Home » Blog » पुणे, पिंपरी परिसरात विषारी दारुचे १३ बळी

पुणे, पिंपरी परिसरात विषारी दारुचे १३ बळी

by प्रतिनिधी
0 comments
13 Victims of Toxic Liquor in the Pune-Pimpri Region

पुणे : प्रतिनिधी : पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारु प्यालेने गेल्या दोन दिवसात १३ जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना पिंपरी चिंचवड येथील फुगेवाडी, दापोडी, पुण्यातील काळे पडळ परिसरात घडली आहे. पोलिसांनी याबाबत कानावर हात ठेवले आहेत. (13 Victims of Toxic Liquor in the Pune-Pimpri Region)

पुणे आणि पिंपरी परिसरात जे दारु प्यायले त्यांच्या तोंडाला फेस येऊन मृत्यू झाला आहे. विषारी दारुच्या मृत्यूची दखल अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. त्यांनी दोषींवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार पिंपरी चिंचवडमधील फुगेवाडी येथे मिथेनॉलचे मिश्रन करुन गावठी दारु करण्यात होती. ही दारु पुणे फुगेवाडीसह हडपसरमध्ये विक्रीसाठी पाठवली होती. ही दारु प्यायलेने १३ जणांचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी तोंडाला फेस येणे, पोटदुखी आणि उलट्याचा त्रास झाला होता. (13 Victims of Toxic Liquor in the Pune-Pimpri Region)

राज्य उत्पादन शुल्क विभाग सराईत दारु विक्रेता योगेश वानखेडे यांची चौकशी करत आहे. यापूर्वी त्याच्यावर अनेक गुन्हे नोंद आहेत. मुख्य आरोपी कर्नल सिंह विरखा हा दारु गुत्याचा मालक असून तो फरार आहे. दारु गुत्त्याची माहिती असूनही पोलिसांनी कारवाई केली नसल्याने १३ जणांचा बळी गेला असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. (13 Victims of Toxic Liquor in the Pune-Pimpri Region)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00