नवी दिल्ली : वृत्तसंस्था : पंजाबमधील शेतकऱ्यांनी सोमवारी मोठ्या संख्येने दिल्लीच्या दिशेने कूच करायला सुरुवात केली. किमान आधारभूत किमतीसह अन्य मागण्यांसाठी दिल्लीकडे कूच करण्याचा इशारा भारतीय किसान परिषदेने दिला होता. शेतकऱ्यांनी नोएडातील दलित प्रेरणास्थळ येथे लावलेली बॅरिकेड्स तोडली आणि दिल्लीच्या दिशेने माग्रक्रमण सुरू केले.
दरम्यान, शेतकरी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने सर्व ती दक्षता घेतली आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त सागर सिंग कलसी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्व दिल्लीतील सर्व छोट्या-मोठ्या सीमांवर सर्व ती दक्षता घेण्यात आली आहे.
‘आवश्यक तेथे बॅरिकेड्स, दंगल काबू पथक सज्ज ठेवली आहेत. सर्वसामान्य नागरिक आणि वाहनधारकांना शेतकरी मोर्चामुळे त्रास होणार नाही, नियमीत दळणवळण व्यवस्थेवर विपरीत परिणाम होणार नाही, याची सर्व ती काळजी घेतली आहे,’ असेही त्यांनी सांगितले.