Home » Blog » वीजबील माफीची घोषणा शेतकऱ्यांसाठी नाही तर अदानीसाठी : हर्षवर्धन सपकाळ

वीजबील माफीची घोषणा शेतकऱ्यांसाठी नाही तर अदानीसाठी : हर्षवर्धन सपकाळ

by प्रतिनिधी
0 comments
Sapakal criticizes electricity bill waivers

जमीर काझी :  मुंबई : शेतकरी कर्जमाफीची  अद्याप अंमलबजावणी झालेली नाही तरीही स्वतःची पाठ थोपटून घेत आहेत  तर दुसरीकडे शेतकऱ्यांना वीजबील माफ करण्याची घोषणाही फसवी व दिशाभूल करणारी आहे.  ही शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी नाही तर लाडका उद्योगपती अदानीसाठी केलेली आहे. असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. (Sapakal criticizes electricity bill waivers)

खासगीकरणासाठी सरकारी शाळा बंद पाडल्या जात आहेत

 भाजपा सरकारला एमएसईबीच्या चारही विभागाचे खाजगीकरण करून ते अदानीला आंदण द्यायचे आहे, त्याच्या फायद्यासाठी ही घोषणा असल्याचे सांगून ते म्हणाले की,’ भाजपा सरकार सर्वच क्षेत्राचे खाजगीकरण करत आहे. आता शिक्षण क्षेत्राचेही खाजगीकरण मोठ्या प्रमाणात करण्याचा डाव आहे म्हणूनच राज्यातील शासकीय शाळा बंद पाडल्या जात आहेत. ज्या शासकीय शाळा अजून आहेत, त्यांना कसल्याच सुविधा नाहीत, वीज नाही, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, स्वच्छतागृह नाहीत, अनेक शाळांमध्ये शिक्षक नाहीत. सरकारला या शाळा सुरु ठेवायच्या नाहीत. शासकीय शाळा बंद पाडून खाजगी कंपन्यांच्या हाती शिक्षण क्षेत्र देण्याचा प्रयत्न आहे. शिक्षणाचे खाजगीकरण व बाजारीकरण करून बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी हा घाट घातला जात आहे. राज्याला शिक्षण मंत्री आहेत का, हेच समजत नाही. दादा भुसे यांनी कठोर निर्णय घेऊन शासकीय शाळा वाचवल्या पाहिजेत, पण ते फक्त भ्रष्टाचार करत आहेत, असेही त्यांनी सांगितले.  पत्रकार परिषदेला वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश सरचिटणीस अभिजित सपकाळ उपस्थित होते. (Sapakal criticizes electricity bill waivers)

डेमीलेटेशन विधेयक देशविरोधी

 मतदार पुनर्रचना विधेयक (डेमीलेटेशन)हे देशाच्या एकतेला धोका पोहचवणारे आहे. या विधेयकामागील भाजपाचा हेतू देशाचे दक्षिण व उत्तर असे दोन तुकडे करण्याचा आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पुन्हा हे विधेयक मंजूर करण्याचा आटापिटा भाजपाने सुरु केला आहे, त्यासाठीच तृणमूल काँग्रेस व शिवसेना उबाठा पक्ष पुन्हा एकदा फोडण्यात आला आहे. असे सपकाळ यांनी स्पष्ट केले. (Sapakal criticizes electricity bill waivers)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!