महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : सीरिययातील बंडखोर गटांनी आज (दि.७) दारा शहरावर त्यांनी ताबा मिळवला. बंडखोरांनी ताबा मिळवलेले चौथे शहर आहे. मध्यपूर्वेतील देशांमध्ये संघर्षामुळे बशर अल-असादसाठी धोका निर्माण झाल्याचे वृत्त ‘रॉयटर्स’ने दिले आहे. सीरियातील परिस्थितीबद्दल भारत सरकारने भारतीय नागरिकांसाठी रात्री एक सूचना जारी केली आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत त्यांनी सीरियाला जाणे टाळावे. असा सल्ला यात दिला आहे. (Syria)
बशर अल-असाद हे सीरियात इराण आणि रशियाच्या मदतीने सत्तेवर आहेत. परंतु, रशिया आणि युक्रेन यांच्यातील सुरू असलेल्या संघर्षांमुळे सीरियातील परिस्थिती गुंतागुंतीची झाली आहे. तर, इराण आणि हिजबुल्लाह यांच्या इस्रायलसोबत संघर्ष सुरु आहे. यामुळे रशिया आणि इराणचे सीरियावरील नियंत्रण कमी होत आहे. याचा फायदा घेत सीरियातील बंडखोर गटांनी दारा शहरावर ताबा मिळवला आहे.
हयात तहरीर अल-शाम गटाने २७ नोव्हेंबरपासून सरकारविरोधात बंड पुकारले आहे. त्यांनी उत्तर आणि मध्य सीरियाच्या भागावर कब्जा करण्यास सुरुवात केली. २०११ च्या गृहयुद्धानंतर बंडखोरीचा हा सर्वात मोठा हल्ला आहे. काल (दि.६) सरकारविरोधातील संघर्षात विविध शहरांमध्ये सुमारे २००हून अधिक बंडखोर ठार झाले आहेत. (Syria)
संयुक्त राष्ट्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बंडखोरांनी शहर ताब्यात घेण्यास सुरुवात केल्यापासून आतापर्यंत सुमारे तीन लाख लोकां विस्थापित झाले आहेत. राजधानी दमास्करस हा बसर अल-असदचा बालेकिल्ला आहे. बंडखोरांनी हे शहर ताब्यात घेतलं तर असद हे सत्तेतून बेदखल होण्याची शक्यता आहे.
भारत सरकारकडून सूचना जारी
सीरियातील परिस्थितीबद्दल भारत सरकारने सर्व भारतीय नागरिकांसाठी रात्री उशिरा एक सूचना जारी केली आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत त्यांनी सीरियाला जाणे पूर्णपणे टाळावे, असा सल्ला देण्यात आला आहे. आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक आणि ईमेल आयडी देखील जारी केले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने सध्या सीरियामध्ये असलेल्या सर्व भारतीयांना दमास्कसमधील भारतीय दूतावासाच्या संपर्कात राहण्याचे आवाहन केले आहे. सीरिया सोडू शकतात त्यांनी उपलब्ध व्यावसायिक उड्डाणांद्वारे शक्य तितक्या लवकर सीरिया सोडावे, असा सल्लाही देण्यात आला आहे.परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दमास्कससाठी आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक +963 993385973 जारी केला आहे. हा नंबर व्हॉट्सॲपवरही वापरता येईल. यासोबत त्याने [email protected] हा आपत्कालीन ईमेल आयडी तयार केला आहे.
Syrian rebels seize fourth city, close in on Homs in threat to Assad’s rule https://t.co/2I6XLE1as5 pic.twitter.com/TK9PtFcfgt
— Reuters (@Reuters) December 7, 2024
हेही वाचा
- शेतकऱ्यांचे दिल्लीतील आंदोलन स्थगित
- गांधी भारताचा आत्मा, तर आंबेडकर मेंदू
- ३१ वर्षे तुरुंगवास आणि १५४ फटक्यांची शिक्षा, कोण आहेत नरगिस मोहम्मदी?