Home » Blog » चाकूने सपासप ३२ वार करत युवतीची हत्या

चाकूने सपासप ३२ वार करत युवतीची हत्या

by प्रतिनिधी
0 comments
Young woman murdered in Mohali

नवी दिल्ली : पंजाबमधील मोहाली येथे खासगी कंपनीच्या कार्यालयात ३० वर्षीय युवतीची तिच्याच सहकाऱ्याने चाकूने भोसकून हत्या केली. संशयिताने युवतीवर चाकूने सपासप ३२ वार केले. डिंपल असे मृत युवतीचे नाव असून हल्लेखोर हरविंदर मान उर्फ हॅरी यानेही स्वत:वरही वार करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. (Young woman murdered in Mohali)

मोहालीतील फेज ११ मधील एका खासगी कंपनीच्या कार्यालयात ही घटना घडली. या घटनेचा थरार कार्यालयातील सीसीटीव्हीवर कैद झाला आहे. डिंपल आणि हरविंदर हे दोघेही पटियालाचे रहिवासी आहेत. गेल्या तीन वर्षापासून ते कार्यालयात काम करत होते. पूर्वी ते रिलेशनशीपमध्ये होते. पण सहा महिन्यापूर्वी त्यांच्यात ब्रेकअप झाले. ब्रेकअप नंतर डिंपलने हरविंदरशी सर्व संबध तोडून टाकले होते. पण हरविंदर डिंपलकडे पुन्हा रिलेशनशीप सुरू करण्यासाठी आग्रह करत होता. या वादातूनच हरविंदरने कार्यालयात हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे डिंपल यांना बचाव करण्याची संधी मिळाली. कार्यालयातील अन्य सहकाऱ्यांनी हरविंदरला रोखण्याचा प्रयत्न केला पण बेफाम झालेल्या हरविंदरने डिंपलवर ३२ वार केला. त्यानंतर त्याने स्वत:वरही वार करुन घेतले. दोघांना हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल केले. पण उपचारापूर्वीच डिंपलचा मृत्यू झाला. (Young woman murdered in Mohali)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00