Home » Blog » माजी आमदार कपिल पाटील काँग्रेसमध्ये!

माजी आमदार कपिल पाटील काँग्रेसमध्ये!

Kapil Patil : मल्लिकार्जुन खरगेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश

by प्रतिनिधी
0 comments
Kapil Patil

मुंबई; विशेष प्रतिनिधी : समाजवादी गणराज्य पक्षाचे अध्यक्ष व माजी शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी आज (दि.२१) काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या प्रमुख उपस्थितीत दिल्ली येथे पक्ष प्रवेश केला. (Kapil Patil)

कपिल पाटील यांनी सलग तीन टर्म विधान परिषदेत मुंबई शिक्षक मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. आता ते गोरेगाव मतदार संघातून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. काँग्रेसकडून त्यांना संधी दिली जाऊ शकते. त्यांच्या पक्षप्रवेशावेळी महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्निथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड, सुनील केदार, सतेज पाटील उपस्थित होते.

हेही वाचा :

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00