Home » Blog » जागतिक कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरच्या अमृता पुजारीने पटकावले रौप्य पदक

जागतिक कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरच्या अमृता पुजारीने पटकावले रौप्य पदक

by प्रतिनिधी
0 comments
Amruta Pujari wins a silver medal at the World Wrestling Championships

कोल्हापूर : प्रतिनिधी : अमेरिकेतील लास वेगास येथे सुरू असलेल्या जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत २३ वर्षाखालील ७२ किलो वजन गटात कोल्हापुरच्या अमृता पुजारीने रौप्य पदक पटकावण्याची किमया साधली. जागतिक कुस्ती स्पर्धेत पदक मिळवणारी ती पहिला कोल्हापूरची खेळाडू ठरली आहे. अमृता मुळची शिरोळ तालुक्यातील असून कागल तालुक्यातील  मुरगुडच्या सदाशिवराव मंडलिक कुस्ती संकुलाची खेळाडू आहे. (Amruta Pujari wins a silver medal at the World Wrestling Championships)

अंतिम सामन्यात तिची गाठ युक्रेनच्या इरिना जाब्लोस्तकाशी पडली. अतिशय अटीतटीच्या सामन्यात तिला पराभव स्वीकारला लागला. तिला रौप्य पदकाने गौरवण्यात आले. उपांत्य फेरीच्या लढतीत अमृताने कजाकिस्तानच्या साबिरजानोवाचा ७-१ अशा गुणांनी एकतर्फी पराभव केला होता.  अमृता पुजारी महिलांच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धत डबल महाराष्ट्र केसरी पटकावणारी पहिली महिला खेळाडू आहे. तिला प्रशिक्षक दादासाहेब लव्हटे, सुखदेव येरुडकर, चंद्रकांत चव्हाण यांचे मार्गदर्शन तर माजी खासदार संजय मंडलिक यांचे प्रोत्साहन लाभले. (Amruta Pujari wins a silver medal at the World Wrestling Championships)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!