Home » Blog » साहित्यामधून शेतीचे प्रश्न प्रभावीपणे मांडले गेले पाहिजेत : ज्येष्ठ साहित्यिक आसाराम लोमटे

साहित्यामधून शेतीचे प्रश्न प्रभावीपणे मांडले गेले पाहिजेत : ज्येष्ठ साहित्यिक आसाराम लोमटे

by प्रतिनिधी
0 comments
'Nangrat' Literary Meet held with great enthusiasm in Jaysingpur

जयसिंगपूर : प्रतिनिधी : “शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळालाच पाहिजे. त्याशिवाय शेती टिकणार नाही आणि शेतकरीही जगणार नाही. आज शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून त्यावर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.” असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक आसाराम लोमटे यांनी केले.  “साहित्यामधून शेतीचे प्रश्न प्रभावीपणे मांडले गेले पाहिजेत. अन्यायकारक व्यवस्थेविरोधात साहित्याने आवाज उठवला पाहिजे. शेतकऱ्यांनी जागे होऊन संघटित होण्याची गरज आहे.” असेही त्यांनी मत व्यक्त केले.

स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवार सामाजिक विकास व संशोधन सेवा संस्था आणि जयसिंगपूर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तिसऱ्या नांगरट साहित्य संमेलनात संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ते  बोलत होते. यावेळी संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक पी.साईनाथ आणि स्वागताध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती. (‘Nangrat’ Literary Meet held with great enthusiasm in Jaysingpur)

यावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. मोहन पाटील यांना ‘स्वाभिमानी जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. त्यांच्या साहित्य क्षेत्रातील दीर्घकालीन योगदानाचा गौरव करण्यात आला. तसेच ज्येष्ठ शेतकरी चळवळ कार्यकर्ते जयकुमार कोले यांचा जीवन गौरव पुरस्कार देऊन विशेष सत्कार करण्यात आला. तसेच पत्रकारिता मधला पी साईनाथ यांना स्वाभिमानी जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

शेतकरी जगला तर समाज जगेल

संमेलनाध्यक्ष आसाराम लोमटे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात शेती आणि साहित्य यांचे परस्परसंबंध अधोरेखित केले. “शेती म्हणजे केवळ व्यवसाय नाही तर आपल्या जीवनाचा प्राण आहे. शेती ही आपल्या संस्कृतीची आणि परंपरेची ओळख आहे. शेतकरी जगला तरच समाज जगेल. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडू नये,” ज्यावेळेस देशात १९७२ साली दुष्काळ पडला तेंव्हा शेतकऱ्यांनी घरातील  धान्य संपत आले होते तेंव्हा स्वतः एकवेळ उपाशी राहून त्यांनी बियाणेसाठी राखीव धान्य शिल्लक ठेवले म्हणूनच दुष्काळानंतरही शिवार फुलले असे ते म्हणाले.

सरकार, कार्पोरेट शक्तीकडून शेतकऱ्यांना भूमिहिन करण्याचा डाव

उद्घाटक पी. साईनाथ यांनी आपल्या भाषणात देशातील ग्रामीण अर्थव्यवस्था आणि शेतकरी वर्गासमोरील वाढत्या संकटांचा परखड आढावा घेतला. ते म्हणाले, “विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. सरकार आणि कार्पोरेट शक्तींच्या संगनमतातून शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचा डाव आखला जात आहे. या प्रक्रियेला शेतकऱ्यांनी बळी पडू नये. शेतीमधून माणसे बाहेर पडू लागली आहेत, शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस खालावत आहे आणि आत्महत्यांचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढत आहे.” (‘Nangrat’ Literary Meet held with great enthusiasm in Jaysingpur)

शेतकऱ्यांच्या जमिनी उद्योगपतींच्या घशात घालण्याचा प्रयत्न

कार्पोरेट क्षेत्राला मिळणाऱ्या विशेष सवलतींवर भाष्य करताना साईनाथ म्हणाले, “कार्पोरेट जगताची लाखो कोटी रुपयांची कर्जे माफ केली जातात, मात्र त्यावर कधीच चर्चा होत नाही. परंतु शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय आला की त्याचा मोठा गाजावाजा केला जातो. देशाच्या अन्नदात्याला न्याय मिळवून देण्यासाठी ही मानसिकता बदलावी लागेल. विकासाच्या नावाखाली देशातील शेतकऱ्यांच्या जमिनी उद्योगपतींच्या घशात घालण्याचा प्रयत्न सुरू असून शेतकऱ्यांना भूमिहीन आणि कंगाल करण्याचा डाव रचला जात आहे, असा घणाघाती आरोप त्यांनी केला.

शक्तीपीठ महामार्ग रेटण्याचा प्रयत्न

स्वागताध्यक्ष राजू शेट्टी यांनी आपल्या भाषणात केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांवर तीव्र टीका केली. “महात्मा फुलेंचा ‘शेतकऱ्यांचा आसूड’ पुन्हा एकदा या सरकारवर उगारण्याची गरज आहे. विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घेऊन शक्तीपीठ महामार्गासारखे प्रकल्प रेटले जात आहेत. गरज नसताना सुपीक शेती संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे,” असे ते म्हणाले.

दुपारच्या सत्रात ‘शेतकऱ्यांच्या आसूडानंतरच्या आजपर्यंतच्या शेतकरी चळवळी’ आणि ‘ऱ्हास होत चाललेली कृषी संस्कृती व कृषी सर्जनशीलता’ या विषयांवर परिसंवाद झाले. प्रा. डॉ. गौतमपुत्र कांबळे, प्रवीण बांदेकर, डॉ. महेंद्र कदम, प्रसाद कुलकर्णी, विजय चोरमारे, नामदेव माळी, प्रा. संदीप जगताप आणि डॉ. गोमटेश्वर पाटील यांनी विविध विषयांवर आपले विचार मांडले.

सायंकाळी झालेल्या निमंत्रितांच्या कवी संमेलनाने कार्यक्रमाची सांगता झाली. अध्यक्षस्थानी स्वाती शिंदे-पवार होत्या. विविध कवींनी शेती, माती, ग्रामीण जीवन, मानवी संवेदना आणि सामाजिक वास्तव यांवर आधारित कविता सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. यावेळी महावीर अक्कोळे, डॉ. सुभाष अडंदडे, गोमटेश्वर पाटील, प्रा. शांताराम कांबळे, प्रकाश पोपळे, विठ्ठल मोरे, भगवान काटे, राजेंद्र गड्यान्नावर, प्रवक्ते अनिल पवार, घनशाम चौधरी, बापूसाहेब कारंडे, रविंद्र इंगळे, सुरेश काळे, अजित पोवार, राजाराम देसाई आदी उपस्थित होते. (‘Nangrat’ Literary Meet held with great enthusiasm in Jaysingpur)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00