18
मुंबई : विशेष प्रतिनिधी : मुंबईवरील २६ /११ च्या दहशतवादी हल्ल्यात हौतात्म्य आलेल्या पोलिसांना राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी अभिवादन केले. मुंबई पोलीस मुख्यालयातील पोलीस स्मारक येथे पोलीस अधिकारी व जवानांना पुष्पचक्र वाहिले.
राज्यपालांनी हुतात्मा पोलीस कुटुंबातील सदस्यांची तसेच उपस्थित आजी व माजी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी दीपक केसरकर, मंगल प्रभात लोढा, मुख्य सचिव सुजाता सौनिक, रश्मी शुक्ला, वरिष्ठ अधिकारी डॉ. इकबाल सिंह चहल, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनीही अभिवादन केले.