मुंबई : विशेष प्रतिनिधी : हिवाळी अधिवेशनापूर्वी राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार होणार असला तरी त्याबाबत अद्याप सस्पेन्स कायम आहे. शनिवारी मंत्र्यांचा शपथविधी होण्याच्या शक्यतेने राजभवनात तयारी करण्यात आली होती. मात्र त्याऐवजी आता १५ डिसेंबरला दुपारी चार वाजता नागपुरातच शपथविधी घेण्यात येणार आहे, अशी माहिती विश्वासनीय सूत्रांची माहिती आहे. (cabinet expansion)
मंत्रिमंडळात कोणा कोणाची वर्णी लागणार याबाबत अनेक दावे केले जात असून तिन्ही पक्षाच्या इच्छुकांचे जोरदार लॉबी सुरू आहे.
सोमवारपासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आमदारांची सोय व्हावी, या उद्देशाने शनिवारऐवजी रविवारी मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती आहे. यंदा भाजपकडून जास्तीत जास्त नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (cabinet expansion)
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपचे २१, शिवसेनेचे १२ आणि राष्ट्रवादीचे १० मंत्री शपथ घेणार आहेत. त्यामध्ये कॅबिनेट आणि राज्यमंत्रिपदाचा समावेश आहे. मंत्रिमंडळात समावेश होणाऱ्यांची संभाव्य नावे समोर आली आहेत. १६ तारखेपासून विधिमंडळाचे अधिवेशन असल्यामुळे १५ तारखेला नागपुरात शपथविधी होणार आहे, अशी विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे मुंबईतील राजभवनऐवजी आता नागपुरातच तयारी सुरू होण्याची शक्यता आहे.(cabinet expansion)
राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून लॉबिंग
दरम्यान, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला १० मंत्रिपदे देण्यात येणार असून त्यामध्ये ८ कॅबिनेट तर २ राज्यमंत्रिपदे असणार आहेत. त्यासाठी आता नेत्यांनी लॉबिंग सुरू केल्याचे चित्र आहेत. माजी मंत्री हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील यांनी अजित पवारांची देवगिरी निवासस्थानी भेट घेतली. त्याआधी धर्मराव बाबा अत्राम यांनीही अजित पवारांची भेट घेतली होती. त्यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित होते.
शिवसेनेचे संभाव्य कॅबिनेट मंत्री
- एकनाथ शिंदे
- उदय सामंत
- शंभूराज देसाई
- दादा भुसे
- प्रताप सरनाईक
- संजय शिरसाट
- गुलाबराव पाटील
- भरत गोगावले
संभाव्य राज्यमंत्री
- योगेश कदम
- विजय शिवतारे
- राजेंद्र पाटील-यड्रावकर किंवा प्रकाश आबिटकर
हेही वाचा :
युक्रेनचे युद्ध थांबवले तसे हिंदूंवरील अत्याचार थांबवा
संविधान म्हणजे संघाचा कायदा नव्हे