Home » Blog » बुलढाण्यात आमदार गायकवाड यांच्या घरासमोर पोलिस आणि आंदोलकांत झटापट

बुलढाण्यात आमदार गायकवाड यांच्या घरासमोर पोलिस आणि आंदोलकांत झटापट

by प्रतिनिधी
0 comments
Clash between police and protesters outside Gaikwad's residence

बुलढाणा : बुलढाण्यातील आमदार संजय गायकवाड यांच्या घरासमोर झालेल्या आंदोलनात पोलिस आणि डाव्या चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये झटापट उडाली. पोलिसांनी बळाचा वापर केल्याने कार्यकर्त्यांनी जोरदार प्रतिकार केला. शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी गोविंद पानसरे यांच्या शिवाजी कोण होता? या पुस्तकाच्या प्रकाशक प्रशांत आंबी यांना अश्लील शिविगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिली होती. आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी डाव्या चळवळीतील कार्यकर्त्यांनी आमदार गायकवाड यांच्या घरासमोर आंदोलन केले.

आमदार गायकवाड यांच्याविरोधात राज्यात संतापाची लाट उसळली आहे. पुस्तकाचे प्रकाशक आंबी यांनी कोल्हापुरात राजारामपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली पण पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान बुलढाण्यातील आमदार गायकवाड यांच्या घरासमोर डाव्या चळवळीतील कार्यकर्त्यांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. आंदोलनात सहभागी होण्यासाठी शिवाजी कोण होता? या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी सहभागी होण्यासाठी बुलढाण्याला जात असताना पोलिसांनी त्यांना शहराबाहेर अडवून ताब्यात घेतले. (Clash between police and protesters outside Gaikwad’s residence)

प्रशांत आंबी यांना ताब्यात घेतल्यानंतर डाव्या चळवळीचे नेते अजित नवले यांनी पोलिस अधिकाऱ्यांना जाब विचारला. प्रशांत आंबींना शहरात येण्यापासून का रोखले? असा सवालही विचारला. यावेळी आंदोलकांनी शिवाजी कोण होता? पुस्तकाचे मुखपृष्ठ, राजर्षी शाहू महाराजांचे फलक झळकावले. कार्यकर्त्यांनी गायकवाड यांना अटक करण्याची मागणी केली. तसेच राज्यसरकारच्याविरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या.

आमदार गायकवाड यांच्या घरासमोर शिवाजी कोण होता? या पुस्तकाचे वाचन करण्यासाठी आंदोलक जात असता पोलिसांनी त्यांना रोखले. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेताना बळाचा वापर केला. महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेताना पोलिसांची जोरदार झटापट उडाली. त्यातून कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये धुमश्चक्री उडाली. त्यामुळे परिसरात तणाव वाढला. या परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.  (Clash between police and protesters outside Gaikwad’s residence)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00