Home » Blog » सांताक्लाज रुपातील गणपती: हिंदूत्ववादी, मनसेकडून टीका

सांताक्लाज रुपातील गणपती: हिंदूत्ववादी, मनसेकडून टीका

by प्रतिनिधी
0 comments
Ganpati in the form of Santa Claus

मुंबई : प्रतिनिधी : नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने देशातील एका प्रसिद्ध दैनिकाला पहिल्या पानासाठी दिलेल्या जाहिरातीवरून वाद निर्माण झाला आहे. सांस्कृतिक मंत्रालयाने गणपती बाप्पांना सांताक्लॉजच्या रुपात दाखवलं आहे. गणपती बाप्पांना सांताक्लॉजचे कपडे आणि टोपी घातली आहे. त्यामुळे सांस्कृतिक मंत्रालयाच्या जाहिरातील हिंदू संघटनांकडून कडाडून विरोध होत असून विरोधकही भाजपावर टीका करताना दिसत आहेत. (Ganpati in the form of Santa Claus)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केंद्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाने दिलेली जाहिरात पोस्ट केली आहे. यशवंत किल्लेदार यांनी म्हटले की, गणपती बाप्पाला सांताक्लॉजच्या वेशात दाखवून केंद्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाने दिलेली ही जाहिरात पाहून तीव्र संताप होत आहे. काल दिवसभर भाजपाचे लोक विविध ठिकाणी ख्रिसमस साजरा करणाऱ्या लोकांना मारहाण करत होते. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः चर्चमध्ये जाऊन ख्रिसमस साजरा करत होते, अशी टीका त्यांनी केली. (Ganpati in the form of Santa Claus)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00