनने गोलंदाजीमध्ये नवे विक्रम प्रस्थापित करतानाच अष्टपैलू म्हणूनही रेकॉर्डबुकांमध्ये स्थान पटकावले आहे. त्याच्या काही ठळक विक्रमांवर टाकलेला हा दृष्टिक्षेप… (Ashwin Records)
- कसोटी कारकिर्दीमध्ये सर्वाधिक वेळा मालिकावीराचा पुरस्कार पटकावणाऱ्या खेळाडूंमध्ये रवीचंद्रन अश्विन हा श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरनसह संयुक्तरीत्या अग्रस्थानी आहे. या दोघांनीही प्रत्येकी ११ वेळा मालिकावीराचा पुरस्कार पटकावला आहे.
- आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये सर्वांत वेगवान २५०, ३०० आणि ३५० विकेट घेण्याचा विक्रम अश्विनच्या नावे आहे. त्याने अनुक्रमे, ४५, ५४ आणि ६६ सामन्यांमध्ये हे टप्पे ओलांडले आहेत. त्याचप्रमाणे, सर्वांत वेगवान ४००, ४५० आणि ५०० विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये तो दुसऱ्या स्थानी आहे. (Ashwin Records)
- अश्विनने कसोटीमध्ये ३७ वेळा डावात ५ विकेट, तर ८ वेळा सामन्यांत दहा विकेट घेतल्या आहेत. सर्वाधिकवेळा डावात ५ विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये तो शेन वॉर्नसह संयुक्तरीत्या दुसऱ्या, तर सर्वाधिकवेळा दहा विकेट घेणाऱ्यांमध्ये पाचव्या स्थानी आहे.
- एकाच सामन्यात शतक आणि डावामध्ये पाचहून अधिक विकेट घेण्याची कामगिरी अश्विनने चारवेळा केली आहे. इंग्लंडच्या इयान बोथम यांनी सर्वाधिक पाचवेळा अशी कामगिरी केली असून त्याखालोखाल अश्विन दुसऱ्या स्थानी आहे. (Ashwin Records)
- एकाच मालिकेत २५० हून अधिक धावा आणि २० पेक्षा अधिक विकेट घेणारा अश्विन हा भारताचा दुसरा अष्टपैलू आहे. त्याने २०१६-१७ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत ५ सामन्यांत ३०६ धावांसह २८ विकेट घेतल्या होत्या. अश्विनअगोदर कपिल देव यांनी दोनवेळा अशी कामगिरी केली आहे. (Ashwin Records)
- अश्विनने महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मा या तीन कर्णधारांच्या नेतृत्वाखाली बळींचे शतक पूर्ण केले आहे. त्याच्याअगोदर अनिल कुंबळेने महंमद अझरुद्दीन, राहुल द्रविड आणि सौरव गांगुली या तीन कर्णधारांच्या नेतृत्वाखाली अशी कामगिरी केली होती. (Ashwin Records)
Numbers that spin a tale of greatness 🙌
3⃣ Formats
🔝 Numbers
♾ Countless memories
1⃣ Champion Cricketer #ThankYouAshwin | #TeamIndia | @ashwinravi99 pic.twitter.com/Die36HBJEE— BCCI (@BCCI) December 18, 2024
हेही वाचा :
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अवमानाबद्दल अमित शाहांनी देशाची माफी मागावी
- रविचंद्रन अश्विनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
- IND vs AUS : तिसऱ्या कसोटीत वरूण राजाची खेळी, सामना अनिर्णित