मुंबई : प्रतिनिधी : गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवापूर्वी गरब्यामध्ये मुस्लीमांना प्रवेश देऊ नये अशी मागणी विश्व हिंदू परिषद आणि राज्यातील मंत्री नितेश राणे यांनी केली आहे. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुस्लीमांना गरब्यात प्रवेश देण्यास काय हरकत अशी रोखठोक भूमिका घेतली आहे. अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्वागत केले आहे. त्यामुळे हिंदूत्ववादी संघटना, कार्यकर्त्यांची चांगलीच गोची झाली आहे. (Raut welcomes Amruta Fadnavis’s stance on Garba.)
गरब्यात मुस्लिमांचा प्रवेश गैर नाही
अमृता फडणवीस म्हणाल्या. आपल्या उत्सवात सर्वांचा समावेश असतो. एकादी मुस्लीम व्यक्ती जर गरब्यात येत असेल आणि नीट आनंद घेत असेल तर त्यात गैर काहीच वाटत नाही. डॉल्बी आणि डीजे बंदीबाबत त्या म्हणाल्या की, सरकार आणि न्यायालयाने जे नियम ठरवून दिले आहेत त्याप्रमाणे सर्वांनी सणवार साजरे करावेत. ज्या सोसायटीमध्ये राहतो त्या लोकांना त्रास व्हायला नको. धर्माचे पालन घरात जेवढे करु ते चांगले. बाहेर सणवार साजरे करताना आपण सर्वांनी नियमात राहून केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. (Raut welcomes Amruta Fadnavis’s stance on Garba.)
बोगस हिंदूत्वाद्यांचे अमृता वहिनींनी काऊन्सिलिंग करावे
अमृत फडणवीसांच्या भूमिकेचे खासदार संजय राऊत यांनी कौतुक केले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी गरब्यातील मुस्लिमांच्या प्रवेशावर घेतलेल्या भूमिकेचे मी स्वागत करतो असे राऊत म्हणाले. पण त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मंत्रीमंडळातील बोगस हिंदूत्ववादी लाडक्यांचे काऊन्सिलिंग केले पाहिजे असे म्हणत नाव न घेताना मंत्री नितेश राणे यांच्यावर निशाना साधला. राऊत म्हणाले, देश आणि महाराष्ट्र समर्थ बनवण्यात सर्व जाती धर्मांच्या लोकांचे योगदान आहे. स्वातंत्र्य लढा आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढा असेल यामध्ये मुस्लीम समाजाचे मोठे योगदान आहे. पण अलीकडे जे काही बोगस हिंदूत्ववादी झाले आहेत ते फडणवीसांचे लाडके आहेत. त्यांचे अमृता वहिनींनी काऊन्सिलिंग करायला हवे असेही ते म्हणाले. (Raut welcomes Amruta Fadnavis’s stance on Garba.)