Home » Blog » संविधान रक्षणाची लढाई करण्याऱ्या राहूल गांधींना शक्ती द्या; शाहू छत्रपतींचे आवाहन

संविधान रक्षणाची लढाई करण्याऱ्या राहूल गांधींना शक्ती द्या; शाहू छत्रपतींचे आवाहन

Rahul Gandhi : संविधान रक्षणाची लढाई करण्याऱ्या राहूल गांधींना शक्ती द्या; शाहू छत्रपतींचे आवाहन

by प्रतिनिधी
0 comments

कोल्हापूर; प्रतिनिधी : ‘चारशे पार’ घोषणा करुन संविधान बदलण्याचा डाव आखणाऱ्यांना लोकसभा निवडणूकीत जनतेने रोखले आहे. दोन तृतीयांश बहुमत नसल्याने ते संविधान बदलू शकत नाहीत. संविधान रक्षणाची लढाई राहूल गांधी प्रामाणिकपणे लढत असून त्यांना शक्ती देण्यासाठी आपण सर्वांनी पाठबळ द्यावे, असे आवाहन खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांनी केले. संविधान सन्मान संमेलनात ते बोलत होते. यावेळी लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहूल गांधी यांची प्रमुख उपस्थिती होती. (Rahul Gandhi)

संविधान सन्मान संमेलनाच्या अध्यक्षपदावरुन बोलताना खासदार शाहू छत्रपती म्हणाले, भारत आणि महाराष्ट्राला प्राचीन आणि मोठा इतिहास आहे. अन्यायाच्या विरोधात लढणाऱ्या शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य निर्माण केले. त्यानंतर काही काळ सोडल्यानंतर समाज विखुरला गेला. अविचार करणाऱ्या काही गोष्टी १८ व्या शतकात घडल्या. १९ आणि विसाव्या शतकात महात्मा जोतिराव फुले आणि राजर्षी शाहू महाराजांनी समाजात काय उणिवा आहेत याचे आकलन करत पावले टाकली आणि महाराष्ट्रात समतेचा विचार रुजण्यास मदत झाली.

सर्व जाती धर्मांना समान हक्क असावेत या उद्देशाने शाहू महाराजांनी आरक्षणाची सुरुवात कोल्हापूरात केली, असे सांगून शाहू छत्रपती म्हणाले त्यावेळी ९० टक्के कारभार एका वर्गाकडे तर १० टक्के कारभार बहुजन समाजाकडे होते. हे विषम चित्र दूर करण्यासाठी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात ५० टक्के आरक्षण दिले. समाज शिकू लागला आणि देशाच्या प्रगतीत हातभार लावू लागला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी शाहू महाराजांचे जिव्हाळ्याचे संबध होते. माणगाव परिषदेत डॉ. आंबेडकर हेच तुमचे नेते आहेत हे दलितांना सांगितले. त्यानंतर डॉ आंबेडकरांनी बहुजन समाजाचे संघटन करत त्यांच्यात आत्मविश्वास जागवला. शाहूंच्या निधनानंतर २५ वर्षांनी भारताची जे संविधान निर्माण झाले त्यामध्ये डॉ. आंबेडकरांचा सिंहाचा वाटा होता.

डॉ. आंबेडकरांनी जे समता, एकतेचे तत्व सांगितले त्याला छेद देण्याचे काम सुरू असल्याचे सांगून देशाची घटना बदलण्याचे प्रयत्न होत आहेत. या प्रयत्नांना लोकसभा निवडणूकीत पायबंद घातला. राहूल गांधी संविधान रक्षणाचे काम तळमळीने करत असून त्यांना सर्वांनी साथ दिली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. या संमेलनाला सुखदेव महाराज, प्राचार्य टी.एस. पाटील, नितीन चौधरी, भालबा विभुते, अनिल जयहिंद, सुभाष यादव, अशोक भारती, विजेंद्र गौतम, शाबिर अन्सारी, प्रतिमा शिंदे उपस्थित होते.

हेही वाचा :

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00