कोल्हापूर : प्रतिनिधी : “शिक्षकांच्या प्रश्नांना न्याय देणारे नेतृत्व विधान परिषदेत पाठवण्यासाठी शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करू; त्यासाठी जीवाचे रान करू!” असा निर्धार पुणे, भोसरी येथील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे आणि पुणे पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार स्मिताताई जाधव यांच्या प्रचारार्थ पदवीधर व शिक्षक मतदार मेळावा उत्साहात झाला. (Murlidhar Mohol urges the election of Kaustubh Gawade)
मेळाव्याला केंद्रीय उड्डाण व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची प्रमुख उपस्थिती होती. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांच्या उमेदवारीला पाठिंबा देत शिक्षकांच्या प्रश्नांची जाण असलेले आणि शिक्षण क्षेत्राशी बांधिलकी जपणारे नेतृत्व विधान परिषदेत जाणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. कौस्तुभ गावडे यांच्यासारख्या उच्चशिक्षित, अभ्यासू आणि युवा नेतृत्वाला संधी मिळाल्यास शिक्षकांच्या समस्या, प्रलंबित मागण्या आणि शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या विषयांना प्रभावी व्यासपीठ मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या न्याय्य प्रश्नांसाठी कौस्तुभ गावडे यांना भक्कम पाठबळ देऊन प्रचंड मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहनही त्यांनी केले. (Murlidhar Mohol urges the election of Kaustubh Gawade)
प्रास्ताविक भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी केले. भोसरी विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार विलास लांडे यांनी दोन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याचा विश्वास व्यक्त केला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शहराध्यक्ष कुणाल वावळकर, पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर योगेश बहल आणि शिवसेनेचे गटनेते विश्वजीत बारणे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या वेळी चिंचवडचे आमदार शंकर जगताप, भोसरीचे आमदार महेशलांडगे, विधान परिषदेच्या आमदार उमाताई खापरे, माजी आमदार अश्विनी जगताप तसेच श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे प्रशासन सहसचिव सीताराम गवळी यांच्यासह विविध शैक्षणिक संस्थांचे शिक्षक, प्राध्यापक आणि महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. (Murlidhar Mohol urges the election of Kaustubh Gawade)