Home » Blog » वसगडे, सांगवडे तीर्थक्षेत्रांसाठी ३ कोटीचा निधी; आमदार ऋतुराज पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

वसगडे, सांगवडे तीर्थक्षेत्रांसाठी ३ कोटीचा निधी; आमदार ऋतुराज पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

वसगडे, सांगवडे तीर्थक्षेत्रांसाठी ३ कोटीचा निधी;  आमदार ऋतुराज पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

by प्रतिनिधी
0 comments
Kolhapur News

कोल्हापूर;  प्रतिनिधी : कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील वसगडे येथील श्रीक्षेत्र विठ्ठल बिरदेव देवस्थान आणि सांगवडेच्या श्री नृसिंह मंदिर या दोन ‘ब’ वर्ग ग्रामीण तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी विविध विकास कामांसाठी २ कोटी ९९ लाख ८२ हजार ६६७ रुपयांच्या अंदाजपत्रकास राज्य सरकारने प्रशासकीय  मान्यता दिली आहे. या निधीतील २० टक्के रक्कम म्हणजेच ६० लाख रुपयांचा निधी प्रथम टप्प्यात वितरित केला जाणार आहे. याबाबत  ७  ऑक्टोबर रोजी ग्रामविकास विभागाने शासन निर्णय जारी केला आहे. आमदार ऋतुराज पाटील यांनी या ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्रांसाठी निधी मिळवण्यासाठी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. (Kolhapur News )

श्री क्षेत्र विठ्ठल बिरदेव देवस्थान, वसगडे येथे भोजनालय, संरक्षक भिंत आणि प्रसादालय इमारत बांधण्यासाठी १ कोटी ४९ लाख ९४ हजार ५०० रुपये तर श्री नृसिह मंदिर, मौजे सांगवडे येथे खुले सभागृह, पार्किंग व्यवस्था, सभागृह आणि शौचालय बांधकाम आदी कामांसाठी १ कोटी ४९ लाख ८८ हजार १६७ रुपयांच्या निधीस मंजुरी मिळाली आहे.

कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील या दोन्ही  तीर्थक्षेत्रांना विकास कामांसाठी निधी मिळावा यासाठी आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार ऋतुराज पाटील यांनी पाठपुरावा केला. याबाबत २५  जून २०२४ रोजी आमदार ऋतुराज पाटील यांनी  दोन्ही ब वर्ग तीर्थक्षेत्र विकासासाठी निधी मिळावा यासाठी ग्रामविकास विभागाकडे पत्राद्वारे विनंती केली होती.  या पाठपुराव्याला यश आले. दोन्ही तीर्थक्षेत्रांना निधी मंजूर होऊन पहिल्या टप्प्यासाठी ६० लाख रुपये वितरित करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

हेही वाचा :

 

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00