Home » Blog » ८० लाख लाडक्या बहिणी अपात्र म्हणजे राज्य मोठ्या आर्थिक संकटात  : जयंत पाटील

८० लाख लाडक्या बहिणी अपात्र म्हणजे राज्य मोठ्या आर्थिक संकटात  : जयंत पाटील

by प्रतिनिधी
0 comments
Jayant Patil criticizes the State Government

जमीर काझी :  मुंबई :   राज्य शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या तब्बल ८० लाख लाभार्थी महिलांना ई केव्हायसी न केल्याचे कारण देत अपात्र ठरवले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात योजनातून बाद करणे राज्यावर आलेल्या मोठ्या आर्थिक संकटाचे द्योतक आहे, असा हल्लाबोल  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी केला  आहे. (Jayant Patil criticizes the State Government)

  सोशल मीडिया हँडलवरून महायुतीच्या कारभारावर हल्ला चढविताना ते म्हणाले आहेत की, लोकसभा निवडणुकीतील वाताहतीनंतर  विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महिलांना सरसकट लाडकी बहीण योजनेंतर्गत पैसे वाटण्याचा कार्यक्रम हाती घेतला. आता त्यातून तब्बल ८० लाख लाभार्थी महिलांना अपात्र ठरवण्यात आले. म्हणजे ‘गरज सरो आणि वैद्य मरो’ अशीच काहीशी गत आहे. देशानंतर आता राज्यावर आलेल्या मोठ्या आर्थिक संकटाचे हे द्योतक आहे. ज्याचा पहिला फटका लाडक्या बहिणींना बसला आहे. राज्याची वित्तिय तुट मोठ्या प्रमाणावर आहे. त्यात जागतिक मंदीने अधिक भर घातली आहे. आज ८० लाख लाभार्थी महिलांना अपात्र ठरवले गेले आहे. उद्या आणखी काही लाख महिलांना काही कारणं दाखवून अपात्र केले जावू शकते आणि हळूहळू शासनाने ही योजना बंद केली तर फार आश्चर्य वाटणार नाही. शासनाने या योजनेचे आधीच नियोजन केले असते तर ही वेळ आली नसती, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. (Jayant Patil criticizes the State Government)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00