Home » Blog » सामाजिक कार्यामध्ये पुढाकार घेत राहू : सलोनी घोडावत

सामाजिक कार्यामध्ये पुढाकार घेत राहू : सलोनी घोडावत

Kolhapur News : सामाजिक कार्यामध्ये पुढाकार घेत राहू : सलोनी घोडावत

by प्रतिनिधी
0 comments

कोल्हापूर; प्रतिनिधी : आजघडीला समाजामध्ये प्रत्येकजण स्वतःसाठी जगण्यात व्यस्त आहेत. पण काही माणसे मात्र इतरांच्या जीवनात आनंद पेरण्यासाठी जगत आहेत. अशी माणसे म्हणजे आपल्या समाजासाठी चालतेबोलते दीपस्तंभच आहेत. दिव्यांग लोकांच्या जीवनात सन्मान आणि स्वाभिमानाचा दीप प्रज्वलित करण्यासाठी सेवारत असणाऱ्या, विद्यार्थ्यांच्या जीवनात स्वाभिमान पेरणाऱ्या अशा शिक्षकांचा गौरव करणे हा आमच्यासाठी अत्यंत आनंदाचा आणि कृतज्ञतेचा क्षण आहे. रोटरी क्लब ऑफ इव्हॉल्वच्या माध्यमातून आम्ही नेहमीच अशा सामाजिक कार्यामध्ये पुढाकार घेत राहू” असे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर, इव्हॉल्वच्या अध्यक्षा सलोनी घोडावत यांनी केले. (Kolhapur News)

त्या ‘हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅप’ संस्थेमधील १० शिक्षकांचा रोटरी क्लब ऑफ इव्हॉल्वकडून ‘बिल्डर्स ऑफ नेशन’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी बोलत होत्या.

‘हेल्पर्स ऑफ दि हॅंडीकॅप’ ही संस्था गेल्या अनेक वर्षापासून कोल्हापूरमध्ये अपंग पुनर्वसन आणि शिक्षणासाठी स्तुत्य काम करत आहेत. या संस्थेतील शिक्षक देवानंद भाडळे, कु.अंजना लागस, मिलिंद गुरव, सचिन वसावे , मोनिका खैरमोडे-गिरीगोसावी, मुग्धा गोरे-लिंगनूरकर, मनोज शेडगे, संजीवनी कोळी, विभावरी सावंत व संदीप मोरे यांचा सन्मान करण्यात आला.

या सोहळ्याला सलोनी घोडावत, डॉ. ममता बियाणी,निलाभ केडिया, निकेत दोशी,निखिल दुल्हानी, निलाभ गोयंका या सोबत सर्व पदाधिकारी, सभासद उपस्थित होते.

हेही वाचा :

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00