Home » Blog » राज गरजले, ‘उद्धवच गद्दार’!

राज गरजले, ‘उद्धवच गद्दार’!

हिंदुत्त्वाला तडा देण्याचे काम शरद पवार यांच्याकडून

by प्रतिनिधी
0 comments
Raj Thackeray file photo

मुंबई : प्रतिनिधी

उद्धव म्हणजे खाष्ट सासूसारखा, ज्याला सोडून सगळ्या सुना गेल्या, अशी बोचरी टीका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली. महाराष्ट्र हा संपूर्णपणे हिंदुत्वाने भारावलेले आहे; मात्र या हिंदुत्वाला तडा घालण्याचे काम हे प्रामुख्याने शरद पवार यांनी केले आहे, अशी टीका त्यांनी केली.

शिवडी विधानसभा मतदारसंघाचे मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत राज यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. राज म्हणाले, की एका बाईला तीन मुले असतात. पहिल्या मुलाचे लग्न होते. त्या वेळी सासू आणि सुनेचे भांडण होते आणि मुलगा ते घर सोडून जातो. सगळे बोलतात नवीन सून आल्यानंतर भांडण झाली. भांडखोर सून होती, म्हणून सासूसोबत भांडून घर सोडून गेली. त्यानंतर दुसऱ्या मुलाचे लग्न होते. दुसरी सून घरी येते. या वेळी दुसऱ्या सुनेचेदेखील सासूसोबत भांडण होते. तेही घर सोडून जातात. तिसरी सून येते, तो मुलगादेखील बायकोसोबत घर सोडून जातो. त्यानंतर लोकांना कळते, की तीन सुना होत्या, त्यांच्यात प्रॉब्लेम नव्हता, तर सासूमध्ये प्रॉब्लेम आहे. ती सासू म्हणजे उद्धव ठाकरे.

शिवसेनेची सासू बसली आहे ना, तिचा प्रॉब्लम आहे. जी मुले सोडून गेली त्यांचा नाही. या लोकांनी तुमचा अपमान केला आहे. महाराष्ट्रात २०१९ पासून जे घडले ते विसरू नका. या सगळ्याला कारण फक्त एक माणूस तो म्हणजे उद्धव, अशी टीका राज यांनी केली. सोडून गेलेले गद्दार नाही, तर खरा गद्दार उद्धव ठाकरे आहे. उद्धव ठाकरेंमुळे सगळे शिवसेनेतून बाहेर पडले, उद्धव म्हणजे खाष्ट सासूसारखा, ज्याला सोडून सगळ्या सुना गेल्या. या माणसाच्या वागणुकीमुळे राणे बाहेर पडले, त्यांनंतर मी बाहेर पडलो आणि आता शिंदे, अशी टीका राज यांनी केली आहे.

राज यांनी लालबाग येथे बोलत असताना पुन्हा एकदा शरद पवारांवर टीका केली आहे. तसेच राजकीय पक्ष मेले तरी चालतील पण महाराष्ट्र जगला पाहिजे, असे ते म्हणाले. फोडाफोडीचे राजकारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जन्मानंतर चालू झाले आहे, या टीकेचा पुनरुच्चार त्यांनी केला. हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाहीत, रोजगार मिळत नाही, ग्रामीण भागातील मुले मुंबई-पुण्यासारख्या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करतात. मुंबई-पुण्यातील मुले विदेशात जायचे बघतात. आमच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नाहीत. अनेक विषय आहेत, या गोष्टींची सोडवणूक झाली नसल्याने हे लोक तुमचे लक्ष दुसरीकडे नेण्यासाठी किंवा तुमचे लक्ष दुसरीकडे वळावे म्हणून काही गोष्टींची सोय करून ठेवली आहे, असे त्यांनी सांगितले.

ज्या पद्धतीचे राजकारण उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडमध्ये राजकारण चालते, तसे महाराष्ट्राचे होऊ नये. अत्यंत भीषण आणि घाण परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे. या सगळ्या गोष्टी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर सुरू झाल्या. महाराष्ट्रातला एकोपा, आमच्या संतपरंपरा, आमच्या संतांनी दिलेली शिकवण एकत्र राहण्याची शिकवण, सर्व विसरून चाललोय आपण. का? यांच्या स्वार्थी राजकारणासाठी, अशी टीका करून ते म्हणाले, की शिवसेना भाजपला मतदान केल्यानंतर जेव्हा शिवसेना फुटली आणि ज्यांच्या विरोधात मांडीला मांडी लाऊन बसली, केवळ त्या खुर्चीसाठी. तुम्हाला तुमच्या मताचा अपमान नाही वाटला हा? स्वतःच्या स्वार्थासाठी विरोधकांच्या सोबत जाऊन आघाडी करत सत्ता स्थापन केली, असा टोला राज यांनी उद्धव यांना लगावला.

पक्ष मेले, तरी चालतील, महाराष्ट्र जगवा!

शरद पवार यांनी जाती-जातीमध्ये भेद निर्माण केले. तुमचे मित्र, तुमचा परिवार महाराष्ट्रात जिथे कुठे असतील, तिथे त्यांना सांगा किमान यातून तरी आता आपण महाराष्ट्र बाहेर काढू. मी माझ्या अनेक सभांमधून सांगितले उद्या मनसे असो, शिवसेना असो, भाजप असो, काँग्रेस असो वा राष्ट्रवादी काँग्रेस; हे सगळे पक्ष मेले तरी चालतील; पण महाराष्ट्र जगला पाहिजे, असे राज म्हणाले.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00