Home » Blog » अडीचशे गर्भपात करणारा रियायर्ड सिव्हिल सर्जनला ठोकल्या बेड्या  

अडीचशे गर्भपात करणारा रियायर्ड सिव्हिल सर्जनला ठोकल्या बेड्या  

by प्रतिनिधी
0 comments
Kolhapur. Dr. Chandrakant Gaikwad, Kadamwadi

कोल्हापूर : प्रतिनिधी : गर्भलिंग चाचणी करणारा आणि अडीचशेहून अधिक महिलांचे गर्भपात करणाऱ्या रिटायर्ड सिव्हिल सर्जनच्या हॉस्पिटलवर पोलिसांनी छापा टाकून त्याच्या काळ्याधंद्याचा पर्दापाश केला. कोल्हापूर शहरातील कदमवाडी येथील प्रतिभा हॉस्पिटलवर छापा टाकून डॉ. चंद्रकांत गुंडा गायकवाड या रियायर्ड सिव्हिल सर्जनला सापळा रचून अटक केली. डॉ. गायकवाड याला अटक केल्यानंतर प्रकृती बिघडल्याने त्यांना सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल करण्यात आले आहे.  (Retired Civil Surgeon arrested for performing abortions)

कळंब्यातील गुन्ह्याची लिंक कदमवाडीत

करवीर पोलिस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी या कारवाईची माहिती दिली. चार दिवसापूर्वी करवीर पोलिसांनी २६ जुलै रोजी कळंबा येथील थ्री स्टार लॉजमध्ये कारवाई करुन रेकॉर्डवरील आरोपी स्वप्निल केरबा पाटील हा बेकायदेशीर गर्भलिंग चाचणी करत असताना पोलिसांनी कारवाई केली होती. या गुन्ह्यात पोलिसांनी दोन महिला एजंटांना अटक केली होती. एजंट अश्विनी गजानन शिंदे हिच्याकडे पोलिस कोठडीत चौकशी केली असताना पोलिसांना महत्वपूर्ण माहिती मिळाली. गर्भलिंग चाचणीत ज्या महिलांना मुलगी आहे असे रुग्णांचा गर्भपात कोल्हापुरातील कदमवाडी भिमनगर हौसिंग सोसायटीतील डॉ. चंद्रकांत गुंडा गायकवाड हे करत असल्याचे सांगितले.

डमी पेशंटचा गर्भपात करत असताना पोलिसांचा छापा

पोलिसांनी प्रतिभा हॉस्पिटलमध्ये डमी पेशंट पाठवून देऊन खात्री केली असता डॉ. गायकवाड यांनी डमी पेशंटला त्याने हॉस्पिटलमध्ये केसपेपर न करत अडमिट करुन तिची पोर्टेबल मशिनी गर्भलिंग चाचणी केली. त्यानंतर महिला गर्भपाताच्या गोळ्या देऊन तिचा गर्भपात करण्याच्या तयारीत असताना उपविभागीय पोलिस अधिकारी आप्पासो पवार, पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर, करवीर पंचायत समितीचे वैद्यकीय अदिकारी डा. मदने यांनी हॉस्पिटलवर छापा टाकला. पोलिसांनी पोर्टेंबल सोनोग्राफी मशिन, गर्भपाताची औषधे, वैद्यकीय उपकरणे जप्त केली. (Retired Civil Surgeon arrested for performing abortions)

मुंबई, बीड मध्ये सिव्हिल सर्जन

डॉ. गायकवाड याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी २०० ते २५० गर्भपात केल्याचे मान्य केले. यापूर्वी गांधीनगर, सोळांकुर, हातकणंगले या कोल्हापूर जिल्ह्यातील सरकारी हॉस्पिटलमध्ये डॉ. गायकवाड कार्यरत होता. तसेच पोलादपूर, मंबई, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी बीड येथे सिव्हिल सर्जन तर सेंट जॉर्ज हॉस्पिटल येथे अतिरिक्त अधीक्षक, पुणे हे सहाय्यक संचालक म्हणून काम केल्याची माहिती दिली.

यांचा होता कारवाईत सहभाग

डीवायएसपी आप्पासो पवार, पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलिस उप निरीक्षक कळकुटे, सुहास पवार, सहाय्यक फौजदार राहूल देसाई, विजय तळसकर, रणजीत पाटील, बजरंग लाड, अविनाश कांबळे, योगेश शिंदे, श्रीधर जाधव. (Retired Civil Surgeon arrested for performing abortions)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!