Home » Blog » ताडोबातील दुसरी वाघीण चांदोलीत सोडली

ताडोबातील दुसरी वाघीण चांदोलीत सोडली

by प्रतिनिधी
0 comments
Second tigress from Tadoba enters Chandoli

सांगली : प्रतिनिधी : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून स्थलांतरीत केलेला वाघ चांदोली राष्ट्रीय उद्यानातील अनुकुलन कुंपणात सोडण्यात आला. यापूर्वी गेल्या महिन्यात ताडोबा अभयारण्यातील स्थलांतरीत वाघ सोडण्यात आला आहे. त्यामुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. (Second tigress from Tadoba enters Chandoli)

‘ऑपरेशन तारा’ या सह्याद्री वाघ पुनर्स्थापन कार्यक्रमाच्या महत्वाकांक्षी उपक्रमांतर्गत महाराष्ट्र वन विभागाने मंगळवारी (दि.९) सायंकाळी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून स्थलांतरित केलेल्या दोन वर्षांच्या ‘टी ७- एस २’ या वाघिणीला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील चांदोली राष्ट्रीय उद्यानातील सोनारली अनुकूलन कुंपणात सोडण्यात आली. (Second tigress from Tadoba enters Chandoli)

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोलारा कोअर रेंज, पांढरपौनी परिसरातून ही वाघीण ८ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी सुरक्षितपणे पकडली होती. त्यांनंतर तिची सखोल वैद्यकीय तपासणी करण्यात आली. वैद्यकीय तपासणीत ही वाघीण पूर्णतः तंदुरुस्त, निरोगी आणि स्थलांतरास योग्य असल्याचे निदर्शनास आले. वाघिणीची सुरक्षित पकड, वाहतूक आणि सॉफ्ट रिलिजची संपूर्ण प्रक्रिया ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या रॅपिड रेस्क्यू टीम व कोलारा कोअर रेंजमधील क्षेत्रीय वन कर्मचारी यांच्या उत्कृष्ट समन्वयामुळे यशस्वीपणे पार पडली. (Second tigress from Tadoba enters Chandoli)

भारतीय वन्यजीव संस्थेच्या वैज्ञानिक मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण या कार्यक्रमावर लक्ष ठेवून आहेत. याची अंमलबजावणी मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) डॉ. जितेंद्र रामगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली केली जात आहे.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00